Join us

खिडकीतल्या कुंडीतही वाढेल हिरवीगार कोथिंबीर, करा ५ गोष्टी-खा ताजी कोवळी कोथिंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2024 15:29 IST

How to grow coriander – Step by Step : कुंडीतली कोथिंबीरही भरभर वाढेल त्यासाठी काही टिप्स

पदार्थ तयार करून झाल्यानंतर शेवटी कोथिंबीर (Coriander) भुरभुरून डिश सर्व्ह केली जाते. कोथिंबीर घालताच पदार्थाला चारचांद लागतात. शिवाय ताज्या कोथिंबीरीचे सुगंध घरभर दरवळते. घरात आपण कोथिंबीरीची जुडी आणून ठेवतो. ती निवडून-धुवून हवाबंद डब्यात साठवून ठेवतो. घरातली कोथिंबीर संपल्यावर बाजारात पुन्हा जावे लागते. पण जर घरातच कोथिंबीरीची शेती केली तर?

कोथिंबीरीचे रोपटे आपण घरातही लावू शकता (Gardening Tips). या रोपट्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. कमी वेळात भरभर हे रोपटे वाढत जाते. पण घरातल्या कुंडीत कोथिंबीर लावताना कोणते टिप्स लक्षात ठेवाव्या? ती कशी लावावी? पाहूयात(How to grow coriander – Step by Step).

कोथिंबीरीचे रोपटे लावताना घ्या अशी काळजी

- घरात कोथिंबीर लावण्यासाठी कृषी बियाणे स्टोअरमधून धणे आणा. या बियापासून निघणारी कोथिंबीर चव आणि सुगंध या दोन्ही बाबतीत परिपूर्ण असते. आपण किराणा स्टोअरमधूनही धणे विकत घेऊ शकता.

घरच्या कुंडीतही लावता येईल अळू, मातीत मिसळा किचनमधलं एक खास पाणी; भरभर वाढतील पानं

- कोथिंबीर सर्वात जलदरित्या वाढवण्यासाठी, धणे थेट कुंडीत पेरू नका. पेरण्यापूर्वी ते उन्हात चांगले वाळवून घ्या. धणे एका जड दगडाने घासून त्यांचे दोन भाग करा. या बियांची पावडर नसून, खडबडीत वाटून घ्या.

- जर आपल्याला ५ दिवसात रिझल्ट हवे असेल तर, कुंडीत लावण्यापूर्वी बियाणे अंकुरित करणे महत्वाचे आहे. यासाठी धणे एका सुती कापडात बांधा. नंतर पाण्यात भिजवून मातीत ३ दिवसांसाठी ठेवा. त्यावर पाण्याची फवारणी करत रहा. यामुळे लवकर मोड येईल.

गॅलरीतल्या कुंडीतही फुलेल मोगरा, लहानशा रोपालाही येतील भरपूर फुलं- करा फक्त ४ गोष्ट

- मोड आलेले धणे लावण्यापूर्वी कुंडीतल्या मातीत शेण आणि कोको पीट समान प्रमाणात मिसळून ठेवा. नंतर मातीत मोड आलेले धणे घालून मातीने कव्हर करा.

- त्यानंतर स्प्रेने पाणी घाला. नियमित पाणी घाला. वेळ चुकवू नका. ४ ते ५ दिवसात कुंडीत छोटी-छोटी पानं दिसू लागतील. यामुळे कोथिंबीरीची योग्य वाढ होईल.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल