Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > व्हॅलेण्टाइन्स डे पूर्वी गुलाबाच्या रोपाला येतील लालचुटुक फुले! रुपयाही खर्च न करता, करा ८ उपाय - मोजताही येणार नाहीत इतकी फुलं...

व्हॅलेण्टाइन्स डे पूर्वी गुलाबाच्या रोपाला येतील लालचुटुक फुले! रुपयाही खर्च न करता, करा ८ उपाय - मोजताही येणार नाहीत इतकी फुलं...

how to boost rose flowering : valentine special rose growing tips : grow red roses at home for valentine day : कुंडीतील गुलाबाला नर्सरीसारखी फुले हवीत? मग आजच करा सोपे ८ घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2026 13:40 IST2026-02-06T13:40:00+5:302026-02-06T13:40:02+5:30

how to boost rose flowering : valentine special rose growing tips : grow red roses at home for valentine day : कुंडीतील गुलाबाला नर्सरीसारखी फुले हवीत? मग आजच करा सोपे ८ घरगुती उपाय...

how to boost rose flowering valentine special rose growing tips grow red roses at home for valentine day | व्हॅलेण्टाइन्स डे पूर्वी गुलाबाच्या रोपाला येतील लालचुटुक फुले! रुपयाही खर्च न करता, करा ८ उपाय - मोजताही येणार नाहीत इतकी फुलं...

व्हॅलेण्टाइन्स डे पूर्वी गुलाबाच्या रोपाला येतील लालचुटुक फुले! रुपयाही खर्च न करता, करा ८ उपाय - मोजताही येणार नाहीत इतकी फुलं...

व्हॅलेण्टाइन्स डे जवळ आला की प्रेम, गुलाब आणि खास क्षणांची चर्चा आपोआप सुरू होते. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे या दिवशी गुलाबाशिवाय प्रेमाची कबुली अपुरीच वाटते. बाजारातून विकत आणलेला गुलाब छानच असतो, पण स्वतःच्या अंगणात फुलवलेला गुलाब भेट देण्याची मजा काही औरच असते. मात्र अनेकदा गुलाबाचं झाड असूनही त्यावर फुलं येत नाहीत आणि मेहनत वाया गेल्यासारखी वाटते. अशा परिस्थितीत, चिंता करण्याची गरज नाही. गुलाबाच्या रोपाला भरपूर फुलं यावीत यासाठी, काही  खास साधेसोपे, घरगुती आणि खिशाला परवडणारे उपाय आहे, जे अगदी फायदेशीर ठरतात(how to boost rose flowering).

काहीवेळा महागडी खतं घालूनही जे होत नाही, ते स्वयंपाकघरातील एका साध्या पदार्थाने अगदी सहज शक्य होते. गुलाबाचे रोप फुलांनी गच्च भरण्यासाठी नर्सरीमधील माळी एक 'सिक्रेट' पद्धत वापरतात, ज्यासाठी आपल्याला बाहेरून काहीही विकत आणण्याची गरज नाही. घरातच असणारे आणि सहज उपलब्ध असणारे काही खास पदार्थ सुकलेल्या रोपालाही बहर आणू शकतात आणि रोप फुलांनी गच्च भरुन जाईल. या एका उपायामुळे बागेत गुलाबांचा इतका बहर येईल (valentine special rose growing tips) की पाहणारे पाहतच राहतील. या व्हॅलेंटाईनला डे पूर्वी गुलाबाचे रोप फुलांनी (grow red roses at home for valentine day) फुलवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय कसे करायचे ते पाहूयात... 

गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नाहीत, मग काय करावं ? 

१. गुलाबाच्या रोपाची छाटणी :- सर्वात आधी गुलाबाच्या रोपाची हलकी छाटणी करा. झाडाच्या ज्या फांद्या सुकल्या आहेत, त्या कापून टाकणे गरजेचे आहे. छाटणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ज्या कटरचा किंवा कात्रीचा तुम्ही वापर करणार आहात, त्याची ब्लेड पूर्णपणे स्वच्छ असावी; नाहीतर रोपाला बुरशी  लागण्याची शक्यता असते. छाटणी केल्यामुळे रोप अधिक दाट होते आणि नवीन कळ्या लवकर येण्यास मदत होते.

दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांसाठी आईबाबांनी म्हणावे ‘हे’ जादूई शब्द, ताण कमी-रिझल्ट मनासारखा...

२. कुंडीतील मातीची स्वच्छता :- दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे कुंडीतील मातीची स्वच्छता करणे. मातीचा वरचा थर थोडा हलका करुन व्यवस्थित पसरवून घ्या.  कुंडीतून वरची २ ते ३ इंच माती काढून बाजूला ठेवा.

३. पिवळ्या मोहरीच्या खताचा वापर :- साधारण ५० ग्रॅम पिवळी मोहरी घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून तिची पावडर किंवा पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट एक लिटर पाण्यात नीट मिसळून घ्या. आता या मिश्रणाचा थोडा भाग गुलाबाच्या रोपाच्या मुळाशी घाला. त्यानंतर त्यावर 'वर्मी कंपोस्ट'चा एक थर द्या. आता उरलेल्या मोहरीच्या द्रावणापैकी अर्धे पाणी त्यावर घाला आणि पुन्हा माती व थोडी वाळू यांचे मिश्रण करून त्याचा एक थर द्या. शेवटी उरलेले सर्व मोहरीचे द्रावण वरून मातीत ओतावे. 

सोनम कपूरने शेअर केले गरोदरपणातले फोटो, पोटावरच्या काळी रेषेची चर्चा- अनेकींच्या पोटावर अशी रेष का येते..?

४. सूर्यप्रकाशाची काळजी :- गुलाबाच्या रोपाला चांगल्या वाढीसाठी आणि फुलांसाठी किमान ५ ते ६ तासांचे कडक ऊन मिळणे अत्यंत आवश्यक असते. 

५. चहा पावडरचा वापर :- वापरलेली चहा पावडर गुलाबासाठी सर्वोत्तम खत मानली जाते. यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते, जे गुलाबाच्या वाढीसाठी आवश्यक असते. वापरलेली चहा पावडर स्वच्छ धुवून उन्हात वाळवा. ही वाळलेली पावडर दर १५ दिवसांनी एकदा रोपाच्या मुळाशी घाला. 

६. केळीच्या सालीचे खत :- केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे गुलाबाच्या कळ्यांची संख्या वाढते आणि फुलांचा आकार मोठा होतो. केळीच्या साली सुकवून त्यांची पावडर करा किंवा साली रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी रोपाच्या मुळाशी टाका.

७. कांद्याच्या सालीचे पाणी :- कांद्याच्या सालीमध्ये सल्फर आणि पोटॅशियम असते, जे रोपाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मूठभर कांद्याच्या साली १ लिटर पाण्यात २४ तास भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून गुलाबाच्या रोपाला द्या.

८. इप्सम सॉल्ट :- गुलाबाची पाने हिरवीगार ठेवण्यासाठी आणि नवीन फुटवे येण्यासाठी इप्सम सॉल्ट (मॅग्नेशियम सल्फेट) अत्यंत फायदेशीर ठरते. एक चमचा इप्सम सॉल्ट एक लिटर पाण्यात विरघळवून त्याचा स्प्रे रोपांच्या पानांवर आणि मुळांवर शिंपडा.

Web Title : वैलेंटाइन डे से पहले पाएं लाल गुलाब: 8 किफायती उपाय!

Web Summary : वैलेंटाइन डे के लिए गुलाब चाहिए? छंटाई करें, मिट्टी साफ करें, सरसों की खाद डालें, धूप सुनिश्चित करें। चाय पत्ती, केले के छिलके, प्याज का पानी, एप्सम सॉल्ट का उपयोग करें।

Web Title : Get Red Roses Before Valentine's Day: 8 Cost-Effective Tips!

Web Summary : Want roses for Valentine's Day? Prune, clean soil, use mustard fertilizer, ensure sunlight. Employ tea powder, banana peels, onion water, Epsom salt for lush blooms.