Lokmat Sakhi >Gardening > छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

Grow cardamom at Home : Cardamom gardening : आपण घरात वेलचीचे रोप लावू शकतो का? घरच्या घरी वेलचीचे झाड कसे लावावे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2025 19:53 IST2025-08-31T14:35:32+5:302025-08-31T19:53:44+5:30

Grow cardamom at Home : Cardamom gardening : आपण घरात वेलचीचे रोप लावू शकतो का? घरच्या घरी वेलचीचे झाड कसे लावावे पाहूया.

How to grow cardamom in pots at Home Easy method to grow cardamom plant in balcony or courtyard Best soil and conditions for cardamom cultivation | छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचे स्थान अढळ आहे. पदार्थाची चव वाढवण्यापासून ते सुगंध कायम ठेवण्यापर्यंत वेलची खास मानली जाते.(Cardamom plant) चहा, मिठाई, शिरा किंवा बिर्याणी सारख्या गोड आणि तिखट पदार्थात वेलचीची एक फोड घातली तरी सुगंध दरवळत राहतो.(Grow cardamom at home) मसाल्यांची राणी समजले जाणारी वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.(Cardamom gardening) पचन सुधारण्यापासून ते श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी वेलची फार उपयोगाची ठरते.(Cardamom cultivation in pots) पण अनेकदा प्रश्न पडतो की, आपण घरात वेलचीचे रोप लावू शकतो का? घरच्या घरी वेलचीचे झाड कसे लावावे पाहूया. (Cardamom plant care)

नैवेद्य स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा मटार बटाट्याची रस्सा भाजी, पाहा ग्रेव्ही करण्याची सोपी पद्धत

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर शिखा श्रीवास्तव यांनी घरी वेलचीचे रोप लावण्याची सोपी पद्धत सांगितली. वेलचीचे रोप लावण्यासाठी आपण एक मोठी वेलची घ्यायला हवी. वेलची पूर्णपणे कोरडी असावी. जर वेलची खराब असेल तर रोप वाढण्याची शक्यता देखील कमी असते. 

वेलचीचे रोप लावण्यासाठी आपल्याला ताजे कोरफड घ्यावे लागेल. कोरफडमध्ये  नैसर्गिकरित्या बुरशीविरोधी आणि मूळ वाढवणारे हार्मोन्स असतात जे बियांना लवकर अंकुरण्यास मदत करतात. आणि रोगांपासून त्यांचे संरक्षण करतात. यासाठी कोरफड कापून घ्या आणि वेलची त्या भागावर २ ते ३ तास राहू द्या. या काळात बिया कोरफडीतील पोषक तत्वे शोषून घेतील. 

वेलचीची रोपे वाढविण्यासाठी ५० टक्के माती, ३० टक्के गांडूळखत किंवा शेणखत आणि २० टक्के वाळू घालून मिश्रण बनवू शकता. यामुळे रोपाची वाढ होण्यास मदत होईल. त्यात मातीचे मिश्रण घाला आणि कोरफडीवर ठेवलेले बियाणे मातीत सुमारे एक इंच खोल जाईल इथंपर्यंत घाला आणि वरुन पुन्हा थोडी माती घाला. बिया जास्तही खोलवर घालू नका. अन्यथा रोप वाढण्यास वेळ लागेल. 

बियाणे लावल्यानंतर मातीला ओलावा मिळण्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी द्या. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथून कमी प्रमाणात सूर्यप्रकाश येईल. या पद्धतीने रोप लावल्यास १० ते १५ दिवसांत वेलचीचे रोप येईल. याची पाने आपण चहासाठी वापरु शकतो. 


Web Title: How to grow cardamom in pots at Home Easy method to grow cardamom plant in balcony or courtyard Best soil and conditions for cardamom cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.