Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुंडीतल्या मातीची गुणवत्ताही महत्त्वाची! नुसतंच खतपाणी घालून उपयोग नाही-पाहा मातीचा कस कसा वाढवायचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 12:17 IST

Gardening Tips to Improve Soil Quality in Pots: कुंडीतल्या रोपांची चांगली वाढ होण्यासाठी मातीची गुणवत्ताही खूप गरजेची आहे..(how to improve soil quality to  keep plants healthy and green?)

हल्ली जागेचा प्रश्नही आहेच. त्यामुळेच तर फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आता फ्लॅटमध्ये राहून गार्डनिंगची हौस भागवायची असेल तर कुंड्यांमध्ये वेगवेगळी रोपं लावली जातात. त्यांना वेळोवेळी खत आणि पाणीही आपण घालतो. पण तरीही कधी कधी असं दिसून येतं की रोपांची चांगली वाढच होत नाहीये. रोप सुकत चालली आहेत किंवा त्यांना कळ्या, फुलंही येत नाहीयेत. खत, पाणी देऊन तसेच पुरेसं ऊन देऊनही रोपांची अशीच अवस्था असेल तर एकदा कुंडीतली माती तपासून पाहा. कारण मातीचा कसदारपणा टिकून राहिला तरच रोपांची चांगली वाढ होते. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहुया..(how to improve soil quality to  keep plants healthy and green?)

कुंडीतल्या मातीचा कसदारपणा कसा टिकवून ठेवायचा?

 

१. कुंडीतल्या मातीची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तिचा सगळ्यात वरचा थर अगदी दगडासारखा कडक होऊन जातो. माती अशी असेल तर मुळापर्यंत ऑक्सिजन पोहाेचत नाही. त्यामुळे मग मुळं सडतात आणि रोपांची वाढ खुंटते. यासाठी महिन्यातून एकदा छोटी खुरपणी किंवा टोकदार काडी घेऊन कुंडीतल्या मातीचा वरचा थर उकरून भुसभुशीत करायला हवा.

'हा' घरगुती मसाला घालून साऊथमध्ये घरोघरी सांबार करतात, घ्या सांबार मसाल्याची अस्सल दाक्षिणात्य रेसिपी 

२. चहा गाळून घेतल्यानंतर जी चहा पावडर गाळणीत जमा होते ती स्वच्छ धुवून उन्हात वाळवा. त्यानंतर ती कुंडीमधल्या मातीमध्ये मिसळत चला. चहा पावडर मातीमध्ये मिसळण्यापुर्वी माती थोडी उकरून घ्यावी आणि मग चहा पावडर मिसळावी. यामुळे माती भुसभशुीत राहाते. शिवाय चहा पावडरमधील काही घटक मातीचा कस वाढवतात.

 

३. कुंडीतली माती दरवर्षी बदलायला हवी. यासाठी पावसाळ्याचा ऋतू उत्तम आहे. रोपांसकट कुंडीतली माती बाहेर काढा. त्यामध्ये थोडं गांडूळ खत, कोकोपीट, थोडी वाळू मिसळा आणि मग कुंडी भरा. यामुळे माती भुसभुशीत राहण्यास मदत होते. आणि अशा मातीतच रोपांची चांगली वाढ होते.

मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यात ‘पॉप्युलर’ व्हायचंय? करा फक्त ८ गोष्टी- तुम्हीच व्हाल सगळ्यांच्या फेवरिट

४. महिन्यातून एकदा रोपांना गुळाचं पाणी द्या. यासाठी साधारण १ लीटर पाण्यात ५० ग्रॅम गूळ भिजत घाला. हे पाणी कुंडीतल्या मातीत मिसळा. गुळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळेही कुंडीतल्या मातीचा कस टिकून राहातो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy soil is key for potted plants; improve soil quality.

Web Summary : For healthy potted plants, ensure good soil quality. Aerate the soil, add used tea leaves, replace soil yearly with compost, and use jaggery water monthly.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखते