वातावरणातला गारवा संपून आता उन्हाळ्याला सुरुवात व्हायला लागली आहे. ऋतू बदलायला लागला की त्याचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होत असतो तसाच तो रोपांवर, झाडांवरही होत असतो. त्यामुळेच तर प्रत्येक ऋतूनुसार रोपांना जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळेच या दिवसांत बरेच रोपं सुकल्यासारखे दिसतात. काही रोपांवर रोग पडतो तर काही रोपांची पानं पिवळी व्हायला सुरुवात होते. गुलाबाच्या रोपाच्या बाबतीतही असं होतं. तुमच्या घरचं गुलाबाचं रोपही वाळायला लागलं असेल, त्याची पानं खूप गळायला लागली असतील किंवा मग त्याला फुलंच येत नसतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (Gardening Tips for The Blooming of Rose Plant). ८ दिवसांतच तुम्हाला गुलाबामध्ये खूप छान बदल झालेला जाणवेल.(home hacks for the fast growth of rose plant)
गुलाबाच्या रोपाला भरपूर कळ्या- फुलं येण्यासाठी उपाय
१. बऱ्याचदा मातीची गुणवत्ता बिघडली की रोपं सुकायला सुरुवात होतात. त्यामुळे सगळ्यात आधी तर कुंडीमधली माती तपासून पाहा. माती खूप चिकट झाली असेल तर खुरपं किंवा टोकदार काठी घ्या. त्याने कुंडीतल्या मातीचा वरचा थर उकरून माती थोडी भुसभुशीत करून घ्या.
चपळ व्हायचं - ताकद हवी तर पाहा खजूर खाण्याची योग्य पद्धत, अशक्तपणा- थकवा जाईल पळून कायमचा..
यामुळे मातीची पीएच पातळी संतुलित राहाते. तसेच मुळांपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित जातो आणि रोपाची चांगली वाढ होण्यास मदत होते.
२. माती उकरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या रोपाला थोडं खत घाला. तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत घालू शकता. खत घातल्यानंतर लगेचच रोपाला पाणी देऊ नका. साधारण ४ ते ५ तासांचा गॅप मध्ये जाऊ द्या आणि त्यानंतर पाणी द्या.
३. रोपाला वेळोवेळी पाणी घालणं खूप गरजेचं आहे. जर रोप सुकायला लागलं असेल तर त्याला तुम्ही वेळेत आणि पुरेसं पाणी घालत आहात की नाही हे एकदा तपासून पाहा.
हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी
४. त्याचबरोबर रोपाची चांगली वाढ व्हावी, त्यावर कोणताही रोग पडू नये यासाठी रोपावर वेळोवेळी किटकनाशक फवारणंही गरजेचं आहे. यासाठी निम ऑईल पाण्यात मिसळा. हे पाणी थोडं रोपावरही शिंपडा आणि कुंडीतल्या मातीमध्येही घाला. रोपावर रोग पडणार नाही.
Web Summary : Transitioning seasons can affect rose plants, causing them to dry out. Improve soil quality, use fertilizer, water adequately, and apply neem oil to revive your rose plant within 8 days.
Web Summary : मौसम बदलने से गुलाब के पौधे सूख सकते हैं। मिट्टी की गुणवत्ता में सुधार करें, खाद का उपयोग करें, पर्याप्त पानी दें और नीम का तेल लगाएं। इन उपायों से 8 दिनों में गुलाब का पौधा फिर से जीवंत हो जाएगा।