Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदाचं रोप नुसतंच वाढलं- फुलांचा पत्ताच नाही? किचनमधला 'हा' पदार्थ घाला- फुलंच फुलं येतील

जास्वंदाचं रोप नुसतंच वाढलं- फुलांचा पत्ताच नाही? किचनमधला 'हा' पदार्थ घाला- फुलंच फुलं येतील

Home Hacks For Getting Maximum Flowers From Jaswand: जास्वंदाला फुलंच येत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(gardening tips for jaswand or hibiscus plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2025 09:25 IST2025-05-24T09:21:16+5:302025-05-24T09:25:02+5:30

Home Hacks For Getting Maximum Flowers From Jaswand: जास्वंदाला फुलंच येत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(gardening tips for jaswand or hibiscus plant)

home hacks for getting maximum flowers from jaswand or hibiscus plant, gardening tips for jaswand, how to take care of jaswand plants? | जास्वंदाचं रोप नुसतंच वाढलं- फुलांचा पत्ताच नाही? किचनमधला 'हा' पदार्थ घाला- फुलंच फुलं येतील

जास्वंदाचं रोप नुसतंच वाढलं- फुलांचा पत्ताच नाही? किचनमधला 'हा' पदार्थ घाला- फुलंच फुलं येतील

Highlightsआठवड्यातून एकदा हा उपाय करा. काही दिवसांतच जास्वंदाच्या रोपाला कित्येक बारीक कळ्या लागलेल्या दिसतील. 

जास्वंदाचं टपोरं लालबुंद फुललेलं फुल पाहिलं की मन फ्रेश होऊन जातं. हल्ली तर गुलाबी, बेबी पिंक, पांढरा, पिवळा, केशरी अशा कित्येक आकर्षक रंगामध्ये जास्वंदाची फुलं मिळतात. ते पाहून लगेचच ते रोप घेऊन यावंसं वाटतं. आपण मोठ्या हौशीने वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद घरी आणतो. पण काही दिवसांतच असं लक्षात येतं की ते रोप नुसतंच वाढत आहे. पण त्याला फुलं आणि कळ्या मात्र अजिबातच येत नाहीत. असं जर तुमच्याही रोपाच्या बाबतीत होत असेल तर अगदी लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच असणारा एक खास पदार्थ वापरायचा आहे (home hacks for getting maximum flowers from jaswand or hibiscus plant). तो पदार्थ जास्वंदाच्या रोपासाठी जणू काही एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करतो.(gardening tips for jaswand or hibiscus plant)

 

जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी काय उपाय करावा?

जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येईल, याविषयीची माहिती r_vgarden या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

शर्ट स्वच्छ पण कॉलर मळालेली? घ्या उपाय- १ मिनिटात काळपटपणा जाऊन कॉलर होईल स्वच्छ

यामध्ये असं सांगितलेलं आहे की मोहरी जास्वंदाच्या रोपाला फुलं येण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

 

हा उपाय करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातली मोहरी मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या आणि त्याची पावडर करा.

पाऊस पडताच घरभर माशा आणि चिलटं? ५ साेपे उपाय- माशा, चिलटं घरातून पळून जातील

आता एक लीटर पाण्यासाठी एक चमचा पावडर याप्रमाणे पाण्यामध्ये मोहरीची पावडर मिसळा आणि हे पाणी २० ते २४ तासांसाठी झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी जास्वंदाच्या रोपाला घाला. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. काही दिवसांतच जास्वंदाच्या रोपाला कित्येक बारीक कळ्या लागलेल्या दिसतील. 


 

Web Title: home hacks for getting maximum flowers from jaswand or hibiscus plant, gardening tips for jaswand, how to take care of jaswand plants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.