Lokmat Sakhi >Gardening > ऐन पावसाळ्यात तुळस सुकली? तुळस बहरेल- चहा झाल्यावर चहापत्तीचा करा ‘असा’ सोपा वापर

ऐन पावसाळ्यात तुळस सुकली? तुळस बहरेल- चहा झाल्यावर चहापत्तीचा करा ‘असा’ सोपा वापर

How to Grow and Care for Basil Plants in Monsoon—Indoors and Outside : पावसाळ्यात तुळशीच्या रोपाची कशी काळजी घ्यायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 05:23 PM2024-06-17T17:23:07+5:302024-06-17T17:25:18+5:30

How to Grow and Care for Basil Plants in Monsoon—Indoors and Outside : पावसाळ्यात तुळशीच्या रोपाची कशी काळजी घ्यायची?

How to Grow and Care for Basil Plants in Monsoon—Indoors and Outside | ऐन पावसाळ्यात तुळस सुकली? तुळस बहरेल- चहा झाल्यावर चहापत्तीचा करा ‘असा’ सोपा वापर

ऐन पावसाळ्यात तुळस सुकली? तुळस बहरेल- चहा झाल्यावर चहापत्तीचा करा ‘असा’ सोपा वापर

गार्डनिंगची आवड असो किंवा नसो, आपल्या प्रत्येकाच्या घरात एक लहान तुळस असतेच (Basil Leaves). तुळशीच्या रोपाचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक ऋतूनुसार तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यायला हवी (Gardening Tips). पाणी, उन, वारा, आणि खत वेळोवेळी तुळशीच्या रोपाला द्यायला हवे (Tulsi Plant). काही घरांमध्ये पावसाळा असूनही तुळस कोमेजलेली दिसते.

तुळशीच्या रोपाची पानं एकत्र गळून पडतात, किंवा सुकून काळपट हिरव्या रंगाची झालेली असतात. जर तुमच्याही तुळशीच्या रोपाची अशी अवस्था झाली असेल तर, काही गोष्टी फॉलो करून पाहा. तुळस पुन्हा नव्याने बहरेल, शिवाय पावसाळ्यात तिची वाढ खुंटणार नाही. पण पावसाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी? पाहूयात(How to Grow and Care for Basil Plants in Monsoon—Indoors and Outside).

पावसाळ्यात तुळशीच्या रोपाची कशी काळजी घ्याल ?

- तुळशीचे रोपटे अनेक कारणांमुळे सुकते. तुळशीच्या रोपावर लहान फुलं येतात, ही फुलं वेळीच तोडावे. यामुळे रोपाची वाढ खुंटते. तुळशीच्या रोपाची फुलं तोडल्यानंतर त्या जागी नवी पालवी फुटेल.

गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट

- तुळशीच्या कुंडीत बऱ्याचदा कचरा साचतो, पिवळी पडलेली पानं गळून कुंडीत पडतात. ती वेळीच साफ करून घेणं गरजेचं आहे.

- तुळशीच्या कुंडीत जास्त पाणी घालू नका. उन्हाळा असो किंवा पावसाळा, तुळशीच्या कुंडीत जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही. जास्त पाणी घातल्यावर रोप खराब होऊ शकते. तेव्हा हवे तेवढेच पाणी घाला.

- पावसाळ्यात तुळशीला योग्य सूर्यप्रकाश मिळत  नाही. अशावेळी कुंडीत पाणी कमी घाला. पाणी जास्त आणि सूर्यप्रकाश जास्त मिळाल्याने कुंडीतली माती कुजायला लागते.

सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..

- महिन्याला कुंडीतल्या मातीत खत मिसळा. आपण शेणखताचा देखील वापर करू शकता. यामुळे तुळशीच्या रोपाची योग्य वाढ होण्यास मदत होईल.

- जर शेणखत उपलब्ध नसेल तर, आपण उरलेल्या चहापत्तीचा देखील वापर करू शकता. याच्या वापरानेही तुळशीच्या रोपाची योग्य वाढ होईल.

Web Title: How to Grow and Care for Basil Plants in Monsoon—Indoors and Outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.