Lokmat Sakhi >Gardening > नर्सरीतून आणलेला हिरवागार एरिका पाम सुकला? 'ही' गोष्ट लगेच बदला, झाड वाढेल जोमानं भरभर

नर्सरीतून आणलेला हिरवागार एरिका पाम सुकला? 'ही' गोष्ट लगेच बदला, झाड वाढेल जोमानं भरभर

Gardening Tips For Areca Palm: नर्सरीतून घरी आणताच एरिका पाम सुकून जातो, हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. बघा असं नेमकं का होतं..(why does areca palm dries and dies within few weeks?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 12:37 IST2025-08-07T11:14:28+5:302025-08-07T12:37:39+5:30

Gardening Tips For Areca Palm: नर्सरीतून घरी आणताच एरिका पाम सुकून जातो, हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. बघा असं नेमकं का होतं..(why does areca palm dries and dies within few weeks?)

gardening tips for Areca Palm, how to prepare soil mix for areca palm, why does areca palm dries and dies within few weeks | नर्सरीतून आणलेला हिरवागार एरिका पाम सुकला? 'ही' गोष्ट लगेच बदला, झाड वाढेल जोमानं भरभर

नर्सरीतून आणलेला हिरवागार एरिका पाम सुकला? 'ही' गोष्ट लगेच बदला, झाड वाढेल जोमानं भरभर

Highlightsएरिका पाम नर्सरीतून घरी आणाल तेव्हा ते तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये लावताना पुढे सांगितलेल्या पद्धतीने काळजी घ्या.

एरिका पाम हे एक अतिशय छान रोप. त्याची लांबसडकं पानं आणि त्यांचा हिरवागार रंग बघताक्षणीच आकर्षून घेतो. या राेपाची आणखी एक खासियत अशी की ते घरात किंवा घराच्या बाहेरही तुम्ही ठेवू शकता. टेरेसची किंवा हॉलची शोभा वाढविण्यासाठी हे रोप वापरलं जातं. शिवाय त्याची एकदा चांगली वाढ होऊ लागली की त्याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरजही नसते. दोन- तीन दिवस त्याला पाणी नाही घातलं तरी चालतं (gardening tips for Areca Palm). पण यासाठी मात्र त्याला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांत थोडं जपावं लागतं. नाहीतर नर्सरीतून घरी आणताच ते सुकून जातं (how to prepare soil mix for areca palm?). असं का होतं आणि ते होऊ नये म्हणून काय करावं ते आता पाहूया..(why does areca palm dries and dies within few weeks?)

 

नर्सरीतून घरी आणताच एरिका पाम का सुकून जातो?

आपण जेव्हा नर्सरीमध्ये रोपं घ्यायला जाताे तेव्हा ती रोपं छान हिरवीगार, टवटवीत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोपं टवटवीत ठेवणं विक्रेत्यांसाठी गरजेचं असतं. त्यासाठी ते रोपांवर वेगवेगळ्या केमिकल्सचा, स्टेरॉईड खतांचा खूप मारा करतात. त्यामुळे ती रोपं छान हिरवीगार दिसतात.

रोज सकाळी प्या ‘हे’ पाणी, दिवसभर थकवा येणार नाही-तब्येतीच्या तक्रारी छळणार नाहीत

आपण जेव्हा ते रोप घरी आणतो, तेव्हा अशा पद्धतीचं कोणतंही खत आपण त्यांना देत नाही. त्यामुळे आधी दिलेल्या खताचा परिणाम म्हणून ती काही दिवस चांगली राहतात आणि नंतर सुकायला लागतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एरिका पाम नर्सरीतून घरी आणाल तेव्हा ते तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये लावताना पुढे सांगितलेल्या पद्धतीने काळजी घ्या.

 

घरी आणल्यानंतर एरिका पाम सुकू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

नर्सरीतून आणलेलं एरिका पाम कुंडीमध्ये असो किंवा मग प्लास्टिकच्य पिशवीमध्ये असो ते त्यातून आधी बाहेर काढा. त्यानंतर ते ज्या मातीमध्ये आहे ती माती पुर्णपणे बाजुला काढून टाका.

राखीपौर्णिमेला भावासाठी करा झणझणीत काळ्या- हिरव्या वाटणातल्या वांग्याच्या भाजीचा बेत, अस्सल गावरान रेसिपी

त्याच्या मुळाला लागलेली मातीही अलगदपणे झटकून टाका. आता ज्या कुुंडीमध्ये तुम्हाला ते लावायचं आहे त्या कुंडीत तुमच्याकडची दुसरी माती, शेणखत किंवा गांडूळखत, कोकोपीट, थोडीशी रेती असं सगळं घाला. आता या मातीमध्ये एरिका पाम नव्याने लावा. ते सुकणार नाही. छान वाढेल आणि हिरवेगार होईल. 


 

Web Title: gardening tips for Areca Palm, how to prepare soil mix for areca palm, why does areca palm dries and dies within few weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.