भारतीय स्वयंपाकघरात केले जाणारे अनेक पदार्थ हे कडीपत्त्याशिवाय अपूर्णच आहेत. डाळ, भाजी, आमटी किंवा कोणत्याही पदार्थाला फोडणी द्यायची म्हटलं की कडीपत्ता हवाच. रोजच्या जेवणात कडीपत्ता वापरला जात असल्याने आपल्यापैकी बहुतेकजण कडीपत्त्याचे रोप घरातच लावतात. पण, अनेकदा अशी तक्रार ऐकायला मिळते की, वर्षभर हिरवेगार आणि जोमाने वाढणारे हे रोपटे थंडीमध्ये अचानक सुकायला लागते, त्याची पाने गळून पडतात, किंवा रोपाची वाढ पूर्णपणे थांबते. हिवाळा सुरू झाला की थंडी, धुके आणि कोरडी हवा यामुळे कडीपत्त्याचे रोप पटकन सुकू लागतात. पानगळ वाढते, नवीन पालवी येत नाही आणि पूर्ण रोपच मरगळल्यासारखं दिसतं(To increase growth of curry leaves plant rapidly & prevent from drying out in winter).
स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा कडीपत्ता घरच्या कुंडीतच ताजा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, पण हिवाळ्यात त्याची योग्य काळजी घेतली नाही तर रोप टिकवणं (how to grow curry leaves faster in winter) कठीण होतं. कडीपत्त्याला सूर्यप्रकाश, पाण्याचं योग्य प्रमाण, उबदार तापमान आणि खत या सगळ्याच योग्य संतुलन राखलं तर कडीपत्त्याचे रोप बहरुन येण्यास मदत मिळते. ऐन कडाक्याच्या थंडीतही (curry leaf plant winter care tips) कडीपत्त्याच्या रोपाला हिरवीगार भरपूर पानं येण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात.
कडाक्याच्या थंडीत कडीपत्त्याच रोप सुकू नये म्हणून काय करावं ?
१. थंडीच्या हंगामात रोपाची छाटणी किंवा वरचा भाग पिंचिंग करणे टाळावे. कारण, ही प्रक्रिया रोपासाठी तणावपूर्ण असू शकते. कटाई - छटाई किंवा पिंचिंगचे काम तुम्ही पावसाळ्याच्या हंगामात किंवा फेब्रुवारी - मार्च दरम्यान करू शकता. जेव्हा रोप मोठे होते, तेव्हा वर्षातून एकदा थोडी छाटणी करावी यामुळे रोपाची वाढ चांगली होते. रोपासाठी नेहमी भुसभुशीत मातीचाच वापर करा. कडीपत्त्याच्या रोपाला किंचित क्षारीय माती घालणे खूपच फायदेशीर ठरते.
२. रोपाला हिरवेगार ठेवण्यासाठी पुरेसा आणि थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. सूर्यप्रकाशामुळेच रोपाची वाढ आणि त्याचा हिरवेपणा टिकून राहतो. हिवाळ्यात रोपाची कुंडी अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्याला पुरेशा प्रमाणात थेट सूर्यप्रकाश मिळेल.
जावित्रीचा चहा तुम्हाला थंडीतही ठेवतो सुपरफिट! चहा ‘असा’ करा आणि हिवाळ्यात लांब ठेवा सगळेच आजार...
३. दर महिन्याला शेणखत टाकावे. हे कडीपत्त्याच्या रोपासाठी सर्वात उत्तम आणि फायदेशीर असे खत मानले जाते. शेणखतामुळे रोपटे दाट आणि हिरवेगार राहते.
४. शेणखताव्यतिरिक्त, तुम्ही काही इतर घरगुती गोष्टींचाही खत म्हणून उपयोग करू शकता. वापरलेली चहापत्ती स्वच्छ धुऊन घ्यावी आणि नंतर सुकवून मग मातीत घालावी. लिंबाच्या साली पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर ते पाणी रोपट्याच्या मुळाशी टाका. तांदूळ धुतल्यानंतर उरलेले पाणी देखील रोपट्यामध्ये टाकणे खूप फायदेशीर ठरते.
५. मोहरीचे दाणे बारीक वाटून घ्यावेत आणि थेट रोपाच्या मातीमध्ये मिसळावेत. मोहरीचे दाणे वाटून किंवा पाण्यात मिसळून २ दिवसांसाठी तसेच ठेवून द्यावेत आणि त्यानंतर ते पाणी रोपाला घालावे. मोहरीच्या मिश्रणासोबत एक चमचा हळद पावडर नक्की मिसळा. हळद अँटी-फंगल म्हणून काम करते आणि रोपाला विविध रोगांपासून वाचवते.
६. एकदा वापरलेली चहापत्ती चांगल्या प्रकारे धुवून आणि सुकावून घ्यावी आणि मोहरी आणि हळदीच्या मिश्रणासोबत मातीत टाकावी. मोहरी, हळद आणि चहापत्ती या तीन गोष्टींचे मिश्रण तुमच्या कडीपत्त्याच्या रोपाला हिरवेगार आणि दाट बनवण्यास मदत करेल.
Web Summary : Curry leaves often dry in winter. Proper sunlight, water, warmth, and fertilizer are crucial. Avoid pruning, ensure ample sunlight, use cow manure and homemade fertilizers like tea leaves and rice water for a lush, green plant.
Web Summary : सर्दियों में करी पत्ता अक्सर सूख जाता है। उचित धूप, पानी, गर्मी और खाद महत्वपूर्ण हैं। छंटाई से बचें, पर्याप्त धूप सुनिश्चित करें, गोबर की खाद और चाय पत्ती और चावल के पानी जैसे घरेलू उर्वरकों का उपयोग करें, करी पत्ते का पौधा हरा-भरा रहेगा।