आपल्यापैकी अनेकांना गार्डनिंगची आवड असते, अशावेळी आपल्या गार्डनमध्ये घरभर सुवास दरवळणारी फुलं झाडं हवीच असं वाटतं. परंतु शहरात राहताना छोट्याशा कुंडीत झाडं लावून ते जागवणं हे एक मोठं अवघड कामचं असतं... सुगंधी फुलांची राणीला म्हणजेच 'चमेलीचं रोपं' आपल्या बागेत असणं याहून मोठं दुसरं सुख नाही...दिवसभराच्या कामानंतर जेव्हा आपण बाल्कनीत किंवा बागेत येतो, तेव्हा चमेलीचा तो मंद आणि मोहक सुगंध मनाला एक वेगळीच शांती देतो. चमेली हे केवळ एक फूल नाही, तर ते घराचं वातावरण आनंदी आणि फ्रेश ठेवण्यासाठीचा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे(how to grow chameli plant at home).
आपण अनेकदा मोठ्या उत्साहाने चमेलीचं (how to take care of jasmine plant in pot) रोप लावतो खरं पण काही दिवसांतच ते कोमेजून जाते. इतकंच नाही तर, चमेलीच रोप आहे पण त्याला फुलंच येत नाहीत? किंवा कळ्या येण्यापूर्वीच गळून पडतात? अशा अनेक तक्रारी असतात, अशावेळी नुसतं पाणी घालून चालत नाही. मातीचा पोत, सूर्यप्रकाश आणि खतांचा योग्य वापर या गोष्टी चमेलीला फुलांनी बहरण्यासाठी महत्त्वाच्या असतात. जर तुम्हालाही तुमच्या छोट्याशा बागेतील चमेलीचे रोप बहरावे असे वाटत असेल, तर त्याची नेमकी कशी काळजी घ्यावी? फक्त काही साध्या घरगुती ट्रिक्स वापरून आपण बाल्कनीतील चमेलीच्या फुलांचा पांढराशुभ्र बहर आणू शकता... रोप लावण्यापासून (how to keep jasmine plant healthy and blooming) त्याला भरपूर फुले येईपर्यंत चमेलीच्या रोपाची नेमकी काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स पाहूयात...
चमेलीच्या रोपाची नेमकी काळजी कशी घ्यावी ?
१. माती आणि खत :- चमेलीच्या रोपाला हलकी, पोषक तत्वांनी युक्त आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती मानवते. यासाठी बागेतील माती, कंपोस्ट खत आणि थोडी वाळू एकत्र करून एक उत्तम मिश्रण तयार करा. माती नेहमी हलकी ओली ठेवावी, मात्र कुंडीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोपाची वाढ निरोगी राहण्यासाठी आणि भरपूर प्रमाणात फुले येण्यासाठी दरमहा थोडे सेंद्रिय खत आवर्जून घालावे. विशेषतः उन्हाळ्यात दर २ ते ४ आठवड्यांनी संतुलित किंवा फॉस्फरसयुक्त सेंद्रिय खताचा वापर केल्यास चमेलीचा बहर चांगला येतो.
बदामाचं रोप तयार करुन बागेत लावण्याची पाहा सोपी पद्धत, झाड वाढेल जाेमानं आणि फळंही येतील सुंदर...
२. पुरेसा सूर्यप्रकाश :- चमेलीच्या रोपाला दररोज किमान ४ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. सकाळचे कोवळे ऊन या रोपासाठी सर्वात उत्तम मानले जाते. दुपारच्या कडक उन्हामुळे झाडाची पाने जळू शकतात, त्यामुळे तीव्र उन्हापासून रोपाचे संरक्षण करा. जर तुमच्या बाल्कनीत हलकीशी सावली असेल, तर रोपाला पुरेशा प्रमाणात हलकासा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करून घ्या.
३. पाण्याचे प्रमाण :- जेव्हा कुंडीतील मातीचा वरचा थर सुकलेला दिसेल, तेव्हाच पाणी द्यावे. अति प्रमाणात पाणी दिल्यास झाडाची पाने पिवळी पडू शकतात आणि मुळे सडण्याची भीती असते. उन्हाळ्यात चमेलीला दररोज पाणी द्यावे लागते, तर हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे. मात्र, माती पूर्णपणे कोरडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
छतावरील टाकीतलं पाणी होत कडकडीत गरम ? स्वस्तात मस्त ८ देसी जुगाड - ऐन दुपारीही मिळेल थंडगार पाणी...
४. छाटणी करा :- फुलांचा बहर येऊन गेल्यानंतर रोपाची नियमितपणे छाटणी करा. यामुळे झाडाला नवीन फुटवे येतात आणि रोप अधिक दाट व सुंदर दिसते. योग्य वेळी केलेल्या छाटणीमुळे झाडाला कीड कमी लागते आणि हवा खेळती राहण्यास मदत होते.
५. कीड आणि हवामानापासून संरक्षण :- बाल्कनीमध्ये येणारी अति वेगवान हवा, कोरडेपणा किंवा मावा (Aphids) आणि कोळी (Spider Mites) यांसारख्या किडी चमेलीच्या रोपासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे रोपाचे जोराचा वारा आणि खराब हवामानापासून संरक्षण करा. कीड नियंत्रणासाठी कडुलिंबाचे तेल किंवा हलक्या सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करा यामुळे फुलांचे नुकसान होत नाही आणि रोपही निरोगी राहते.
६. कुंडीचा आकार आणि माती :- चमेलीची मुळे वेगाने पसरतात, त्यामुळे कुंडी निवडताना ती किमान १० ते १२ इंचांची असावी. माती तयार करताना त्यात थोडी वाळू आणि कोकोपीट मिसळा, जेणेकरून पाण्याचा निचरा नीट होईल आणि मुळे सडणार नाहीत.
