Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > भर उन्हाळ्यातही जास्वंदाला येतील फुलंच - फुलं! मातीत मिसळा चमचाभर घरगुती खतं - रोपं बहरेल, वाढेल जोमाने...

भर उन्हाळ्यातही जास्वंदाला येतील फुलंच - फुलं! मातीत मिसळा चमचाभर घरगुती खतं - रोपं बहरेल, वाढेल जोमाने...

hibiscus plant care in summer : how to get more hibiscus flowers : अगदी उन्हाळ्यातही जास्वंदाचे रोप भरपूर फुलांनी बहरलेले दिसण्यासाठी आजच करुन पाहा ही खास ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2026 10:30 IST2026-03-01T10:30:00+5:302026-03-01T10:30:03+5:30

hibiscus plant care in summer : how to get more hibiscus flowers : अगदी उन्हाळ्यातही जास्वंदाचे रोप भरपूर फुलांनी बहरलेले दिसण्यासाठी आजच करुन पाहा ही खास ट्रिक...

how to get more hibiscus flowers hibiscus plant care in summer homemade fertilizer for hibiscus | भर उन्हाळ्यातही जास्वंदाला येतील फुलंच - फुलं! मातीत मिसळा चमचाभर घरगुती खतं - रोपं बहरेल, वाढेल जोमाने...

भर उन्हाळ्यातही जास्वंदाला येतील फुलंच - फुलं! मातीत मिसळा चमचाभर घरगुती खतं - रोपं बहरेल, वाढेल जोमाने...

उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्यापैकी प्रत्येकाला रोपांना नेमकं उन्हापासून कसं जपायचं याची काळजी वाटते. कडकडीत, रणरणत्या उन्हापासून आपल्या बागेतील रोपांच रक्षण करणं म्हणजे मोठं अवघड काम... यातही मोगरा, गुलाब, जास्वंद यांसारखी नाजूक फुलझाड असतील तर मग काय पाहायलाच नको... वाढत्या उन्हाच्या तडाख्याने फुलझाड अगदी लगेच कोमेजून जातात किंवा रोपाला फुल येण्याचे प्रमाण कमी होते. इतकंच नाही तर उन्हाळ्यात फुलझाडांची वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर रोपावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो...(hibiscus plant care in summer).

उन्हाळ्यात विशेषतः जास्वंदाचे रोप योग्य काळजी न घेतल्यास फुलं कमी येणे, पानं पिवळी पडणे किंवा रोपाची वाढ खुंटणे अशा अनेक समस्या निर्माण होतात... परंतु याउलट जर योग्य पाणी, खत आणि काही सोप्या गार्डनिंग टिप्सचा वापर केला, तर अगदी उन्हाळ्यातही जास्वंदाचे रोप भरपूर फुलांनी बहरलेले दिसू शकते. जास्वंदीच्या लालचुटुक फुलांचा मोह (homemade fertilizer for hibiscus) कुणालाही आवरता येत नसल्याने, बऱ्याचजणांकडे जास्वंदीच्या फुलांचे एक तरी रोप असते. परंतु उन्हाळ्यात या रोपाची नेमकी कोणती काळजी द्यावी, किती पाणी द्यावे, कोणते घरगुती खत वापरावे आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी काय करावे यासाठी काही खास टिप्स पाहूयात... 

उन्हाळ्यात जास्वंदीच्या रोपाची नेमकी काळजी कशी घ्यावी ? 

१. सूर्यप्रकाशाची योग्य निवड :- जास्वंदीच्या रोपाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. याचाच अर्थ असा की, त्याची चांगली वाढ होण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी त्याला भरपूर ऊन लागते. उन्हाळ्याच्या दिवसांत हे रोप अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्याला दिवसातील कमीतकमी ८ तास थेट सूर्यप्रकाश मिळेल. जेव्हा रोपाला पुरेसा प्रकाश मिळतो, तेव्हाच ते आपली ऊर्जा व्यवस्थित तयार करू शकते आणि झाडाला कळ्या लागण्यास मदत होते.

२. प्रूनिंग आणि साफ-सफाई :- जर तुम्ही अजूनही तुमच्या रोपाची छाटणी केली नसेल, तर ती योग्य वेळी करावी. रोपाच्या सुकलेल्या किंवा निर्जीव फांद्या कापून टाका, जेणेकरून नवीन फांद्या फुटण्यास वाव मिळेल. यासोबतच, कुंडीतील माती वर - खाली करून थोडी मोकळी करावी आणि तिथे उगवलेले गवत किंवा तण काढून टाका. माती मोकळी केल्यामुळे मुळांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो, ज्यामुळे रोपाची वाढ जोमाने होते.

तुळशीच्या रोपाला पाणीच नाही तर घाला चमचाभर मीठही! तुळस छान वाढण्यासाठी करुन पाहा उपाय...

एजलेस फिटनेस! मलायका अरोरा रोज फक्त १० मिनिटं करते १ चायनीज एक्सरसाइज - पन्नाशीतही दिसते स्लिम - फिट... 

३. पाणी देण्याचा योग्य नियम :- उन्हाळ्यात अनेकदा आपण रोपाला वारंवार पाणी घालतो, ज्यामुळे 'ओवरवॉटरिंग'ची समस्या निर्माण होते आणि मुळे सडू लागतात. पाणी देण्याची खरी पद्धत अशी आहे की, जेव्हा कुंडीतील वरचा १ ते १.५ इंच मातीचा थर कोरडा असेल तेव्हाच पाणी घालावे. मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवावा, पण मातीचा चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी.

४. कीड - अळ्या होऊ नये म्हणून :- जास्वंदाच्या रोपावर अनेकदा पांढरी कीड किंवा अळ्या होतात. यापासून बचावासाठी एक लिटर पाण्यात ८ मिली कडुलिंबाचे तेल मिसळा. या मिश्रणाची दर १० दिवसांच्या अंतराने रोपावर फवारणी करा. फवारणी करताना स्प्रे बाटलीचा पाण्याचा दाब जोरात ठेवा, जेणेकरून फांद्यांवर चिकटलेली कीड निघून जाईल. हे रोपांसाठी एक सुरक्षित आणि नैसर्गिक कीटकनाशक आहे.

कुरमुऱ्याची भेळ नाही करा इन्स्टंट उत्तप्पा! ना पीठ आंबवण्याची कटकट, ना डाळ - तांदूळ वाटण्याची झंझट - चविष्ट रेसिपी...

५. उन्हाळ्यापूर्वी रोपाला घाला हे खत :- १ लिटर पाण्यात १०० ग्रॅम मोहरीची पेंड मिसळा. हे मिश्रण झाकून ५ दिवसांसाठी सावलीच्या ठिकाणी ठेवून द्या. ५ दिवसांनंतर हे तयार झालेले दाट द्रावण १ लिटर साध्या पाण्यात मिसळून पातळ करून घ्या. हे लिक्विड खत अधिक चांगले आणि फायदेशीर होण्यासाठी त्यात एक चमचा चहापत्ती आणि एक चमचा केळ्याच्या सालीची पावडर टाका. आता हे तयार लिक्विड फर्टिलायझर २०० मिली प्रमाण प्रत्येक कुंडीतील मातीत घाला. हे खत जास्वंदाला ती सर्व पोषक तत्वे देईल, जी मोठी आणि चमकदार फुले येण्यासाठी आवश्यक असतात.

Web Title : गर्मी में भी पाएं जासवंद के ढेर सारे फूल, डालें ये खाद!

Web Summary : गर्मी में जासवंद के पौधों को धूप, छंटाई और पानी से बचाएं। सरसों की खली, चाय पत्ती और केले के छिलके से बनी खाद का प्रयोग करें। नीम का तेल कीटों से बचाता है।

Web Title : Get abundant hibiscus blooms even in summer with homemade fertilizer!

Web Summary : Protect hibiscus plants from summer heat with proper sunlight, pruning, and watering. Use homemade fertilizer with mustard cake, tea leaves, and banana peel for abundant blooms. Neem oil spray prevents pests.