Join us

कोथिंबीरीचे देठ फेकू नका, ‘असं’ ठेवा पाण्यात आणि रोज मिळेल ताजी कोवळी हिरवीगार कोथिंबीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 14:33 IST

How To Grow Coriander Plant At Home : Best way to grow coriander At Home : How To Grow Coriander In Summer Season At Home : कोथिंबीरीचे देटही फायदेशीर! भन्नाट ट्रिक - देटालाही येईल हिरवीगार कोथिंबीर...

रोजच्या स्वयंपाकात आपण पदार्थांवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवून घालतो. डाळ, भाजी, आमटी यांवर कोथिंबीर भुरभुरवून घातली की पदार्थांना अधिक चव येते. अशी हिरवीगार कोथिंबीर (How To Grow Coriander Plant At Home) आपण एकदाच बाजारांतून विकत आणतो. विकत आणलेली कोथिंबीर आपण (Best way to grow coriander At Home) फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो, परंतु अनेकदा ही कोथिंबीर लगेच खराब होते किंवा पटकन वापरुन संपवावी लागते. अशा परिस्थितीत, आपण ही रोजच्या वापरातील कोथिंबीर घरच्याघरीच एका छोट्याशा कुंडीत देखील लावू शकतो(How To Grow Coriander In Summer Season At Home).

कुंडीत छोटेसे कोथिंबीरीचे रोपं लावले तर वारंवार बाजारांतून कोथिंबीर विकत आणावी लागणार नाही. याचबरोबर, स्टोअर केलेली कोथिंबीर खराब होईल म्हणून लगेच वापरून संपवावी देखील लागणार नाही. आपण आपल्याला अगदी हवी तेव्हा कुंडीतील फ्रेश कोथिंबीर काढून वापरु शकतो. घरच्याघरीच कुंडीत कोथिंबिरीचे रोप लावणं सोपं आहे, यासाठी तुम्हाला फारसा खर्च आणि मेहेनत देखील करावी लागणार नाही. विकत आणलेल्या कोथिंबीरचे देठ फेकून न देता, तेच पुन्हा पाण्यांत भिजत ठेवून त्यापासून कोथिंबीरचे रोपं कसे तयार करायचे ते पाहूयात. 

कोथिंबीरचे देठ फेकू नका तर करा 'हे' एक काम... 

कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्यापासूनच पुन्हा कोथिंबीर कशी उगवायची किंवा कोथिंबीरचे रोप कसे लावायचे ते पाहूयात. याबद्दलचा एक व्हिडिओ maplemomchronicles या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, सर्वातआधी बाजारांतून विकत आणलेल्या कोथिंबिरीची पाने काढून देठ वेगळे करा. लांब देठ वरच्या भागांतून थोडे कापून त्यांची उंची कमी करा. त्यानंतर, एका ग्लासात पाणी घेऊन त्यात हे देठ भिजत ठेवा. शक्यतो मूळ असलेल्या देठाचीच निवड करा. पाण्यांत भिजवून ठेवलेल्या या देठांना थोड्याच दिवसांत कोथिंबिरीची पाने पुन्हा येऊ लागतील, तसेच मूळ देखील वाढून मोठी होतील. अशाप्रकारे मूळ वाढलेले देठ तुम्ही मातीत देखील लावू शकता किंवा पाण्यातच ठेवू शकता. 

बागेतील नागवेलींच्या वेलीला घाला 'हे' पांढरे पाणी, विड्याची पानं होतील मोठी आणि वेल वाढेल जोमाने...

कोथिंबीर मातीत लावण्यासाठी कुंडीत समान प्रमाणात रेती, माती, शेण, कोकोपीट मिसळून भरा. त्यानंतर हे देठ मातीत लावा. रोज हलकं पाणी यावर शिंपडून फवारा मारा, लवकरच कोथिंबिरीची छोटी रोपं उगवतील आणि काही दिवसात भाजीतही ताजी कोथिंबीर घालता येऊ शकते. अशाप्रकारे आपण कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्यापासूनच पुन्हा ताजी कोथिंबीर उगवू शकतो.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी