Lokmat Sakhi >Gardening > नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरव्यागार वेल वाढेल जोमाने...

नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरव्यागार वेल वाढेल जोमाने...

How To Grow Bushy & Healthy Betel Leaf Plant At Home : how to grow betel leaf plant at home : tips to grow bushy betel leaf plant : betel leaf plant care at home : how to grow healthy betel leaf plant : betel leaf plant growing tips : नागवेलींच्या पानांचा वेल भरघोस वाढण्यासाठी आणि पाने हिरवीगार होण्यासाठी ५ ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2025 10:00 IST2025-09-21T10:00:00+5:302025-09-21T10:00:02+5:30

How To Grow Bushy & Healthy Betel Leaf Plant At Home : how to grow betel leaf plant at home : tips to grow bushy betel leaf plant : betel leaf plant care at home : how to grow healthy betel leaf plant : betel leaf plant growing tips : नागवेलींच्या पानांचा वेल भरघोस वाढण्यासाठी आणि पाने हिरवीगार होण्यासाठी ५ ट्रिक्स...

How To Grow Bushy & Healthy Betel Leaf Plant At Home how to grow betel leaf plant at home how to grow healthy betel leaf plant | नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरव्यागार वेल वाढेल जोमाने...

नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरव्यागार वेल वाढेल जोमाने...

आपल्या सगळ्यांच्याच बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये एक तरी नागवेलींच्या पानांचे रोप किंवा वेल असतेच. नागवेलीची पानं त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी आणि धार्मिक कार्यांसाठी खूप महत्त्वाची ( How To Grow Bushy & Healthy Betel Leaf Plant At Home) मानली जातात. विड्याची पाने कोणताही सणवार, खास प्रसंग किंवा शुभ कार्य असेल तर हमखास वापरली जातात. विड्याच्या पानांचा वेल आपण मोठ्या हौसेने लावतो परंत्तू त्याची वाढच होत नाही, अशी (how to grow betel leaf plant at home) अनेकांची तक्रार असते. विड्याच्या पानांचा वेल लावला की, लगेच सुकून जाते, पिवळी पडते किंवा वेल लावला की तो टिकत (how to grow healthy betel leaf plant) नाही, पटकन  कोमेजतो अशा अनेक समस्या सतावतात.

विड्याच्या पानांचा वेल असो किंवा कुंडीत लावलेले रोपं जर, ते हिरव्यागार पानांनी बहरलेलं असेल तरच सुंदर दिसते. विड्याच्या पानांच्या वेलीची वाढ व्हावी, भरगच्च पाने यावीत आणि वेल नेहमीच सदाबहार दिसावा यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यावी लागते. अचूक मातीची निवड, पाणी आणि देखभाल केल्यास नागवेलीचा वेल हिरवागार व निरोगी राहू शकतो. नागवेलीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या गोष्टींची गरज असते आणि ते निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो कराव्यात ते पाहूयात. गार्डनिंग एक्सपर्ट राठी अंशू यांनी नागवेलीची वेल वाढवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. 

विड्याच्या पानांच्या रोपाची वाढ भराभर व्हावी यासाठी खास टिप्स... 

१. मातीत वाळू असणे महत्त्वाचे :- नागवेलीच्या रोपासाठी योग्य मातीची निवड करणे सर्वात महत्त्वाचे असते. जर मातीमध्ये पाणी साचून राहिले, तर मुळे कुजतात आणि रोप मरून जाते. त्यामुळे, माती तयार करताना त्यात वाळू नक्की मिसळा. वाळू मिसळल्याने माती भुसभुशीत आणि हलकी होते, ज्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. तुम्ही ३०% वाळू आणि ७०% माती असे मिश्रण तयार करू शकता. याशिवाय, माती अधिक सुपीक होण्यासाठी त्यात शेणखत किंवा गांडूळ खत मिसळल्यास अधिक फायदा होतो.

२. थेट सूर्यप्रकाश टाळा :- नागवेलीच्या रोपाला थेट आणि प्रखर सूर्यप्रकाशाची गरज नसते. हे असे रोप आहे, जे कमी सूर्यप्रकाश असलेल्या जागेत ठेवणे गरजेचे असते. थेट उन्हात ठेवल्यास पाने करपतात आणि रोप सुकते. त्यामुळे, रोपाला अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळी फक्त सौम्य सूर्यप्रकाश मिळेल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत ठेवा. बाल्कनी किंवा खिडकीजवळ, जिथे पुरेसे पण थेट सूर्यप्रकाश नसेल अशा ठिकाणी ठेवणे फायदेशीर ठरते.

३. गरजेनुसार पाणी द्या :- जास्त पाणी दिल्यास मुळे सडतात, तर कमी पाणी दिल्यास रोप सुकून जाते. त्यामुळे, पाणी देण्यापूर्वी मातीला बोटाने स्पर्श करून बघा. जर मातीचा वरचा थर कोरडा वाटला, तरच पाणी द्या. हिवाळ्यात कमी पाणी द्या, तर उन्हाळ्यात थोडे जास्त पाणी देऊ शकता.

४. खतं घालणे देखील गरजेचे :- नागवेलीच्या रोपाला प्रत्येक १५ ते २० दिवसांनी लिक्विड फर्टीलायझर किंवा गांडूळ खत घातले पाहिजे. यामुळे रोपाला पुरेसे पोषण मिळते आणि त्याची वाढ झपाट्याने होते. तुम्ही शेणखत पाण्यात मिसळूनही देऊ शकता. तसेच, नागवेलीच्या रोपाला ओलसरपणाची गरज असते.  त्यामुळे, दिवसातून एक किंवा दोन वेळा स्प्रे बॉटलने पानांवर पाणी शिंपडू शकता. यामुळे पाने हिरवी आणि चमकदार राहतील. 

५. आधार द्या आणि वेळेवर छाटणी करा :- नागवेलीच्या वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज असते. यासाठी तुम्ही लाकूड किंवा दोरीचा वापर करू शकता. जशी वेल वाढत जाईल, तसे तिला आधाराला बांधत जा. यामुळे वेल सरळ आणि मजबूत वाढण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, वेळोवेळी रोपाची छाटणी करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे नवीन फांद्या येतात आणि रोप अधिक दाट होते. सुकलेली किंवा पिवळी पडलेली पाने काढून टाका, जेणेकरून रोपाची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाईल.

Web Title: How To Grow Bushy & Healthy Betel Leaf Plant At Home how to grow betel leaf plant at home how to grow healthy betel leaf plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.