Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानूवर्षे वाट पाहूनही ब्रह्मकमळाला फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा २ घरगुती पदार्थ - उमलतील भरपूर ब्रह्मकमळं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 16:55 IST

how to get flowers on brahma kamal plant : how to make brahma kamal plant bloom faster at home : ब्रह्मकमळाचं रोप लावून अनेक वर्ष झाली तरीही कळ्या - फुलं येतचं नसतील तर करावा असा उपाय...

घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ब्रह्मकमळ लावण्याची आवड अनेकांना असते, कारण त्याचं सुंदर आणि दुर्मिळ फुल उमलताना पाहणं हा एक खास अनुभव असतो. पण अनेकदा असं होतं की रोप छान वाढतं, पानं हिरवीगार दिसतात, तरीही त्याला कळ्या किंवा फुलं येत नाहीत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो, नेमकं चुकतंय कुठे? रात्रीच्या वेळी उमलणारे हे सुगंधी फूल पाहणे, हे कोणत्याही निसर्गप्रेमीसाठी मोठ्या आनंदापेक्षा कमी नाही. पण वर्षानुवर्षे वाट पाहूनही रोपाला एकही कळी किंवा फूल येत नाही अशा परिस्थितीत फारच हिरमोड होतो. खरंतर ब्रह्मकमळाच्या रोपाला योग्य काळजीसोबत योग्य माती आणि पोषण मिळणं खूप महत्त्वाचं असतं(brahma kamal plant growing tips).

रोपाला फक्त पाणी घालून किंवा उन्हात ठेवून चालत नाही, तर मातीत काही विशिष्ट पोषक घटक मिसळले तरच रोपाला कळ्या - फुल  येण्यास मदत होते. योग्य खतं आणि नैसर्गिक घटकांचा (how to make brahma kamal plant bloom faster at home) वापर केल्यास रोप निरोगी राहून त्याला भरपूर कळ्या (how to get flowers on brahma kamal plant) येऊ शकतात. जर तुमच्याही ब्रह्मकमळाच्या रोपाची वाढ खुंटली असेल, तर स्वयंपाकघरातीलच काही साध्या गोष्टी मातीत मिसळल्याने या रोपाला पुन्हा बहर आणू शकता... यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात. 

ब्रह्मकमळाच्या रोपाला कळ्या आणि फुलांचा बहर येण्यासाठी उपाय... 

ब्रह्मकमळाच्या रोपाला कळ्या आणि फुलांचा बहर येण्यासाठी घरगुती उपायांमध्ये आपल्याला कुंडीतील थोडीशी माती, १ टेबलस्पून एप्समसॉल्ट, १ टेबलस्पून सुकलेल्या केळीच्या सालींची पावडर इतक्या गोष्टींची गरज लागणार आहे. हा घरगुती नैसर्गिक उपाय Simple Gardening Marathi Rajashri या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

आई - आजीच्या हातचं  कैरीचे पन्हे कसे मस्त लागते, पाहा पारंपरिक चवीसाठी ७ सिक्रेट टिप्स... 

नेमका उपाय काय करायचा आहे ? 

सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये कुंडीतील थोडीशी माती घेऊन त्यात प्रत्येकी  टेबलस्पून एप्समसॉल्ट, १ टेबलस्पून सुकलेल्या केळीच्या सालींची पावडर घालावी. हे सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रण ब्रह्मकमळाचे रोप लावलेल्या कुंडीतील मातीत मिसळून घ्यावं. 

जिमला न जाताच कपिल शर्मा 'असा' झाला फिट! ६३ दिवसांत ११ किलो वेटलॉस करण्याचं सिक्रेट - पाहा नेमकं करायचं काय? 

हा उपाय करण्याचे फायदे... 

१. केळीची सालं :- केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. फुलांच्या झाडांना कळ्या लागण्यासाठी आणि फुलांचा आकार मोठा होण्यासाठी पोटॅशियम अत्यंत आवश्यक असते. केळीच्या सालींच्या पावडरमुळे रोपाला हे पोषण हळूहळू आणि नैसर्गिकरीत्या मिळते.

२. एप्सम सॉल्ट :- एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे पानांमधील 'क्लोरोफिल' वाढते, ज्यामुळे पाने अधिक हिरवीगार होतात. तर सल्फरमुळे रोपाची मूळ मजबूत होऊन त्याची चांगली वाढ होऊन त्याला कळ्या धरण्याची ताकद मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Brahma Kamal Not Flowering? Use These 2 Kitchen Items!

Web Summary : Struggling to get your Brahma Kamal to bloom? Mix Epsom salt and banana peel powder into the soil. This provides essential nutrients like potassium and magnesium, promoting healthy growth and abundant flowering. Revive your plant with these simple kitchen ingredients.
टॅग्स :बागकाम टिप्सहोम रेमेडीपाणीइनडोअर प्लाण्ट्स