आपल्यापैकी बऱ्याचजणांकडे विड्याच्या हिरव्यागार पानांचा एक तरी वेल असतोच. विडयाच्या पानांचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. घरातील पूजाअर्चा ते जेवणानंतर मुखशुद्धीसाठी म्हणून विड्याच्या पानांचा (betel leaf plant home gardening tips) आवर्जून वापर केला जातो. आपण मोठ्या हौसेने विडयाच्या पानांचा वेल लावतो खरं, पण बऱ्याचदा तो वाढत नाही, पाने लहान राहतात किंवा वेल सुकायला लागतो(trick to increase betel leaf plant growth at home).
विड्याच्या पानांचा वेल लावला तरी अनेकांची तक्रार असते, वेल लगेच वाढत नाही, पाने लहान राहतात किंवा वेल नीट फुलत नाही. पण योग्य प्रमाणात खतं, पाणी आणि घरच्याघरीच काही सोपे उपाय वापरले तर हा वेल अगदी १५ दिवसांत दाट वाढतो आणि पानांचा आकारही मोठा होतो. विशेष गोष्ट म्हणजे या उपायासाठी फक्त २ रुपयांचा साधा पदार्थ कुंडीत मिसळला तरी विड्याच्या पानांचा वेल हिरवागार दिसतो आणि त्याला सतत नवी पाने फुटत राहतात. अनेकदा आपण विडयाच्या पानांसाठी (how to grow betel leaf plant faster) महागडी खते वापरतो, पण यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. याउलट, आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या व फक्त २ रुपयांमध्ये सहज मिळणाऱ्या खास पदार्थाचा वापर करून, विड्याच्या वेलीची वाढ फक्त १५ दिवसांत दोन ते तीन पटीने वाढवू शकता.
विड्याच्या वेलीसाठी २ रुपयांचा 'हा' पदार्थ आहे संजीवनी!
विड्याच्या पानांच्या वेलीला निरोगी राहण्यासाठी आणि दाट, हिरवीगार पाने येण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायट्रोजनची (Nitrogen) आवश्यकता असते. गार्डनिंग तज्ज्ञांच्या मते, या महत्वाच्या पोषक घटकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणत्याही महागड्या खतांची गरज नाही. २ रुपये किमतीची कॉफी पावडर किंवा वापरून झालेली चहापत्ती हा नायट्रोजनचा एक उत्तम आणि अत्यंत स्वस्त स्रोत आहे.
खतं, पाणी वेळेवर देऊनही रोपांना फुलंच येत नाही? ५ गार्डनिंग ट्रिक्स - रोपाला येईल फुलांचा बहर...
झेंडूच्या रोपाला ‘या’ दोन गोष्टींचं खत घाला, दिवाळीपर्यंत पिवळ्या फुलांनी बहरेल झेंडू...
कॉफी पावडरचे 'लिक्विड बूस्टर'...
कॉफी पावडर थेट मातीत टाकण्याऐवजी, ती द्रवरूप खत (Liquid Fertilizer) म्हणून वापरणे अधिक फायद्याचे ठरते. १ चमचा कॉफी पावडर एक ग्लास पाण्यात घालून चमच्याने हलवून व्यवस्थित विरघळवून घ्या. तयार झालेले हे द्रावण वेलीच्या कुंडीतील मातीत घाला. हे खत नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच मातीत घालावे. लिक्विड खताचे प्रमाण तेवढेच असावे, जेवढे पाणी माती शोषून घेईल. जास्त पाणी घालू नका.
पाण्याचे योग्य प्रमाण...
विड्याच्या वेलीला जलद वाढीसाठी आणि दाट पानांसाठी सतत ओलाव्याची आवश्यक असतो, त्यामुळे वेलीची वाढ चांगल्या पद्धतीने होते. वेल वाढवण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये पानांवर रोज पाण्याचा शिडकावा द्या. पानांवर ओलावा टिकून राहिल्याने ती सुकत नाहीत आणि छान उगवतात. कुंडीतील माती पूर्णपणे सुकू देऊ नका. त्याचबरोबर, कुंडीत पाणी साचणार नाही याची खात्री करा. कारण, जास्त पाणी झाल्यास वेलीचे मूळ सडून रोप मरू शकते. वेलीला आवश्यक ओलावा द्या, पण पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे की नाही याकडे देखील लक्ष असणे गरजेचे असते.
तुळशीच्या काड्यांचा चहा मसाला, ‘असा’ फक्कड चहा तुम्ही कधी प्यायलाच नसेल! तुळशीचा खास औषधी उपयोग....
मातीची घ्या काळजी...
निरोगी मुळांशिवाय कोणताही वेल वेगाने वाढू शकत नाही. त्यामुळे, कुंडीतील मातीची योग्य ती काळजी घ्यावी. दर दोन महिन्यातून मातीची मशागत करा. नेहमी कोरड्या मातीचीच मशागत करा. ओल्या मातीची मशागत केल्यास मुळांना इजा पोहोचू शकते. मशागत नेहमी कुंडीच्या बाजूलाच्या मातीची करावी. मध्यभागी करु नये. मध्यभागी मशागत केल्यास वेलींच्या मुख्य मुळांना नुकसान पोहोचू शकते.
विड्याच्या वेलीला आधार द्या...
विड्याची वेल ही तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार नेहमी वरच्या दिशेने वाढणारी वेल असते. त्यामुळे वेलीची वाढ चांगली होण्यासाठी तिला आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. हा आधार केवळ वेलीला वाढण्यासच मदत करत नाही, तर पानांचा आकार वाढवण्यास देखील मदत करतो. विड्याच्या वेलीसाठी मॉस स्टिक वापरणे आवश्यक आहे. मॉस स्टिक वेलीला वर चढण्यासाठी हलका ओलसर आणि मजबूत पृष्ठभाग देते. या दमटपणामुळे वेलीची हवेतील मुळे स्टिकला घट्ट पकडतात आणि वेलीची वाढ निरोगी व जलद होते.