Join us

कुंडीत लावा 'हे' ऑल स्पाईस, भाजीत एक पान घातलं तरी भाजी होईल चविष्ट -सुगंध घरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 18:28 IST

How To Grow Allspice Plant In Pot: मसालेदार स्वयंपाक करायचा असेल तेव्हा या खास रोपाचं एक पान तोडून फक्त तुमच्या भाज्यांमध्ये टाका. इतर कोणत्याही मसाल्याची गरज पडणार नाही..(gardening tips for growing allspice plant)

ठळक मुद्देसध्या ऑलस्पाईस या रोपाची लोकप्रियता खूप वाढते. या ५ मसाल्याच्या पदार्थांचं काम हे रोप एकटंच करतं.

मसालेदार चवदार पदार्थ खायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. आता आपल्या रोजच्या भाज्याही चवदार होण्यासाठी त्यांच्यात आपण थोडा मसाला टाकतोच. कधी कधी जेव्हा भरपूर सवड असते तेव्हा मग चांगली वाटूनघाटून मसालेदार भाजी करतो. पण अशी भाजी रोज करणं शक्य नसतं. कारण आपल्याकडे तेवढा वेळच नसतो. म्हणूनच मग हे एक रोप तुमच्या बाल्कनीतल्या, अंगणातल्या कुंडीमध्ये लावून टाका. यामुळे रोजच्यारोज तुम्हाला छान मसाल्याचा सुगंध असणाऱ्या चवदार खायला मिळतील आणि शिवाय त्या करण्यासाठी खूप वेळही लागणार नाही (How To Grow Allspice Plant In Pot?). या खास मसालेदार रोपांचं नाव आहे ऑलस्पाईस प्लांट..(gardening tips for growing allspice plant)

 

ऑलस्पाईस प्लांट कसं लावायचं?

सध्या ऑलस्पाईस या रोपाची लोकप्रियता खूप वाढते. कारण या रोपांचं वैशिष्ट्य असं की या रोपाचं एक पान जरी तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकलं तरी त्या भाजीला जायफळ, जावित्री, लवंग, वेलची आणि मिरे यांचा सुगंध येतो. या ५ मसाल्याच्या पदार्थांचं काम हे रोप एकटंच करतं.

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही मेंदू कुजतोय! कसा ओळखाल तुमचा ब्रेन रॉट नावाचा आजार

हे झाड तसं मुळचं अमेरिका आणि वेस्टइंडीजचं आहे. पण या रोपाला सध्या भारतातही खूप मागणी आहे. हे रोप अतिशय उंच वाढतं, पण ते तुम्ही एखाद्या मोठ्या आकाराच्या कुंडीतही लावू शकता. तसेच हे रोप ४ ते ५ तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवावं आणि त्याला खूप जास्त पाणी घालणं टाळावं. माती ओलसर राहील एवढं पाणी त्याला पुरेसं आहे. शेणखत आणि गांडूळ खत दिल्यास या रोपाची वाढ आणखी जोमात होते.

 

या रोपाचा उपयोग फक्त स्वयंपाक अधिक चवदार होण्यासाठीच होतो, असं नाही. या रोपामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत.

खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच......

डोकं दुखत असेल, स्नायू आखडून गेले असतील किंवा दात दुखत असतील तर या पानांचा रस ते दुखणं कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. त्यामुळे हे रोप वेदनाशामक म्हणूनही ओळखलं जातं. शरीरावर एखाद्या ठिकाणी आलेली सूज कमी करण्यासाठी तसेच अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठीही ऑलस्पाईसचा उपयोग होतो. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सकिचन टिप्सअन्न