Join us

बदामाची रोपं तयार करण्याची पाहा सोपी, भन्नाट युक्ती, घरच्याघरी करावा असा आनंदी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:11 IST

Best & Easy Method to grow an Almond tree : बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. बदामामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात, ज्यामुळे थकवा दूर होतो.  

चांगल्या आरोग्यासाठी नेहमची काजू, बदाम, पिस्ता यांसारखे ड्रायफ्रट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात बदाम खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Gardening Tips) पण आपण जे पदार्थ बाहेरून आणतो. त्याच अनेकदा भेसळ झालेली असू शकते.  त्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून घरच्याघरी  बदामाचं झाड लावण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to grow almond plant at home)

 बदाम खाण्याचे फायदे

1) बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. बदामामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात, ज्यामुळे थकवा दूर होतो.

2)  जे लोक रोज बदाम खातात त्यांची हाडे देखील मजबूत असतात (Keeps Bone Healthy). बदाम हा कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषणाचा चांगला स्रोत आहे. बदाम खाल्ल्याने मुलांची हाडे मजबूत होतात.

3) बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, प्रथिने, तांबे, फायबर आणि झिंक देखील भरपूर असतात.

4) बदाम खाल्ल्याने मुलांच्या मेंदूचा विकास होतो. यामुळे IQ पातळी वाढते आणि मेंदूच्या पेशींची दुरुस्ती होण्यास मदत होते. रोज बदाम खाल्ल्याने आयक्यू लेव्हल देखील वाढते.

टॅग्स :बागकाम टिप्स