Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > वाळलेलं किंवा कोमेजलेलं झाड पुन्हा होईल हिरवंगार, घरीच तयार करा 'हे' पांढऱ्या पाण्याचं मिश्रण...

वाळलेलं किंवा कोमेजलेलं झाड पुन्हा होईल हिरवंगार, घरीच तयार करा 'हे' पांढऱ्या पाण्याचं मिश्रण...

Gardening Tips : बरेच लोक घरांमध्ये छोटे छोटे गार्डन तयार करून घराचं सौंदर्य वाढवत आहेत. पण उन्हात झाडांकडे जराही दुर्लक्ष झालं तर छोटी झाडं कोमेजतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:26 IST2025-06-20T17:26:10+5:302025-06-20T17:26:33+5:30

Gardening Tips : बरेच लोक घरांमध्ये छोटे छोटे गार्डन तयार करून घराचं सौंदर्य वाढवत आहेत. पण उन्हात झाडांकडे जराही दुर्लक्ष झालं तर छोटी झाडं कोमेजतात.

Gardening Tips : Try this homemade rice water for plants | वाळलेलं किंवा कोमेजलेलं झाड पुन्हा होईल हिरवंगार, घरीच तयार करा 'हे' पांढऱ्या पाण्याचं मिश्रण...

वाळलेलं किंवा कोमेजलेलं झाड पुन्हा होईल हिरवंगार, घरीच तयार करा 'हे' पांढऱ्या पाण्याचं मिश्रण...

Gardening Tips : पावसाला काही भागांमध्ये सुरूवात झाली असूनही हवी तशी झालेली नाही. अनेक ठिकाणी उन्हाचा पार चांगलाच वाढला आहे. अशात घराच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील झाडी वाळतात, मरतात किंवा चिमतात. अशात झाडांची ही स्थिती होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. जो करून तुम्ही कोमेजलेलं झाड पुन्हा टवटवीत होऊन फुलू लागेल आणि त्याची वाढही चांगली होईल.

बरेच लोक घरांमध्ये छोटे छोटे गार्डन तयार करून घराचं सौंदर्य वाढवत आहेत. पण उन्हात झाडांकडे जराही दुर्लक्ष झालं तर छोटी झाडं कोमेजतात आणि त्यांची फुलंही कोमेजतात. अशात तुम्ही एक होममेड ट्रिक करून झाडाला पुन्हा हिरवंगार आणि टवटवीत करू शकता.

घराच्या बाल्कनीतील झाडं जेव्हा चिमतात किंवा त्यांची पानं सुकतात तेव्हा ती कचऱ्यात फेकली जातात. पण आता तुम्हाला असं अजिबात करावं लागणार नाही. कारण एक सोपा उपाय करून झाड पुन्हा हिरवंगार करता येऊ शकेल. चला जाणून घेऊ काय आहे हा उपाय.

झाड पुन्हा हिरवंगार करण्यासाठीचा उपाय करण्यासाठी तुम्हाला मूठभर तांदूळ लागतील, बेकिंग सोडा लागेल, व्हाइट व्हिनेगर लागेल आणि पाणी लागेल.  

सगळ्यात आधी तांदूळ पाण्यात भिजवा आणि त्यात बेकिंग सोडा टाकून चांगला मिक्स करा. त्यानंतर त्यात व्हाइट व्हिनेगरची काही थेंब घाला. झाडासाठीचं मिश्रण तयार आहे. फक्त हे मिश्रण तयार करताना या गोष्टीची काळजी घ्या की, व्हिनेगर जास्त प्रमाणात टाकू नये. असं केलं तर झाड जळू शकतं.

जेव्हा हे मिश्रण तयार होईल तेव्हा एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. नंतर हे मिश्रण झाडाच्या पानांवर स्प्रे करा. तसेच हे मिश्रण तुम्ही कुंडीतील माती उखरताना सुद्धा टाकू शकता. हे मिश्रण खूप जास्त प्रमाणात झाडावर स्प्रे करू नका. तसेच याचा वापर महिन्यातून केवळ एकदाच करावा.

Web Title: Gardening Tips : Try this homemade rice water for plants