Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > थंडीत मोगऱ्यांच्या रोपाला लवकर फुलं येण्यासाठी ५ गोष्टी करा; भरगच्च फुलं येतील- सुगंध दरवळेल

थंडीत मोगऱ्यांच्या रोपाला लवकर फुलं येण्यासाठी ५ गोष्टी करा; भरगच्च फुलं येतील- सुगंध दरवळेल

How To Get Mogra Plant Bloom Faster in Winter : उष्ण हवामानात मोगऱ्याची वाढ खूप चांगली होते, पण थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान खाली येते, तेव्हा अनेकदा रोपाची वाढ खुंटते आणि फुलं येणे थांबते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:22 IST2025-11-12T16:41:43+5:302025-11-12T17:22:06+5:30

How To Get Mogra Plant Bloom Faster in Winter : उष्ण हवामानात मोगऱ्याची वाढ खूप चांगली होते, पण थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान खाली येते, तेव्हा अनेकदा रोपाची वाढ खुंटते आणि फुलं येणे थांबते.

How To Get Mogra Plant Bloom Faster in Winter : How To Make Mogra Plant Bloom Faster | थंडीत मोगऱ्यांच्या रोपाला लवकर फुलं येण्यासाठी ५ गोष्टी करा; भरगच्च फुलं येतील- सुगंध दरवळेल

थंडीत मोगऱ्यांच्या रोपाला लवकर फुलं येण्यासाठी ५ गोष्टी करा; भरगच्च फुलं येतील- सुगंध दरवळेल

घरात फुल झाडं लावण्याची हौस अनेकांना असते. पण रोपाला व्यव्सथित फुलं येत नाहीत, पानं गळून पडतात, पानं पिवळी पडतात म्हणून बरेच लोक आवड असूनही घरात किंवा बाल्कनीत फुलांची रोप लावतच नाही. मोगरा  हे त्याच्या सुगंधासाठी ओळखले जाणारे एक सुंदर फुल आहे. (How To Get Mogra Plant Bloom Faster in Winter)

उष्ण हवामानात मोगऱ्याची वाढ खूप चांगली होते, पण थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान खाली येते, तेव्हा अनेकदा रोपाची वाढ खुंटते आणि फुलं येणे थांबते. जर तुम्ही थंडीत मोगऱ्याचे रोप घरी लावले असेल आणि त्याला लवकर फुलं यावीत असे वाटत असेल, तर खालील काही महत्त्वाच्या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतील. (How To Make Mogra Plant Bloom Faster)

योग्य जागा आणि सूर्यप्रकाश 

मोगऱ्याला फुलं येण्यासाठी कमीतकमी ६ ते ८ तास थेट सूर्यप्रकाशाची गरज असते. थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे रोपाला घरात किंवा बागेत अशा ठिकाणी ठेवा, जिथे सर्वात जास्त आणि थेट ऊन मिळेल. थंडीच्या लाटेपासून त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. रोप खिडकीजवळ किंवा बाल्कनीच्या पूर्व-दक्षिण दिशेला ठेवा.

पाणी व्यवस्थापन 

थंडीच्या काळात पाण्याची गरज कमी होते. जास्त पाणी दिल्यास मुळं कुजण्याची (Root Rot) शक्यता असते. त्यामुळे माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या. पाण्याचा निचरा योग्य होतोय याची खात्री करा. पाऊस आणि अति थंडीच्या दिवसांत पाण्याचे प्रमाण खूप कमी ठेवा.

नियमित छाटणी 

फुलं येण्याचा वेग वाढवण्यासाठी आणि रोपाला योग्य आकार देण्यासाठी थंडीनंतर किंवा अगदी थंडीच्या शेवटी हलकी छाटणी (Light Pruning) करणे आवश्यक आहे. जुन्या आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकल्यास नवीन वाढ जोमाने सुरू होते आणि नवीन फांद्यांवरच फुलं येतात.

खतांचा योग्य वापर 

मोगऱ्याला फुलं येण्यासाठी फॉस्फरसआणि पोटॅशियम युक्त खतांची गरज असते. थंडीत रासायनिक खतांचा वापर टाळा. त्याऐवजी, सेंद्रिय खते जसे की शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि विशेषतः केळीच्या सालीचे खत जे पोटॅशियममध्ये समृद्ध असते. महिन्यातून एकदा द्या. यामुळे फुलं लवकर आणि मोठ्या प्रमाणात येतात. फुलं येणे सुरू झाल्यावर दर १५ दिवसांनी चहापत्तीचा खत म्हणून वापर करा.

रोपाला तापमान द्या
 
जर तुमच्या भागात थंडी खूप जास्त असेल, तर रात्रीच्या वेळी रोपाला प्लास्टिकच्या आच्छादनाने  झाका. यामुळे रोपाभोवतीचे तापमान थोडे नियंत्रित राहते आणि फुलं येण्याची प्रक्रिया खंडित होत नाही. या टिप्सचे पालन केल्यास, तुमचे मोगऱ्याचे रोप थंडीच्या काळातही लवकर फुलं देऊ लागेल आणि तुमच्या घराला त्याच्या सुगंधाने दरवळून टाकेल.

Web Title : सर्दियों में मोगरा को जल्दी खिलाएं: 5 आवश्यक टिप्स

Web Summary : सर्दियों में भी मोगरा के सुगंधित फूल चाहिए? धूप सुनिश्चित करें, पानी नियंत्रित करें, हल्की छंटाई करें, पोटाश युक्त उर्वरक का उपयोग करें और अत्यधिक ठंड से बचाएं। ये युक्तियाँ तेजी से फूलने को प्रोत्साहित करती हैं।

Web Title : Get Mogra to Bloom Faster in Winter: 5 Essential Tips

Web Summary : Want fragrant Mogra blooms even in winter? Ensure sunlight, control watering, prune lightly, use potassium-rich fertilizer, and protect from extreme cold. These tips encourage faster flowering.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.