Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > ऐन उन्हाळ्यातही नागवेलीची वेल होईल हिरवीगार! पाने येतील मोठी - चमकदार, भरघोस वाढीसाठी खास उपाय...

ऐन उन्हाळ्यातही नागवेलीची वेल होईल हिरवीगार! पाने येतील मोठी - चमकदार, भरघोस वाढीसाठी खास उपाय...

how to grow betel leaf plant faster : betel leaf plant care tips : how to make paan leaves bigger and greener : घरगुती उपाय आणि वेळच्यावेळी निगा राखली, तर नागवेलीला भरभरून, मोठी आणि हिरवीगार पानं येऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 11:00 IST2026-03-22T11:00:00+5:302026-03-22T11:00:02+5:30

how to grow betel leaf plant faster : betel leaf plant care tips : how to make paan leaves bigger and greener : घरगुती उपाय आणि वेळच्यावेळी निगा राखली, तर नागवेलीला भरभरून, मोठी आणि हिरवीगार पानं येऊ शकतात.

how to grow betel leaf plant faster betel leaf plant care tips how to make paan leaves bigger and greener | ऐन उन्हाळ्यातही नागवेलीची वेल होईल हिरवीगार! पाने येतील मोठी - चमकदार, भरघोस वाढीसाठी खास उपाय...

ऐन उन्हाळ्यातही नागवेलीची वेल होईल हिरवीगार! पाने येतील मोठी - चमकदार, भरघोस वाढीसाठी खास उपाय...

आपल्या घरातल्या छोट्याशा बागेत नागवेलीचं एखादं छोटसं रोप असणं म्हणजे खास आकर्षणच... आपल्यापैकी बरेचजण मोठ्या हौसेने नागवेलीच्या पानांचा वेल लावतात. पुजेसाठी असो किंवा जेवणानंतरच्या पाचक विड्यासाठी, घरची ताजी आणि रसरशीत पाने मिळण्याचा आनंद काही वेगळाच असतो.ताजीतवानी, हिरवीगार आणि मोठी लांब पानं देणारी नागवेल पाहायला जितकी सुंदर दिसते, तितकीच ती जपणंही महत्त्वाचं असतं. उन्हाळा सुरू झाला की वाढलेलं तापमान, कोरडी हवा आणि बदललेलं वातावरण यामुळे अनेकदा ही नागवेल कोमेजते, पानं लहान राहतात किंवा वाढच खुंटते(how to make paan leaves bigger and greener).

नागवेल हा मुळात 'नाजूक आणि सावलीत वाढणारा' रोपाचा प्रकार आहे. त्याला ना कडक ऊन सोसते, ना पाण्याचा अतिवापर. मग अशावेळी नागवेलीच्या वेलाची काळजी कशी घ्यावी? महागड्या खतांचा वापर न करता, घरात उपलब्ध असलेल्या साध्या पदार्थांपासून या वेलीला पुन्हा 'सुपरफास्ट' वाढण्यास (how to grow betel leaf plant faster) कशी मदत होऊ शकते ते पाहूयात... योग्य काळजी, थोडेसे घरगुती उपाय आणि वेळच्यावेळी निगा राखली, तर नागवेलीला पुन्हा भरभरून, मोठी आणि हिरवीगार पानं (betel leaf plant care tips) येऊ शकतात. यासाठी कोणते सोपे आणि फायदेशीर उपाय करता येतील पाहा...

उन्हाळ्यात नागवेलीच्या वेलीची अशी घ्या काळजी.... 

१. चांगल्या वाढीसाठी जागेची निवड :- पानवेलीच्या उत्तम वाढीसाठी सर्वात आधी योग्य जागेची निवड करणे अत्यंत आवश्यक असते. हे रोप कधीही थेट आणि कडक उन्हात ठेवू नका, अन्यथा त्याची नाजूक पाने जळू शकतात. रोप नेहमी सावली असलेल्या ठिकाणी ठेवावं. प्लास्टिकच्या कुंडीऐवजी मातीच्या कुंडीचा वापर करा. मातीची कुंडी नैसर्गिकरित्या थंड राहते, ज्यामुळे पानवेलीच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते.

तिशी ओलांडताच भारतीय स्त्री-पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट- लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

२. मॉस स्टिकचा आधार द्या :- पानवेल ही वर चढणारी वेल आहे, त्यामुळे तिला वाढण्यासाठी आधाराची गरज असते. यासाठी मॉस स्टिकचा वापर करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. मॉस स्टिक ओलावा टिकवून ठेवते, जो वेलीच्या वाढीसाठी गरजेचा असतो. मॉस स्टिक वेलीला वरच्या दिशेने वाढण्यास मदत करते. जेव्हा वेल या आधाराने वर चढते, तेव्हा तिची मुळे मजबूत होतात. मॉस स्टिकच्या आधारामुळे पानांचा आकार मोठा होतो आणि ती अधिक हिरवीगार दिसू लागतात.

३. मातीची मशागत आणि योग्य पोषण :- रोपाच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी दर १० ते १५ दिवसांतून एकदा मातीची हलकी खुरपणी किंवा मशागत नक्की करा. रोपांच्या मुळांना इजा न होऊ देता माती अलगद मोकळी करुन घ्यावी. माती मोकळी केल्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि पाणी साचून राहत नाही. पानवेलीला ओलावा आवडतो, पण कुंडीत पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्या. माती फक्त ओली असावी, त्यात पाणी साचून राहू नये; अन्यथा वेलीची मुळे सडू शकतात.

शहाळ्यात मलई जास्त की पाणीच? कसं ओळखाल, ५ ट्रिक्स - प्रत्येकवेळी निवडा 'परफेक्ट' शहाळं... 

४. एकाच वेळी लावा २ ते ३ कटिंग्स लावा :- पानवेल दाट आणि भरगच्च करण्यासाठी एक खास पद्धत म्हणजे एकाच कुंडीत दोन ते तीन कटिंग्स लावणे, यामुळे रोप वेगाने पसरते आणि वेल अधिक दाट दिसू लागते. एकापेक्षा जास्त रोपे असल्याने मातीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो, जो पानवेलीच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतो. कटिंग लावताना त्यांच्यामध्ये थोडे अंतर ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रत्येक वेलीला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळेल.

५. रोपाला मिळेल पूर्ण पोषण :- रोपाच्या चांगल्या वाढीसाठी काही पोषक तत्वे अत्यंत आवश्यक असतात. यासाठी एप्सम सॉल्ट (Epsom Salt), ह्युमिक ॲसिड (Humic Acid) आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट (Seaweed Extract) चा स्प्रे रोपासाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करतो. एप्सम सॉल्टमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे पाने हिरवीगार आणि निरोगी होतात. ह्युमिक ॲसिड हे मातीची गुणवत्ता सुधारते आणि रोपाच्या मुळांना पोषण पोहोचवण्यास मदत करते. सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे रोपाच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि मजबूतीसाठी फायदेशीर ठरते.

६. ओलावा आणि पाण्याचे संतुलन :- पानवेलीच्या चांगल्या वाढीसाठी हवेतील ओलावा किंवा दमटपणा खूप फायदेशीर असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी पानांवर पाणी शिंपडा. यामुळे रोपाला थंडावा मिळतो. वेळोवेळी खराब झालेली किंवा पिवळी पडलेली पाने काढून टाका. खराब पाने काढल्यामुळे रोपाची सर्व ऊर्जा नवीन आणि निरोगी पाने वाढवण्यासाठी वापरली जाते.

Web Title : गर्मी में भी पान के बेल को रखें हरा-भरा, अपनाएं ये उपाय।

Web Summary : गर्मी में भी पान के बेल को हरा-भरा रखने के लिए सही जगह चुनें, मॉस स्टिक का उपयोग करें, मिट्टी की उचित देखभाल करें और आवश्यक पोषक तत्व प्रदान करें। नमी बनाए रखें, पीली पत्तियों को हटाएं और बेल को पनपने के लिए कई कटिंग लगाएं।

Web Title : Keep betel vines lush green in summer with these tips.

Web Summary : Grow lush betel leaves even in summer by choosing the right spot, using moss sticks, ensuring proper soil care, and providing essential nutrients. Maintain moisture, remove yellow leaves, and plant multiple cuttings for a thriving vine.