हिवाळा म्हणजेच हिरव्यागार गोल-गरगरीत टपोऱ्या मटारच्या दाण्यांचा सिझन...या थंडीच्या दिवसांत फार मोठ्या प्रमाणावर बाजारात मटारचे दाणे विकायला ठेवलेले असतात. आपण देखील मोठ्या हौसेने मटारचे दाणे विकत घेतो, त्याचे पदार्थ करतो किंवा मटारचे दाणे सोलून ते पुढे सिझन संपल्यावर देखील वापरता यावे म्हणून स्टोअर करतो. अशावेळी आपण मटार सोलून शिल्लक उरलेली त्याची सालं मात्र कचरा समजून फेकून देतो. परंतु, आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो ते अनेक पदार्थ कचरा म्हणून फेकून देतो, पण काही तेच पदार्थ रोपांसाठी अमृतासारखेच ठरू शकतात, हे फार कमी जणांना माहिती असतं(How To Make Green Pea Peel Fertilizer At Home).
मटारच्या शेंगा सोलल्यानंतर उरलेली साल बहुतेक वेळा कचर्यात टाकली जाते. मात्र या शेंगांपासून तयार केलेलं लिक्विड खत रोपांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. या नैसर्गिक खतामध्ये आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, जे रोपांना जोमाने वाढण्यास मदत करतात. मटारच्या शेंगांच्या सालींपासून लिक्विड खत कसं तयार करायचं आणि ते रोपांसाठी (homemade green pea peel fertilizer) कसं फायदेशीर ठरतं, ते पाहूयात...
१. मटारच्या सालांमध्ये काय असते?
मटारच्या सालांमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन आणि कॅल्शियम यांसारखे महत्त्वाचे घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक रोपांच्या वाढीसाठी, मुळं मजबूत करण्यासाठी आणि त्यांना भरपूर फुले-फळे लागण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
२. लिक्विड खत तयार करण्याची सोपी पद्धत :- मटारच्या शेंगांच्या साली नीट धुऊन घ्या. त्या साली छोट्या तुकड्यांत कापा. आपण मटारच्या साली एकत्रित मिक्सरला लावून वाटून देखील घेऊ शकता. एका भांड्यात या साली घालून त्यात पुरेसं पाणी टाका, जेणेकरून साली पूर्ण बुडतील. शक्यतो सालींचे मिश्रण जितके असले त्याच्या तीन पट पाणी ओतावे. भांड्याचं झाकण हलकं झाकून ठेवा (पूर्ण बंद करू नका). हे मिश्रण २४ ते २८ तास तसंच ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. हेच तयार झालेलं लिक्विड खत आहे.
वर्षभरात केस इंचभरही वाढत नाही? 'असा' करा पोटली मसाज - केस वाढतील भरभर, सांभाळण होईल कठीण...
३. खताचा वापर कसा करावा?
तयार झालेले हे लिक्विड खत थेट रोपांना न घालता, त्यात समप्रमाणात साधे पाणी मिसळा (उदा. १ मग खत तर १ मग साधे पाणी). हे मिश्रण आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसांतून एकदा रोपांच्या मुळाशी घाला.
४. या खताचे रोपांसाठी होणारे फायदे...
१. गुलाबासारख्या फुलांच्या रोपांना हे खत दिल्यास कळ्यांची संख्या वाढते.
२. मिरची किंवा लिंबू यांसारख्या रोपांना यामुळे ताकद मिळते.
३. रासायनिक खतांच्या तुलनेत हे नैसर्गिक खत मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवते.
४. रोपांची वाढ झपाट्याने होते, मातीची सुपीकता वाढते आणि घरच्याघरीच, शून्य खर्चात तयार होतं.
मटारच्या शेंगा सोलल्यानंतर उरलेली साल फेकून देण्याऐवजी त्यापासून लिक्विड खत तयार करणं हा एक सोपा, स्वस्त आणि फायदेशीर उपाय आहे. घरातील झाडं निरोगी, हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली ठेवण्यासाठी या नैसर्गिक खताचा उपाय नक्कीच उपयोगी ठरेल.
Web Summary : Don't discard pea shells! They make excellent plant fertilizer. Rich in nutrients like potassium and nitrogen, the shells promote robust growth and abundant flowering. Simply soak shells in water, dilute, and apply to plants for a thriving garden.
Web Summary : मटर के छिलकों को न फेंके! वे उत्कृष्ट पौधे उर्वरक बनाते हैं। पोटेशियम और नाइट्रोजन जैसे पोषक तत्वों से भरपूर, छिलके मजबूत विकास और प्रचुर फूल को बढ़ावा देते हैं। बस छिलकों को पानी में भिगोएं, पतला करें और एक संपन्न बगीचे के लिए पौधों पर लगाएं।