Join us

मोगऱ्याला फुलं खूपच कमी येतात? ५ रूपयांची 'ही' पांढरी वस्तू कुंडीत घाला, फुलांनी वाकेल झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:56 IST

How To Get Jasmin Plant to Bloom , Mogra Plant Gardening Tips (Mograyala phule yenyasatho upay) : गार्डर्निंगचे काही सोपे हॅक्स तुम्ही वापरले तर मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुलं येतील.

बरेचजण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणात मोगऱ्याच छोटं रोप लावतात. मोगऱ्याच्या फुलानं घर प्रसन्न राहतं आणि सुवासानं  आजूबाजूचा परीसरही प्रफुल्लीत राहतो. अनेकदा असं दिसून येतं की घरी लावलेल्या मोगऱ्याच्या रोपाला फुलंच येत नाहीत फक्त पानंच दिसून येतात. गार्डर्निंगचे काही सोपे हॅक्स तुम्ही वापरले तर मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुलं येतील. फक्त ५ रूपयांत मिळणारी १ वस्तू वापरून तुम्ही बाल्कनी फुलवू शकता.(How To Get Mogra Plant To Bloom Just 5 Rupees)

मोगऱ्याच्या कुंडीत खडू मिसळा (How Do I Get Indoor Jasmin To Flower)

खडूचा बारीक चुरा करून तो मातीमध्ये मिसळा.यामुळे मातीचा pH पातळी संतुलित राहण्यास मदत होते. ज्यामुळे रोप पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते.खूड दोन पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. पाण्यात विरघळवून वापरा.त्यासाठी एक ग्लास पाण्यात एक किंवा दोन खडू रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रोपाला द्या. हे पाणी रोपासाठी नैसर्गिक कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून काम करते.

खडूचा तुकडा मातीत ठेवूनही तुम्ही वापरू शकता. तुम्ही खडूचा एक मोठा तुकडा रोपाच्या कुंडीतील मातीच्या भागावर किंवा थोडासा आत दाबून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही रोपाला पाणी द्याल, तेव्हा हळूहळू खडू विरघळेल आणि कॅल्शियम मातीत मिसळेल. मोगऱ्याला थोडीशी आम्लयुक्त (acidic) माती योग्य ठरते.जर माती जास्त आम्लयुक्त असेल, तर खडू तिचा pH संतुलित ठेवण्यास मदत करतो. कॅल्शियममुळे रोपाला अधिक फुलं येतात आणि ती मोठी व निरोगी होतात.

नैसर्गिक खतांचा वापर

१) वापरलेली चहा पावडर धुऊन सुकवून ती रोपाच्या मातीत मिसळा. चहा पावडरमध्ये नायट्रोजन असते जे रोपाच्या वाढीसाठी आणि फुलं येण्यासाठी मदत करते.

२) केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम (Potassium) भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियममुळे फुलं आणि फळं जास्त येतात. केळीच्या साली बारीक तुकडे करून मातीत मिसळा किंवा पाण्यात रात्रभर भिजवून ते पाणी रोपाला द्या.

३) कांद्याच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्वे असतात. कांद्याच्या साली पाण्यात भिजवून ते पाणी रोपाला दिल्यास रोपाची वाढ चांगली होते. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स