Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुळस वाळून गेली-काड्याच उरल्या? केळीच्या सालींचा ‘हा’ उपाय करा-रोप होईल हिरवंगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:45 IST

Gardening Tips In Marathi : घरातील तुळशीची वाढ योग्य होत नसेल किंवा भरपूर पाने येत नसतील, तर केळीच्या सालीची मदत घेऊ शकता. सालीचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

Gardening Tips In Marathi : तुळशी भारतीय घरांमधील केवळ एक रोप किंवा झाड नाही तर श्रद्धा, आरोग्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तुळशीच्या रोपसोबत अनेक धार्मिक भावनाही जुळलेल्या असतात. हेच कारण आहे की, प्रत्येक घरात तुळशी असते आणि लोक या रोपाची भरपूर काळजीही घेतात. बरेच लोक झाडांची काळजी घेण्यासाठी, त्यांची वाढ करण्यासाठी नॅचरल खताचा वापर करतात. ज्यात केळीच्या सालीचाही समावेश असतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुळशीच्या कुंडीत केळीची साल टाकल्याने नेमकं काय होतं. खरंच असं करणं फायदेशीर असतं का? तेच जाणून घेऊया. 

केळीच्या सालीतील पोषक तत्व

तुळशीची पानं हिरवी राहण्यासाठी आणि मजबूत मुळांसाठी रोपाला पोषक तत्वांची गरज असते. केळीच्या सालीतून हेच आवश्यक पोषण रोपाला मिळतं. केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुळशीची मूळं मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच मूळांची वाढही होते, त्यामुळे रोप मातीतील पोषक तत्व अधिक चांगल्या पद्धतीने मिळवू शकतं. इतकंच नाही तर केळीच्या सालीतील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमने मातीची क्वालिटी देखील सुधारते. चांगली माती पानांमध्ये क्लोरोफिल कायम ठेवण्यास मदत करते. 

तुळशीत केळीची साल टाकण्याचे फायदे...

वेगाने वाढ होते - केळीच्या सालीमधील पोषक तत्वांनी तुळशीच्या रोपांची वाढ वेगाने होते. जर तुळशीचं रोप कोमेजलं असेल किंवा त्याची वाढ खुंटली असेल तर केळीची साल त्याच्यासाठी नॅचरल बूस्टर ठरते.

पाने दाट येतात - तुळशीच्या पानांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी औषधी म्हणून केला जातो. त्यामुळे रोपाला भरपूर पानं असणं गरजेचं असतं. अशात केळीच्या सालीतील पोटॅशिअमने रोपाला भरपूर पाने येण्यास मदत मिळेल.


कसा कराल वापर?

केळीची साल कुंडीत थेट टाकू नका. असं केल्यास बुरशी किंवा कीटक लागू शकतात. यांचा वापर करण्याआधी केळी साल उन्हात आधी चांगला वाळवून घ्या. नंतर वाळलेल्या सालीची बारीक पावडर तयार करा. महिन्यातून एकदा दोन चमचे ही पावडर कुंडीत टाका. 

तसेच दुसरा उपाय असा आहे की, एका भांड्यात पाणी भरून साली २ ते ३ दिवसांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून तुळशीच्या कुंडीत घाला. हवं तर आपण सालींचे छोटे छोटे तुकडे कापून ते मातीत २ ते ३ इंच खाली दाबू शकता. असं केल्यानेही रोपाची वाढ चांगली होईल. 

अशाप्रकारे बाहेरच्या केमिकलयुक्त खतांचा वापर न करताही आपण घरीच नॅचरल खत तयार करून तुळशीची चांगली वाढ करू शकता आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Revive Tulsi: Banana peel fertilizer for lush, green growth.

Web Summary : Use banana peels to nourish Tulsi. Potassium boosts growth and strengthens roots. Bury peels or use banana peel water for healthier plants. Natural, effective, and easy!
टॅग्स :बागकाम टिप्सहोम रेमेडी