Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > बाल्कनीत छोट्या कुंडींत लावा कढीपत्ता; किचनमधला हा पदार्थ घाला, भरपूर येतील पाने हिरवीगार

बाल्कनीत छोट्या कुंडींत लावा कढीपत्ता; किचनमधला हा पदार्थ घाला, भरपूर येतील पाने हिरवीगार

How To Grow Curry Leaves Plant At Home : कढीपत्त्याचं रोप बहरलेलं राहण्यासाठी योग्य खत आणि पोषण महत्वाचे असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:59 IST2026-01-08T14:51:29+5:302026-01-08T14:59:42+5:30

How To Grow Curry Leaves Plant At Home : कढीपत्त्याचं रोप बहरलेलं राहण्यासाठी योग्य खत आणि पोषण महत्वाचे असते.

How To Grow Curry Leaves Plant At Home : Tips To Grow Curry Leaves Plant At Home | बाल्कनीत छोट्या कुंडींत लावा कढीपत्ता; किचनमधला हा पदार्थ घाला, भरपूर येतील पाने हिरवीगार

बाल्कनीत छोट्या कुंडींत लावा कढीपत्ता; किचनमधला हा पदार्थ घाला, भरपूर येतील पाने हिरवीगार

पदार्थांला चव येण्यासाठी फोडणीत कढीपत्त्याचा वापर केला जातो. घरात किंवा बगिच्यात कढीपत्त्याचं रोप असेल तर स्वयंपाकघराची शोभा वाढत नाही तर  आजूबाजूचं वातावरणही चांगले राहते (How To Grow Curry Leaves Plant At Home). कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. कढीपत्त्याचं रोप घरच्याघरी लावणं एकदम सोपं आहे.  ज्यामुळे तुम्हाला ताजी कढीपत्त्याची पानं घरीच काढता येतील. कढीपत्त्याचं रोप बहरलेलं राहण्यासाठी योग्य खत आणि पोषण महत्वाचे असते. (Tips To Grow Curry Leaves Plant At Home)

१) नायट्रोजनयुक्त  खत

 कढीपत्त्याच्या पानांच्या वाढीसाठी नायट्रोजनयुक्त  खताची आवश्यकता असते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शेण खत  किंवा वर्मी कम्पोस्ट सर्वात उत्तम आहे. महिन्यातून एकदा माती खणून २ मूठभर हे खत घातल्यानं रोपाला नवीन फांद्या येतात.

२) ताक किंवा आंबट दही

 ताक किंवा आंबट दही  कढीपत्त्यासाठी एका जादूई टॉनिकप्रमाणे काम करते. ताकातील लॅक्टिक एसिड आणि गुड बॅक्टेरियाज मातीची गुणवत्ता वाढवतात. याच्या वापरासाठी २ चमचे आंबट दही किंवा १ कप ताक २ लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या मुळांमध्ये घाला. महिन्यातून २ वेळा हा उपाय करा. ज्यामुळे पानं चमकदार दिसतील आणि रंग गडद होईल.

३) तांदळाचं पाणी

तांदूळ धुवून झाल्यानंतर त्याचं पाणी फेकण्याऐवजी घरातल्या रोपांसाठी वापरा. यात अनेक सुक्ष्म पोषक तत्व असतात. याव्यतिरिक्त वापरलेली चहा पावडर व्यवस्थित सुकवून मातीत मिसळा. ही माती पीएच स्तर मेंटेन ठेवण्यास मदत करते.

४) महत्वाच्या टिप्स

 कढीपत्त्याच्या रोपाला दिवसातून कमीत कमी ५ ते ६ तासांच्या उन्हाची आवश्यकता असते. वेळोवेळी प्रुनिंग केल्यानं रोप घनदाट बनते. मातीचा वरचा थर सुकल्यानंतरच पाणी द्या.  अन्यथा जास्त पाण्यामुळे मुळं सडू लागतात. याशिवाय एलोवेरा, बटाट्याची सालं दही यांचे मिश्रण तयार करून लिक्विड खताच्या स्वरूपात तुम्ही वापरू शकता. 

मराठमोळ्या लोटस मंगळसूत्राचा खास ट्र्रेंड; १० सुंदर डिझाईन्स-साडीत युनिक, मॉडर्न लूक येईल

किटकांपासून रोपाचा बचाव कसा करावा?

कढीपत्याच्या रोपावर काळ्या रंगाचे छोटे कीडे किंवा पांढरी बुरशी लागते. एक लिटर पाण्यात ५ मिली कडुलिंबाचे तेल आणि थोडं लिक्विड डिश सोप मिसळून स्प्रे करा. हळद एक प्राकृतिक एंटी फंगल घटक आहे. मातीत थोडी हळद मिसळल्यानं मुळं सुरक्षित राहतात.

Web Title: How To Grow Curry Leaves Plant At Home : Tips To Grow Curry Leaves Plant At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.