Join us

घरातल्या कुंडीत लावा हिरवीगार मेथी, १ ट्रिक; घरीच खा ताजी ताजी मेथी-हिवाळ्यात व्हा फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2024 10:00 IST

Guide To Growing Fenugreek At Home : कुंडीमध्ये मेथी लावणं झालं अगदी सोपं - रोज फ्रेश मेथी खा..

हिवाळ्यात (Winter) पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात (Green Leafy Vegetables). स्वस्त दरात मेथी (Fenugreek), कांद्याची पात, कोथिंबीर, शेपूचीभाजी मिळते (Gardening Tips). पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी आवडीने खाल्ली जाते. मेथीची भाजी, पराठे, मेथीचे अनेक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. मेथी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी आढळते. पण अनेकदा बाजारात जाऊन मेथी विकत घेणं आणणं कंटाळवाणे वाटते. शिवाय मेथी निवडणंही कंटाळवाणे काम वाटते.

मेथी जर बाजारात जाऊन विकत आणण्याचा कंटाळा आला असेल तर, आपण घरातही मेथीची लागवड करू शकता. घरातल्या छोट्याशा कुंडीतही लावता येऊ शकते. पण घरातल्या कुंडीत मेथीची लागवड कशी करायची पाहा. २५ दिवसात कुंडीत हिरवीगार मेथी उगवेल(Guide To Growing Fenugreek At Home).

घरात मेथीची लागवड कशी करायची?

- मेथीची लागवड घरातल्या कुंडीत करण्यासाठी एक कुंडी घ्या. आपण पसरट आकाराचीही कुंडी घेऊ शकता. किंवा प्लास्टिक डब्याचाही वापर करू शकता.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

- नंतर त्यात माती आणि खत मिसळा. आपण कोणत्याही प्रकारचे खत मिसळू शकता. आपण नैसर्गिक खताचाही वापर करू शकता.

- नंतर त्यावर मेथी दाणे घाला. मेथी दाणे घातल्यानंतर त्यावर समानरित्या माती पसरवा. मातीचा एक थर तयार करा.

- मेथी दाणे डायरेक्ट घालण्यापूर्वी, रात्री पाण्यात मेथी दाणे भिजत घाला. मोड आलेले मेथी दाणे आपण मातीत घालू शकता. किंवा मातीचे वाफे करून त्यात घालू शकता.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

- आता कुंडी बाल्कनीत किंवा अंगणाच्या बागेत ठेवा. जेणेकरून त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळेल.

- कुंडीत जास्त प्रमाणात पाणी घालू नका.

- २५ - ३० दिवसात मेथी उगवेल. 

टॅग्स :बागकाम टिप्ससामाजिकसोशल व्हायरल