Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरी लहानशा कुंडीतही लावता येईल वेलची, खर्च कमी आणि आनंद जास्त-वेलचीच्या सुंगधानं बहरेल घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:42 IST

Gardening Tips : वेलचीचं रोप लावण्यासाठी काय काय करावं लागतं ते समजून घेऊ.

वेलची एक हेल्दी हर्ब (Elaichi Plant)आहे.  मोठ्या लहान अशा दोन प्रकारच्या वेलची  बाजारात मिळतात. या दोन्ही प्रकारच्या वेलची बऱ्याच महाग असतात. छोट्या वेलचीचा वापर तुम्ही अनेकदा केला असेल. काही गोड पदार्थ जसं की खीर, शेवया, हलवा यांमध्ये वेलचीचा वापर केला जातो.  छोटी वेलची विकत घेणं खूपच महाग वाटतं.  छोट्या वेलचीचं रोप लावण्यासाठी काय काय करावं लागतं ते समजून घेऊ. (How To Grow Elaichi Plant At Home)

छोटी वेलची लावण्याची पद्धत

तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही कमीत कमी खर्चात तुम्हाला घराची बाल्कनी, अंगण किंवा छतावर छोट्या वेलचीचं रोप लावता येईल. यासाठी मध्यम किंवा मोठ्या आकाराची मातीची कुंडी, बी, चांगल्या  दर्जाची माती, खत, पाणी या गोष्टींची गरज असेल.

माधुरी दीक्षितच्या साड्यांचे पाहा खास कलेक्शन, लग्नसराईत ’या’ रंंगांच्या साड्या तुमच्याकडे हव्याच..

एका कुंडीत कोकोपीट  म्हणजेच नारळाचा भुसा  घाला याचं प्रमाण  ५० टक्के असायला हवं याच प्रमाणात वर्मी कंम्पोस्ट माती घालून व्यवस्थित मिक्स करा. नारळाचा भुसा, खतयुक्त माती घातल्यानं रोपांना पोषण मिळते.वाढही चांगली होते. वेलचीचे बी किंवा तयार रोप विकत मिळू शकते. मातीत थोडं पाणी मिसळा. माती ओली असेल तर पाणी घालू नका. यामुळे मुळं गळून पडू शकतात. काही दिवसांतच रोपाची वाढ होऊ लागेल. रोपाला व्यवस्थित उन्हातठेवा. दोन ते तीन वर्षात वेलचीच्या रोपाला फळं दिसू लागतील.

वेलचीच्या रोपाला खूप जास्त पाणी घालणं टाळायला हवं.  माती ओली असेल तर पाणी घालू नका. सुकी माती असेल तर तरच पाणी घाला. जास्त पाणी घातल्यानं रोपाच्या मुळांना नुकसान पोहोचू शकतं. थंडीच्या दिवसांत पाणी घालणं टाळा.  रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे सर्वात जास्त सुर्यप्रकाश येतो. वेलचीचं रोप अधिक तापमानात हेल्दी राहतं आणि वाढतं सुद्धा. वेलचीचं रोप लावण्यासाठी सगळ्यात उत्तम वातावरण उन्हाळ्यातच असते.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स