कोथिंबीरीशिवाय (Coriander) भारतीय घरातील पदार्थ अपूर्ण वाटतात. कोथिंबीर कोणत्याही पदार्थांत सजावटीसाठी वापरली जाते. पण बाहेरची कोथिंबीर अनेकदा महाग विकली जाते किंवा नेहमी फ्रेश मिळत नाही. बाजारात न जाता तुम्ही घरच्याघरी कोथिंबीर लावू शकता (Gardening Tips). घरीच एका छोट्याश्या टोपलीत कोथिंबीरीचं रोप लावणं अगदी सोपं आहे. हे रोप कसं लावायचं, कोथिंबीरीच्या रोपाची काळजी कशी घ्यायची ते समजून घेऊ. सर्वात सोपा आणि कमी जागेत कोथिंबीर वाढवण्याचा उपाय म्हणजे जाळीची प्लास्टीकची टोपली वापरा. (How To Grow Coriander At Home)
कोथिंबीर टोपलीत लावण्यासाठी लागणारं साहित्य
१) टोपली- सगळ्यात आधी मध्यम आकाराची प्लास्टीकची टोपली घ्या.
२) माती- ५० टक्के सामान्य बागेतील माती आणि २५ टक्के शेणखत किंवा कंपोस्ट आणि २५ टक्के कोकोपीट भरा. यामुळे माती हलकी होते आणि निचरा व्यवस्थित होतो.
३) कोथिंबीरीचे बी- कोथिंबीरीचे बी बाजारात सहज उपलब्ध होते.
४) पाण्याची फवारणी बाटणी
कोथिंबीरीची लागवड कशी करावी? (How To Grow Coriander in Home Step By Step Guide)
जाळीच्या टोपलीतून माती बाहेर येऊ नये यासाठी सगळ्यात आधी टोपलीच्या आतल्या बाजूला ज्यूट कापड किंवा शेतीसाठी वापरलं जाणारं जाड प्लास्टिकचं अस्तर लावा. यामुळे पाणी बाहेर पडेल आणि माती धरून राहील.
तयार केलेलं मातीच मिश्रण टोपलीत साधारण ३ ते ४ इंच जाडीनं भरा. माती हलकी असावी. कोथिंबीरीचे बी हलकं दाबून दोन तुकड्यांमध्ये फोडून घ्या. बी मातीवर सर्वत्र परसरवा. एकाच ठिकाणी जास्त बी घालू नका. अन्यथा रोपं कमजोर होतील (Ref). पहिल्यांदा पाण्याची फवारणी करताना बॉटलनं हलकं पाणी द्या. जेणेकरून बी मातीतून वर येणार नाही. कोथिंबरीच्या बियांना जास्त पाणी किंवा थेट पाणी घातल्यास त्या खराब होऊ शकतात. माती नेहमी ओलसर ठेवा पण जास्त चिखल नसावा.
कोथिंबीरीची काळजी घ्याल?
कोथिंबीरीला दिवसातून ४ ते ६ तास सुर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे. टोपली अशा ठिकाणी ठेवा जिथे ऊब येत असेल. दररोज सकाळी एकदा फवारणीनं पाणी द्या. हिवाळ्यात किंवा थंडीत दोन दिवसांतून एकदा पुरेसं आहे. रोपं साधारण २ ते ४ इंच झाल्यावर महिन्यातून एकदा लिक्विड कंपोस्ट किंवा शेणखताचं पाणी द्या. साधारण ४ ते ६ आठवड्यात कोथिंबीर खाण्यासाठी तयार होईल. कोथिंबीर काढताना रोपं मुळासकट न काढता तळाशी १ इंच सोडून वरचा भाग कापा. यामुळे ती पुन्हा वाढेल आणि तुम्हाला ताजी कोथिंबीर मिळेल.