गार्डनिंगची हौस खूप लोकांना असते. त्यामुळे घराच्या आसपास कमी जागा असली तरी ते गच्चीवर वेगवेगळी रोपं लावून त्यांची हौस भागवतात. हल्ली तर फ्लॅटच्या बाल्कनीही खूप लहान असतात. पण तरीही व्हर्टिकल गार्डनिंग करून कित्येक लोक कमीतकमी जागेत जास्तीतजास्त रोपं लावतात. सध्या किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड खूप चालतो आहे. यामध्ये तुमच्या बागेत वेगवेगळ्या भाज्या लावल्या जातात. हिवाळा आता येणारच आहे. या दिवसांत गाजर जास्त प्रमाणात येतात.. त्यामुळे सध्या जर तुम्ही तुमच्या किचन गार्डनमध्ये गाजर लावून पाहिलं तर त्याची वाढ जास्त जोमात होऊ शकते. किचन गार्डनमध्ये गाजर लावण्याचा प्रयोग करणार असाल तर तो नेमका कसा करायचा ते पाहा..(gardening tips for growing carrot in balcony)
बाल्कनीमधल्या कुंडीमध्ये गाजर कसं लावावं?
गाजराची मुळे जास्त खाेल वाढतात. त्यामुळे गाजर लावण्यासाठी अशी कुंडी निवडावी जी जास्त पसरट आणि उंच असते. कमीतकमी १२ इंच उंची असणारी कुंडी गाजरासाठी परफेक्ट आहे. तसेच कुंडीला खालच्या बाजुने व्यवस्थित छिद्रं आहेत ना, जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल याची तपासणीही करून घ्या.
पंचविशीनंतर प्रत्येकीने करावाच 'हा' घरगुती उपाय! वय वाढलं तरी सौंदर्य खुलतच राहील...
गाजर लावण्यासाठी तुम्ही जी माती वापरणार आहात त्यामध्ये गांडूळ खत आणि कंपोस्ट खत थोडं थोडं मिसळून घ्या. जेणेकरून माती जास्त कसदार होईल.
यानंतर दोन ते अडीच सेमी अंतर ठेवून कुंडीतल्या मातीमध्ये बोटाच्या टोकानेच छोटे छोटे खड्डे करा आणि त्यामध्ये गाजराचं बी टाका. त्या बियांवर एक हलकासा मातीचा थर द्या.
त्यावर थोडं पाणी शिंपडा. गार्डनिंग एक्सपर्ट अशोक कुमार यांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार ही कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे ५ ते ६ तास ऊन येईल.
आलिया भट राहाच्या १८ व्या वाढदिवसाला देणार 'हे' खास गिफ्ट, लेकीसाठी आतापासूनच सुरु केली तयारी..
कुंडीमधली माती ओलसर राहील याची काळजी घ्या. साधारण १५ ते २० दिवसांनी तुम्ही त्यामध्ये पुन्हा थोडं खत घालू शकता. यादरम्यान गाजराच्या बियांना अंकुर फुटलेले असतील. त्यानंतर साधारण दिड महिन्यात छान मोठे गाजर येतील. एकदा हा प्रयोग करून पाहा.