Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतले रोपही लगडेल लिंबानी, घरातलाच ‘हा’ आंबट पदार्थ फक्त घाला-पोषण मिळेल भरपूर

कुंडीतले रोपही लगडेल लिंबानी, घरातलाच ‘हा’ आंबट पदार्थ फक्त घाला-पोषण मिळेल भरपूर

Gardening Tips : सावलीत रोप ठेवल्यामुळे लिंबाची फुलं गळतात ज्यामुळे लिंबू येणं कमी होतं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:55 IST2024-11-23T11:27:51+5:302024-11-26T16:55:00+5:30

Gardening Tips : सावलीत रोप ठेवल्यामुळे लिंबाची फुलं गळतात ज्यामुळे लिंबू येणं कमी होतं. 

Gardening Tips : How To Grow Lemon Plant At Home Lemon Plant Growing Tips | कुंडीतले रोपही लगडेल लिंबानी, घरातलाच ‘हा’ आंबट पदार्थ फक्त घाला-पोषण मिळेल भरपूर

कुंडीतले रोपही लगडेल लिंबानी, घरातलाच ‘हा’ आंबट पदार्थ फक्त घाला-पोषण मिळेल भरपूर

लिंबाचं रोप (Lemon Plant) कुंडीत लिंबाचे रोप लावले तर फळ लागते का असा प्रश्न अनेकांना पडतो. काहीवेळा लिंबाचे रोप खूपच  सुकते. मातीत नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज असते पण याचं जास्त प्रमाण असल्यास रोपं खराब होऊ शकते. लिंबाच्या झाडाची नेमकी काय काळजी घ्यायला हवी? (How To Grow Lemon At Home)

लिंबाच्या रोपाला ऊन्हाची आवश्यकता असते

उगाव. कॉमच्या रिपोर्टनुसार सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की लिंबाचं रोप अशा ठिकाणी ठेवू नका  जिथे सुर्यप्रकाश अजिबात येत नाही.  जेव्हा  या रोपाच्या फांद्या ऊन्हात पिकतात तेव्हा लिंबू रसाळ होतात. जर सावलीत ठेवले तर  एक ते दोनपेक्षा जास्त लिंबू येणार नाहीत. सावलीत रोप ठेवल्यामुळे लिंबाची फुलं गळतात ज्यामुळे लिंबू येणं कमी होतं. 

कुंडीत जर लिंबाचं रोप लावलं असेल तर एक समस्या असते ती म्हणजे ही फुलं गळू लागतात. हे टाळण्यासाठी सुर्यप्रकाशाबरोबरच पाण्याचीही काळजी घ्यावी लागते जेव्हा कोणत्याही रोपाला फळं येण्याआधी फुलं येऊ लागतात तेव्हा त्यात  पाण्याचं प्रमाण योग्य असावं लागतं.  जास्त पाणी घातल्यामुळे पानं तुटू शकतात आणि फुलांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. अशा स्थितीत तुम्ही माती मॉईश्चराईज राहील इतकंच पाणी घालावं. 
लिंबाच्या रोपात बोरेक्स पावडर घाला.

आईबाबांना सुधा मूर्तींचा खास सल्ला, नियमित करा ३ गोष्टी-मुलं वाया जाणार नाहीत

बोरेक्स पावडर रोपात घातल्यानं रोपात बोरोनची कमतरता भासत नाही.  हे तुम्हाला ऑनलाईन किंवा कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये मिळेल. जसजसं पाणी कुंडीत जाईल तसतसं रोपाला पोषण मिळेल. रोपाला लिंबू येत नसतील तर ही ट्रिक उत्तम ठरू शकते. 

लिंबाच्या रोपासाठी घरगुती उपाय

१ लिटर पाण्यात थोडं ताक मिसळा हे पाणी मातीत १ ते २ दिवसांनी घाला. माती मुळापासून थोडी सुकल्यानंतर खोदून हे द्रावण मातीत घाला. नंतर छोटं रोप  किंवा छोट्या कुंडीत हा उपाय ट्राय करा. जर तुम्ही खूपच छोट्या कुंडीत लिंबाचं रोप लावलं असेल तर तुम्ही थोड्या मोठ्या  कुंडीतही लावू शकता.

वांगी कलरच्या साडीवर शोभून दिसतील 'या' ९ रंगाचे ब्लाऊज; कोणतीही साडी अगदी शोभून दिसेल

रिपॉट करताना मुळं थोडी ट्रिम करा. कुंडीत पाणी घालण्याआधी त्या मातीत ऑर्गेनिक खत घाला. कम्पोस्ट किंवा शेण खताचा वापर करू शकता.

Web Title: Gardening Tips : How To Grow Lemon Plant At Home Lemon Plant Growing Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.