Lokmat Sakhi >Gardening > वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसातच दिसेल फरक

वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसातच दिसेल फरक

Gardening Tips To Revive Your Dead or Dying Plant: उन्हाळ्यात रोपं सुकली असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(best homemade fertilizer for Dead or Dying Plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 13:55 IST2025-05-10T12:37:18+5:302025-05-10T13:55:50+5:30

Gardening Tips To Revive Your Dead or Dying Plant: उन्हाळ्यात रोपं सुकली असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(best homemade fertilizer for Dead or Dying Plant)

gardening tips to Revive Your Dead or Dying Plant, how to revive drying out plants, best homemade fertilizer for Dead or Dying Plant | वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसातच दिसेल फरक

वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसातच दिसेल फरक

Highlightsहा उपाय एक दिवसाआड याप्रमाणे दोन- तीन वेळा करा. अगदी ५- ६ दिवसांतच रोपाला नवी पालवी फुटायला सुरुवात होईल.

उन्हाळ्याच्या दिवसांत आपण रोपांची भरपूर काळजी घेतो. पण काही रोपांना कडक उन्हाळा सोसवत नाही. त्यामुळे मग हळूहळू त्यांची पानं पिवळी पडून गळायला सुरुवात होते आणि नंतर रोपही अगदी वाळून जातं. अशा रोपांना सावलीमध्ये ठेवलं किंवा त्यांची कटींग केली तरी त्यांच्यामध्ये विशेष फरक दिसून येत नाही. म्हणूनच आता हा एक उपाय करून पाहा. यामध्ये आपण स्वयंपाक घरातलेच काही घरगुती पदार्थ वापरून घरच्याघरी रोपांसाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करणारं घरगुती खत तयार करणार आहाेत (gardening tips to Revive Your Dead or Dying Plant). यामुळे सुकून गेलेल्या रोपालाही अवघ्या काही दिवसांतच नवी पालवी फुटेल (how to revive drying out plants?) आणि पाहता पाहता ते रोप छान फुलून येईल.(best homemade fertilizer for Dead or Dying Plant)

 

रोप सुकून गेलं असेल तर त्याला कोणतं खत द्यावं?

रोप पुर्णपणे वाळून गेलं असेल तर त्याला कोणतं खत द्यावं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ gardening_with_moms या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

दीपिका पदुकोणने पहिल्यांदाच सांगितला आई होण्याच्या प्रवासातला त्रास, म्हणाली 'ते' दिवस खूपच कठीण...

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोया चंक, गाजराची सालं आणि चहा पावडर हे ३ पदार्थ लागणार आहेत.

सगळ्यात आधी तर १० ते १२ सोया चंक घ्या. एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यात सोया चंक घाला आणि हे पाणी ८ ते १० मिनिटे गॅसवर उकळून घ्या.

 

पाणी थंड झाल्यानंतर पाण्यात व्यवस्थित भिजलेले सोयाचंक पिळून त्यांच्यातलं पाणी काढून घ्या. आता या पाण्यामध्ये १ ते २ चमचे चहा पावडर आणि एका मध्यम आकाराच्या गाजराची सालं बारीक करून घाला.

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

भांड्यावर झाकण ठेवून हे पाणी ८ ते १० तास तसेच ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि जे रोप वाळून गेले आहे किंवा सुकत चालले आहे, त्या रोपाला हे पाणी द्या.. हा उपाय एक दिवसाआड याप्रमाणे दोन तीन वेळा करा. अगदी ५- ६ दिवसांतच रोपाला नवी पालवी फुटायला सुरुवात होईल. 


 

Web Title: gardening tips to Revive Your Dead or Dying Plant, how to revive drying out plants, best homemade fertilizer for Dead or Dying Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.