आपल्या बागेतली सगळी फुलं एकीकडे आणि मोगऱ्याचे फुल एकीकडे.. कारण मोगऱ्याचा सुगंध एवढा मोहक असतो की तो मन प्रसन्न करून टाकतो. मेंदूला, शरीराला आलेली मरगळ झटकून देऊन आपल्याला अगदी फ्रेश करतो. खरंतर उन्हाळा आणि पावसाळा हे मोगऱ्याचे अगदी खास सिझन. या दिवसांमध्ये तो विशेष टवटवीत होऊन फुललेला असतो. पण तरीही काही ठिकाणी मात्र उन्हाळा असाे की पावसाळा असो मोगरा अजिबातच फुलत नाही. कधीतरी क्वचित त्याला एखादं फुल येतं आणि आपल्याला तेवढ्यावरच समाधान मानावं लागतं (which is the best fertilizer for mogra plant?). म्हणूनच हे टाळण्यासाठी आणि आपल्या घरभर मोगऱ्याचा सुगंध दरवळण्यासाठी मोगऱ्याला हे एक विशेष टॉनिक द्या (how to get maximum flowers from jasmine plant? home made fertilizer for mogra plant)
मोगऱ्याला भरपूर फुुलं येण्यासाठी काय करावे?
मोगऱ्याच्या रोपाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर प्रमाणात फुलं यावी यासाठी तांदळाचे पाणी अतिशय उपयुक्त ठरते. हा एक अतिशय सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत घेण्याची अजिबातच गरज नाही. नेहमी भात लावताना आपण तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतोच.
ना सुईची गरज ना दोऱ्याची... सैल झालेलं ब्लाऊज १ मिनिटांत होईल परफेक्ट फिटिंगचं, बघा ट्रिक..
तांदूळ धुतल्यानंतर आपण पाणी टाकून देतो. पण तसं न करता ते एका भांड्यात जमा करा आणि तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला द्या. या पाण्यातून मोगऱ्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात. त्याची वाढ चांगली होऊन फुलं येण्यास मदत होते. आठवड्यातून २- ३ वेळा हा उपाय करा. मोगरा चांगला फुलेल.
या काही गोष्टीही करून पाहा..
मोगऱ्याच्या रोपाच्या वाढीसाठी त्याला पुरेसा सुर्यप्रकाश मिळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मोगऱ्याचं रोप नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातले ५ ते ६ तास त्याला चांगलं ऊन मिळेल. कमी ऊन मिळत असेल तर फुलं येण्याचं प्रमाणही कमी होतं.
वय वर्षे ५९, पण तरीही उत्साह तरुणांना लाजविणारा! शाहरुख खानला फिट ठेवतात 'या' खास गोष्टी
मोगऱ्याच्या रोपाची वाढ होण्यासाठी आणि त्याला फुलं येण्यासाठी त्याची नियमितपणे कटिंग होणं खूप गरजेचं आहे. कटिंग झाली तरच त्याला नव्या फांद्या फुटतात आणि ते वाढून डेरेदार होत जातं. त्यामुळे महिना, दिड महिन्यातून एकदा मोगऱ्याची थोडी थोडी कटिंग नक्की करा.