रोपांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही की त्याचा परिणाम हळूहळू त्या रोपाच्या वाढीवर होतोच. त्यानंतर मग त्याला येणाऱ्या कळ्यांवर आणि फुलांवरही परिणाम दिसून येतो. रोजच्या कामाच्या धावपळीत बऱ्याचदा आपण रोपांकडे लक्ष द्यायला विसरून जातो. त्यांच्यासाठी रोज नुसतं पाणी घालणं आणि त्यांना पुरेशा सुर्यप्रकाशात ठेवणं एवढंच पुरेसं नसतं. त्यासाठी त्यांची थोडी विशेष काळजीही घ्यायला हवी. त्यासाठी घरच्याघरी काही सोपे उपाय केले तरी रोपांवर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. आता गुलाबाच्या रोपाच्या बाबतीतही असंच आहे (home hacks to get maximum flowers from rose plant). जर तुमच्याकडच्या गुलाबाच्या रोपांना पुरेशी फुलं येत नसतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (gardening tips for rose plant). हे उपाय केल्याने बघा अगदी महिनाभरातच गुलाबाचं रोप छान बहरून येईल.(gardening tips for the blooming of roses)
गुलाबाच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
सध्या ऋतू बदलण्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये वातावरणात जो बदल होत असतो त्याचा परिणाम रोपांच्या वाढीवरही होतो. त्यामुळे या दिवसांत रोपांवर रोग पडण्याची, किडे पडण्याची शक्यताही खूप वाढते.
त्यामुळे सगळ्यात आधी तर गुलाबाच्या रोपाची व्यवस्थित पाहणी करा. त्या रोपावर कुठे काही रोग पडलेला दिसला तर लगेच तेवढा भाग कापून टाका. संपूर्ण रोप पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्या रोपावर नीम ऑईल शिंपडल्यानेही त्यावरचा रोग निघून जाऊ शकतो.
यानंतर गुलाबाच्या ज्या फांद्यांना कळ्या नाहीत आणि जास्त पानंही नाहीत अशा फांद्यांची कटींग करा. कारण कटींग केल्यानंतर रोप अधिक जोमात बहरून येतं. त्याला भरपूर पानं आणि नव्या फांद्या फुटतात.
४ फसवे पदार्थ- हेल्दी समजून खाल्ले जातात पण असतात खूपच घातक, वजन, शुगर दोन्हीही वाढतं...
रोपाची कटींग झाल्यानंतर साधारण पुढच्या ४ ते ५ दिवसांत रोपाला तुम्ही घरगुती खतं देऊ शकता. जसे की केळीच्या साली उन्हात वाळवून त्याची पावडर करा आणि ती कुंडीमधल्या मातीत मिसळा. किंवा केळीची सालं एखादा दिवस पाण्यात भिजत घाला. त्यानंतर हे पाणी रोपाला द्या. यातून रोपांना जे पोटॅशियम मिळतं, ते कळ्या, फुलं येण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं.
