भारतीय परंपरेत, प्रत्येक शुभ कार्यात आणि धार्मिक विधीमध्ये वापरले जाणारे हिरवेगार पान म्हणजे नागवेलीचे... या पानाला धार्मिक महत्व तर आहेच पण सोबतच त्याचे औषधी गुणधर्म आणि इतर फायद्यांमुळे नागवेलीचा वेल प्रत्येकाच्याच बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये असतो. अनेकजण घरात नागवेलीची वेल (Betel Vine) लावण्यास उत्सुक असतात, कारण ही वेल घराला सुंदर आणि हिरवागार (Betel Leaf Bel in Pot at Home) लुक देते. बागकामाची आवड असणाऱ्यांना हा वेल आपल्या घरी लावायची खूप इच्छा असते, पण अनेकांना असे वाटते की नागवेलीचे रोप तयार करणे खूप कठीण असते किंवा त्यासाठी खास रोप नर्सरीमधून आणावे लागते. परंतु, कित्येकजणांना माहीत नसते की, फक्त एका नागवेलीच्या पानापासूनही नवीन वेल तयार करता येतो(How to Grow Betel Leaf Plant).
आपण आपल्या गरजेनुसार वापरलेल्या किंवा बाजारातून आणलेल्या नागवेलीच्या फक्त एका पानापासून देखील त्याची नवी वेल किंवा रोप अगदी सहजपणे तयार करू शकता...फार्मिंग एक्सपर्ट डॉ. अनु धवन यांनी सांगितले आहे की, तुम्ही फक्त नागवेलीच्या एका पानापासून किंवा खोडापासून वेल किंवा रोप सहज लावू शकता, ही वेल अगदी सहजपणे वाढते. फक्त तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नागवेलीच्या एका पानापासून भरपूर हिरवीगार पाने देणारा वेल किंवा रोप नेमकं (how to propagate betel leaf plant from cutting) घरच्याघरीच कसं लावायचं ते पाहूयात.
१. नागवेलीच्या एका पानापासून वेल कसा लावायचा ?
नागवेलीचा वेल उगवण्यासाठी तुम्हाला रोप विकत घेण्याची गरज नाही. डॉ. अनु धवन यांच्या मते, नागवेल फक्त एका पानापासून किंवा खोडाच्या कटिंगपासून देखील उगवता येते. एका निरोगी आणि चांगल्या वेलीतून अशी खोडाची कटिंग घ्या, ज्यावर किमान एक नोड आणि एक पान असेल. आता एका कपमध्ये पाणी भरा आणि नागवेलीच्या पानाची देठ पूर्णपणे पाण्यात बुडवून १० ते १५ दिवसांसाठी ठेवा. १० ते १५ दिवसानंतर तुम्ही पाहाल की देठातून मुळे बाहेर येऊ लागतील.
२. मातीची योग्य निवड...
नागवेलीच्या वेलीला ओलावा गरजेचा असला तरी, मातीत पाणी साचून राहू नये. पाणी साचल्यामुळे त्याची मुळे सडू शकतात, जे कोणत्याही रोपासाठी सर्वात घातक असते. मातीमध्ये जास्त प्रमाणात वाळू मिसळा. तुम्ही ५०% माती, ३०% कंपोस्ट खत (उदा. व्हर्मीकंपोस्ट किंवा जुने शेणखत) आणि २०% वाळू कोकोपीट घेऊ शकता. कुंडीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज होल असल्याची खात्री करा. रोप लावण्यासाठी प्लॅस्टिकची किंवा मातीची कोणतीही कुंडी चालेल, फक्त त्यामध्ये पाण्याचा निचरा चांगला व्हायला हवा. कुंडीचे ड्रेनेज होल बंद होणार नाही याची काळजी घ्या. यासाठी, माती भरण्यापूर्वी तुम्ही त्या छिद्रावर छोटे खडे ठेवून ते कव्हर करू शकता.
३. ही चूक टाळा...
नागवेलीची वेल किंवा रोप थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका, यामुळे वेल लगेच सुकून जातो. नागवेलीची वेल नेहमी हलकासा सूर्यप्रकाश आणि सावली असलेल्या भागातच ठेवावे. थेट आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे तिची नाजूक पाने जळू शकतात, ज्यामुळे रोप लवकर सुकते. त्यामुळे कुंडी ठेवण्याच्या जागेची विशेष काळजी घ्या.
४. मातीतील ओलावा टिकवून ठेवणे...
नागवेलीच्या वाढीसाठी सतत ओलाव्याची आवश्यकता असते. हे एक ट्रॉपिकल रोप असल्यामुळे याला जास्त आर्द्रता लागते. माती कधीही पूर्णपणे सुकू देऊ नका, त्यात नेहमी हलका ओलावा टिकवून ठेवा. याचबरोबर, मॉस ग्रास स्टिक (Moss Grass Stick) देखील लावू शकता. नागवेल ही वरच्या दिशेने वाढत जाणारी व चढणारी वेल असल्यामुळे, जेव्हा ती मॉस स्टिकवर चढते, तेव्हा स्टिकमधील ओलावा शोषून घेत राहते. यामुळे वेल नेहमी हायड्रेटेड राहते आणि वेगाने वाढते.
