हिवाळ्याचा कडाका आता सगळीकडे चांगलाच जाणवायला लागला आहे. एरवी उष्ण असणाऱ्या शहरांमध्येही आता हिवाळ्यातले तापमान १० डिग्रीच्या खाली गेले आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्याला ना थंड पाणी प्यावे वाटते ना त्याला स्पर्श करावा वाटतो. या थंडीचा जसा त्रास आपल्याला होतो, तसाच तो रोपांनाही होतच असतो. रोपांना जसं जास्त ऊन, जास्त पाऊस सहन होत नाही, तशीच त्यांना जास्त थंडीही सोसवत नाही. म्हणूनच उन्हाळा, पावसाळा या काळात आपण रोपांची काळजी घेण्याची पद्धत जशी बदलतो, तशीच ती जास्त थंडी पडल्यानंतरही बदलायला हवी. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...(Gardening Tips For Winter)
हिवाळ्यात रोपांना पाणी घालताना कोणती काळजी घ्यावी?
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवसांत रोपांना दररोज पाणी घालू नका. एक दिवसाआड रोपांना पाणी दिलं तरी ते पुरेसं ठरतं. कुंंडीतल्या मातीचा वरचा थर कोरडा पडलेला आहे, हे जाणवलं की मगच रोपांना पाणी घाला.
२. सकाळी खूप थंडी असताना किंवा सायंकाळी वातावरणातला गारवा पुन्हा वाढल्यानंतर रोपांना पाणी घालणं टाळा. कारण आधीच गार वातावरण असताना त्यात आणखी थंड पाणी रोपांना दिलं तर ते बऱ्याचदा मुळांना सहन होत नाही. त्यामुळे हिवाळ्यात पाणी नेहमी दुपारच्यावेळी घाला. यामुळे वातावरणही थोडं गरम झालेलं असतं आणि पाण्याचा थंडावाही कमी झालेला असतो.
३. हिवाळ्यात रोपांची जागाही थोडी बदला. तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणात जिथे ऊन येतं तिथे रोपं नेऊन ठेवा. जर सगळी रोपं एकदम हलवणं शक्य नसेल तर आलटून पालटून रोपं हलवा आणि सगळ्यांनाच ऊन मिळेल याकडे लक्ष द्या.
चेहरा गोरा, पण मान खूपच काळवंडली? ३ पदार्थ मानेवर चोळा, १० मिनिटांत मान स्वच्छ
४. रोपांना गरम पाणी कधीही घालू नका. गरम पाण्यामुळे रोपांच्या मुळांचं नुकसान होतं. रुम टेम्परेचवरचं पाणी रोपांना द्या किंवा नैसर्गिक सुर्यप्रकाशात जे पाणी आपोआप थोडं कोमट झालं आहे, असंच पाणी रोपांना द्या.
