lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

Terrace garden: बऱ्याचदा कुंडीतला मोगरा (mogra plant) हिरवागार दिसतो, पण त्याला फुलं काही येत नाहीत. तुमच्या मोगऱ्याचंही असंच झालं असेल तर मोगऱ्याला फुलं येण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 04:18 PM2022-01-06T16:18:17+5:302022-01-06T16:21:48+5:30

Terrace garden: बऱ्याचदा कुंडीतला मोगरा (mogra plant) हिरवागार दिसतो, पण त्याला फुलं काही येत नाहीत. तुमच्या मोगऱ्याचंही असंच झालं असेल तर मोगऱ्याला फुलं येण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा...

Gardening tips: How to take care of Mogra plants | मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

Highlightsलवकरच येणाऱ्या हंगामासाठी आपल्या कुंडीतल्या मोगऱ्याला तयार करा. त्यांची थोडी काळजी घ्या, त्याला काय हवं, काय नको ते पहा आणि मग बघा तो तुम्हाला कशी भरभरून फुलं देतो ते..

गुलाब, जास्वंद याप्रमाणेच माेगरा देखील अनेकांचा लाडका असतो. त्यामुळेच घरातल्या बागेत मोगरा (Mogra plant in terrace garden) आवर्जून लावलाच जातो. बऱ्याचदा उन्हाळा आणि पावसाळा हे मोगऱ्याचे मुख्य हंगाम. माचे ते मे या काळात मोगरा विशेष बहरलेला असतो. शिवाय पावसाळ्यातही मोगऱ्याच्या काही जातींना फुलं येतात. ठराविक काळातच मोगऱ्याला (how to take care of mogra plant) फुलं येत असल्याने ती भरपूर यावीत आणि त्यांचा मनमोकळा सुगंध अनुभवता यावा, अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते. 

 

पण वर्षभर सांभाळलेल्या मोगऱ्याला (how to grow mogra plant) जेव्हा ऐन हंगामात फुलंच येत नाहीत किंवा अवघी दोन- तीन फुलंच येतात, तेव्हा मन खूपच उदास होऊन जातं. म्हणूनच लवकरच येणाऱ्या हंगामासाठी आपल्या कुंडीतल्या मोगऱ्याला तयार करा. त्यांची थोडी काळजी घ्या, त्याला काय हवं, काय नको ते पहा आणि मग बघा तो तुम्हाला कशी भरभरून फुलं देतो ते (how to get more flowers to mogra).. सिंगल, डबल, गुंडुमलई, मोतीया, बटमोगरा, वसई, मदनबाण अशा मोगऱ्याच्या अनेक जाती असून मोगरा इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांचे राष्ट्रीय फूल आहे.

 

मोगऱ्याला चांगली फुलं यावीत यासाठी......
१. माेगऱ्याला चांगली फुलं यावीत यासाठी मोगऱ्याच्या ज्या फांद्यांना अजिबातच पाने नाहीत किंवा अगदीच  विरळ पाने आहेत, पाने पिवळी पडून सुकली आहेत, अशा फांद्या कापून टाका.
२. कुंडीतील माती दिड ते दोन इंचाने कमी करा.  गुलाबाला नुसतेच काटे, फुलांचा पत्ताच नाही? कुंडीतला गुलाब सुंदर फुलण्यासाठी ५ उपाय, येईल गुलाबबहार
३. यानंतर माेगऱ्याचं रूट ट्रिमिंग करा. रूट ट्रिमिंग म्हणजे कुंडीत दिड ते दोन इंचावर जी मुळं असतील, ती थोडी थोडी कापून टाका. मुळांचं ट्रिमिंग केल्यामुळे रोपट्याला खूपच लवकर आणि खूप छान बहर येतो.
४. यानंतर कुंडीत थोडं शेणखत टाका. त्यावर थाेडं गांडूळ खत टाका. सगळ्यात वर माती आणि वाळू यांचं मिश्रण टाका. माती आणि वाळू हे दोन्हीही सम प्रमाणात घ्या. यानंतर आता रोपट्याला व्यवस्थित पाणी द्या. अशा पद्धतीने आपल्या मोगऱ्याच्या रोपट्याची आपण मशागत करून ठेवली आहे. अशी मशागत हंगाम सुरू होण्याच्या साधारण महिनाभर आधी करून ठेवली की ऐन हंगामात फुलांचा चांगलाच बहर येतो. 

 

मोगऱ्याच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा..
- मोगर्‍याला पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी माती लागते. 
- मोगर्‍याला खूप पाणी घालू नये. माती हाताला कोरडी लागली की मगच त्याला पाणी द्या. 
- उन्हाळ्यात साधारण २ आठवड्यातून एकदा माेगऱ्याला खत द्यावं. 
- मोगऱ्याचं रोप भरपूर सुर्यप्रकाश येणाऱ्या जागी ठेवावं.     जास्वंद वाढला टराटरा पण फुलांचा पत्ताच नाही? ३ उपाय, फुलतील जास्वंदाची फुलंच फुलं..
- मोगऱ्याची माती दोन वर्षातून एकदा बदलावी. माती बदलल्यावर झाड २- ३ दिवस प्रखर सुर्यप्रकाशात ठेवू नका.
- मे महिन्यानंतर माेगऱ्याचा बहर ओसरतो. त्यानंतर फांद्यांची साधारण ५- ६ इंच छाटणी करा. ३ ते ४ दिवस पाणी देऊ नका. नंतर भरपूर पाणी द्या. यामुळे नविन पानं फुटतात आणि पावसाळ्याच्या हंगामात पुन्हा भरपूर फुलं येतात. 

 

Web Title: Gardening tips: How to take care of Mogra plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.