Lokmat Sakhi >Gardening > फक्त ५० दिवसांत घरच्या कुंडीतही येतील लालचुटुक गाजरे! १ खत घाला- पाहा कमाल

फक्त ५० दिवसांत घरच्या कुंडीतही येतील लालचुटुक गाजरे! १ खत घाला- पाहा कमाल

grow carrots at Home: carrot fertilizer: balcony gardening: grow carrots in pots: आपण घराच्या अंगणात, टेरेसवर किंवा अगदी छोट्याशा बाल्कनीत गाजर लावले तर भरपूर गाजर येतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2025 15:23 IST2025-09-04T15:06:38+5:302025-09-04T15:23:56+5:30

grow carrots at Home: carrot fertilizer: balcony gardening: grow carrots in pots: आपण घराच्या अंगणात, टेरेसवर किंवा अगदी छोट्याशा बाल्कनीत गाजर लावले तर भरपूर गाजर येतील.

Gardening tips how to grow carrots at home in pots best fertilizer for growing carrots quickly balcony gardening tips for vegetables | फक्त ५० दिवसांत घरच्या कुंडीतही येतील लालचुटुक गाजरे! १ खत घाला- पाहा कमाल

फक्त ५० दिवसांत घरच्या कुंडीतही येतील लालचुटुक गाजरे! १ खत घाला- पाहा कमाल

शहरात जागा कमी असल्यामुळे आपल्या झाडे काही लावता येत नाही.(grow carrots at Home) त्यासाठी आपण खिडकी किंवा बाल्कनीजवळ आपल्याला हवी असणारी दोन-चार झाडे लावतो.(carrot fertilizer) पण शहरी भागात राहाणाऱ्या लोकांना कायम एक गोष्ट खटकत राहते ती म्हणजे ताजी, निरोगी आणि केमिकल-फ्री भाजीपाला खायचा कसा? बाजारात मिळणारं गाजर दिसायला लाल- ताजं वाटतं.(balcony gardening) पण त्यावर किती औषधं फवारील आहेत, याची आपल्याला कल्पना देखील नसते.(grow carrots in pots) अशावेळी आपण घराच्या अंगणात, टेरेसवर किंवा अगदी छोट्याशा बाल्कनीत गाजर लावले तर भरपूर गाजर येतील.(home gardening tips)
आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, गाजरासाठी मोठी जागा, शेत किंवा भरपूर माती लागते.(kitchen gardening) पण कुंडीत किंवा ग्रो बॅगमध्ये गाजर सहज येतात.(organic gardening tips for beginners) जर घरी लावले तर अवघ्या ५० दिवसांत आपल्याला गाजर खाता येईल. यासाठी काय करायला हवे,जाणून घेऊया.(fastest way to grow carrots at home)

छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

खरंतर गाजराची मुळे लांब असतात, यासाठी आपल्याला योग्य ती कुंडी निवडावी लागेल. साधारणापणे गाजर लावण्यासाठी १० ते १२ इंच खोल कुंडी असायला हवी. जर ती मातीची असेल तर सगळ्यात उत्तम. कारण यात हवा आणि ओलावा संतुलित राहतो. याच्या तळाशी पाणी बाहेर पडण्यासाठी छिद्रे असणे आवश्यक. 

गाजराच्या लागवडीसाठी माती मऊ असायला हवी. वाळू, शेणखत आणि बागेची माती कुंडीच्या मातीत समप्रमाणात मिसळा. ज्यामुळे झाडाची वाढ लवकर होते. माती ओलसर राहिली पाहिजे पण त्यात पाणी साचू देऊ नका.पाणी साचल्यास गाजरांची मुळे कुजू लागतात. इतकेच नाही तर गाजराच्या बिया या लहान आणि हलक्या असतात. ज्यामुळे त्या नीट पेरायला हव्या. बियाणे पेरण्यापूर्वी कुंडीत थोडीशी माती ओली करा. त्यानंतर बियाणे अर्धा सेंटीमीटर खोलीवर ठेवा आणि वर मातीचा पातळ थर लावा. बियाणे खूप जास्त खोलवर दाबल्यास उगवत नाही. 

गाजराच्या झाडांना भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश हवा असोत. त्यासाठी कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथून सहा ते आठ तास सूर्यप्रकाश मिळेल. माती ओली असावी पण त्याचा चिखल होऊ देऊ नका. उन्हाळा आणि हिवाळ्यात दर दोन दिवसांच्या अंतराने पाणी द्या. रोपांना पुरेशी जागा आणि पोषण मिळेल याची काळजी घ्या. वेळोवेळी तण काढून टाका ज्यामुळे मुळे कमकुवत होणार नाही. गाजराच्या झाडाला जास्त खताची आवश्यकता नसते. पण सुरुवातीला शेणखत किंवा कंपोस्ट घाला. महिन्याभरानंतर सेंद्रिय खत घाला. यामुळे मुळे भराभर वाढण्यास मदत होईल. व्यवस्थित काळजी घेतल्यास ५० दिवसांत गाजर येतील. याच्या पानांची झाडे दाट आणि मजबूत दिसू लागली की केशरी रंगाची मुळे दिसतात. त्यावेळी गाजर तोडण्यासाठी तयार होतो. 

Web Title: Gardening tips how to grow carrots at home in pots best fertilizer for growing carrots quickly balcony gardening tips for vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.