Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोपांसाठी सोन्याचं खतपाणी म्हणजे किचनमधला ओला कचरा, ‘असा’ वापरा, फुलांनी बहरेल बाल्कनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:19 IST

Homemade Fertilizer For Plants : हे खत तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कचरा जमा करणं गरजेचं आहे.

गार्डनिंगची आवड असणारे लोक रोपांच्या चांगल्या वाढीसाठी महागडी खतं, केमिकल फर्टीलायजरवर अवलंबून असतात. पण  सगळ्यात गुणकारी खत हे तुमच्य रोजच्या कचऱ्याच्या डब्यात लपलेले आहे. गार्डनिंग एक्सपोर्ट  चंद्रा भट्ट यांनी घरीच काळं सोनं म्हणजेच उत्तम गुणवत्तेचं खत तयार करण्याचा एक सोपा उपाय सांगितला आहे. (Gardening Experts Shared Secret To Make Black Gold Powerful compost From Waste)

लोकांची अशी तक्रार असते की त्यांच्याकडे खत तयार करण्यासाठी पुरेसं किचन वेस्ट नसते. चंद्रा भट्ट यांनी ज्यूसचे सेंटर, टपरी, भाजी मंडईतून मिळणाऱ्या कचऱ्याला खतात बदललं आहे. फक्त ६० दिवसांत तयार होणारे हे खत फक्त मातीची गुणवत्ता वाढवत नाही तर फळं आणि फुलं येण्यास मदत करते. (Gardening Experts Shared Secret To Make Black Gold Powerful compost From Waste)

कचरा नाही खजिना

हे खत तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कचरा जमा करणं गरजेचं आहे. चंद्रा भट्ट यांची ही स्मार्ट ट्रिक वापरून तुम्ही सोप्या पद्धतीनं खत तयार करू शकता. त्यांच्या म्हणण्यांनुसार ज्यूस कॉर्नरमधून तुम्ही फळांची सालं  घेऊ शकता जे पोटॅशियमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. चहाच्या टपरीतून वापरलेली चहा पावडर घ्या. ज्यात नायट्रोजन मोठ्या प्रमाणात  असते. भाजीच्या मंडईतून कांदे आणि इतर भाज्यांची सालं घ्या. या सालीतून रोपांना पोषण मिळण्यास मदत होईल.

खत तयार  करण्यासाठी एक मोठं कंटेनर किंवा कंपोस्ट बॉक्स घ्या. खालच्या भागात कार्डबोर्डचे तुकडे ठेवा. कार्डबोर्ड फक्त मॉईश्चर शोषून घेत नाही तर कार्बनचाही चांगला स्त्रोतही आहे. ज्यामुळे खत तयार करण्याची प्रक्रिया वेगानं होते. 

खताचे मिश्रण योग्य पद्धतीनं घालणं गरजेचं आहे. एका भांड्यात आधी कार्डबोर्ड ठेवल्यानंतर त्यात कचऱ्याचे मोठे थर घाला. नंतर त्यावर माती घाला. या पद्धतीनं माती आणि कचऱ्याचा थर तयार करत कंटेनर पूर्णपणे भरून घ्या. मातीतील सुक्ष्मजीव कचरा ओला करण्याची प्रक्रिया वेगानं करतात.

ही प्रक्रिया अजून वेगानं होण्यासाठी एका छोट्या भांड्यात पाणी घ्या. त्यात थोडं शेण आणि गूळ व्यवस्थित मिसळून घ्या. गूळ सुक्ष्म जिवांसाठी उत्तम अन्न ठरतो. ज्यामुळे कचरा लवकर खतात रुपांतरीत होतो. तयार मिश्रण भांड्यांवर शिंपडा.

यात दर १५ ते २० दिवसांची शेण घालत राहा. ज्यामुळे मॉईश्चर राहिल तसंच बॅक्टेरियाज एक्टिव्ह राहतील. कंटेनर कोणत्याही हवेशीर ठिकाणी ठेवा. ६० दिवसांनी किचन वेस्ट पूर्णपणे खतात रुपांतरीत होईल. हे खत बाजारात मिळणाऱ्या खतांच्या तुलनेत खूपच गुणकारी आहे. यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kitchen waste: Gold fertilizer for plants, balconies bloom beautifully.

Web Summary : Turn kitchen waste into potent fertilizer! Expert Chandra Bhatt reveals a simple method using fruit peels, tea powder, and vegetable scraps. In 60 days, create nutrient-rich compost boosting plant growth and abundant blooms. A sustainable and cost-effective gardening solution.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स