Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामातही मोगऱ्याला फुलंच नाहीत? लगेच करा 'हा' उपाय- ८ दिवसांत फुलांनी डवरून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 15:21 IST

Gardening Tips for Mogra Plant: उन्हाळा हा मोगऱ्याचा बहरण्याचा काळ. या दिवसांतही मोगऱ्याला कळ्या येत नसतील तर पुढे सांगितलेला उपाय करून पाहाच..(how to get maximum flowers from mogra?)

प्रत्येक रोपाचा बहरण्याचा एक काळ असतो. तो ऋतू आला की ते रोप कसं मस्त बहरुन येतं. त्याला फुलंही भरपूर येतात. असंच माेगऱ्याच्या बाबतीतही आहे. मोगऱ्याचा बहरण्याचा काळ म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात मोगरा छान फुलून येतो. त्यात टपोरी फुलं येतात आणि त्याच्या घमघमाटाने आपलं घर, अंगण प्रसन्न होऊन जातं. पण आता उन्हाळ्याला पुरती सुरुवात होऊनही तुमच्याकडच्या मोगऱ्याला बहर आलाच नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय लगेच करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळं घरगुती साहित्यच लागणार आाहे.(how to get maximum flowers from mogra?)

 

मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

मोगऱ्याला भरपूर कळ्या, फुलं येण्यासाठी त्याला कोणतं खत द्यायला हवं याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ r_vgarden या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की १ लीटर पाणी घ्या. त्या पाण्यात १ चमचा दही आणि १ टीस्पून चुना घाला. चुना आणि दही पाण्यात व्यवस्थित विरघळल्यानंतर हे पाणी मोगऱ्याला द्या. थोडं पाणी रोपावरही शिंपडा. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. यामुळे मोगऱ्याची खूप वाढ होईल आणि त्याला भरपूर कळ्या, फुलंही येतील.

 

हे उपायही करून पाहा..

१ चमचा एप्सम सॉल्ट घ्या आणि ते १ लीटर पाण्यात मिसळा. हे पाणी मोगऱ्याच्या रोपावर शिंपडा. तसेच कुंडीतल्या मातीमध्येही घाला. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा.. मोगरा छान बहरेल.

एवढीशी खारीक शरीराला देते ४ मोठे फायदे! घरातल्या सगळ्यांसह आईने तर खायलाच हवी कारण..

केळीचं सालं पाण्यात भिजत घाला. १० ते १२ तासांनी पाणी गाळून घ्या. त्यात आणखी थोडं साधं पाणी घाला आणि हे पाणी मोगऱ्याला द्या. फुलं भरपूर येतील आणि त्यांचा आकारही छान टपोरा होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : No Mogra flowers in season? Try this for abundant blooms!

Web Summary : Mogra not blooming despite the season? Use this simple home remedy. A mixture of curd, lime, and water, applied weekly, promotes growth and flowering. Epsom salt solution and banana peel water are also effective for abundant, large flowers.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीफुलं