गोकर्णाची निळीशार, नाजुक फुलं आपलं लक्ष वेधून घेतात. बघताक्षणीच आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. देवाला वाहण्यासाठी तर ही फुलं वापरली जातातच, पण घर सजविण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो. शिवाय गोकर्णाच्या फुलांचे औषधी उपयोगही खूप आहेत. त्यामुळे आपण हौशीने गोकर्णाचा वेल लावतो. पण नेमकं असं होतं की वेल खूप वाढत जातो, आजुबाजुला भरपूर पसरतो. पण त्याला फुलं मात्र खूपच कमी येतात. अगदी कधीतरीच एखादं फुल आलेलं दिसतं. असं जर तुमच्याही गोकर्णाच्या वेलीच्या बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेले काही घरगुती उपाय करून पाहा (gardening tips for gokarna plant). गोकर्णाला भरपूर फुलं येतील.(home made fertilizer for gokarn plant for getting maximum flowers)
गोकर्णाच्या वेलीला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
गोकर्णाचा वेल नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे त्या वेलीला ३ ते ४ तास चांगलं ऊन मिळेल. कारण ऊन आणि सावली हे दोन्ही योग्य प्रमाणात मिळाले तरच कोणत्याही रोपाची चांगली वाढ होते.
शांत, गाढ झोप लागतच नाही- सारखी जाग येते? ५ गोष्टी करा, मस्त झोप होऊन फ्रेश व्हाल
गोकर्णाचा वेल ज्या कुंडीमध्ये लावलेला असेल ती माती थोडी भुसभुशीत करून घ्या. कारण माती जर जास्त चिकट किंवा कडक झाली तर वेलीची मुळं सडू शकतात आणि त्याचा परिणाम रोपाच्या वाढीवर, फुलं येण्यावर होतो. कुंडीतली माती भुसभुशीत आणि अधिक कसदार होण्यासाठी ती माती थोडी उकरून घ्या. माती उकरल्यानंतर त्यामध्ये एखादा चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोडा रोपांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतो.
यानंतर पुढे सांगितलेले काही घरगुती खत गोकर्णाला घालून पाहा. त्यासाठी साधारण १ ते दिड चमचा तुरटी पाऊण ते १ लीटर पाण्यात मिसळा. तुरटी पाण्यामध्य पुर्णपणे विरघळल्यानंतर हे पाणी गोकर्णाला द्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. रोपाची चांगली वाढ होईल.
डोक्यातून हात फिरवताना पांढरे केसच जास्त दिसतात? ३ उपाय करा, केस काळेभोर होतील
दुसरा उपाय करण्यासाठी १ मध्यम आकाराचा बटाटा घ्या आणि त्याचे बारीक काप करा. आता हे काप मिक्सरमध्ये घालून बटाट्याची प्युरी करा. प्युरी गाळून घेतल्यानंतर त्यात पाणी मिसळा आणि हे पाणी गोकर्णाला घाला. बटाट्यामध्ये असणारे काही घटक फुलझाडांसाठी अतिशय उत्तम खत म्हणून काम करतात.