घरात सुंदर, सुंदर फुलांची रोपं लावायला प्रत्येकालाच आवडते पण रोपांची हवीतशी वाढ होतेच असं नाही. फक्त पानं येतात, फुलं येत नाहीत (Gardening Tips). फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. मोगऱ्याच्या वासानं संपूर्ण घर प्रसन्न राहतं. मोगऱ्याचा सुवास संपूर्ण वातावरण बदलून टाकतो. घरी लावलेल्या मोगऱ्याच्या रोपाला व्यवस्थित फुलं येत नाहीत अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. मोगऱ्याच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता ज्यामुळे रोपांची चांगली वाढ होईल. Gardening Experts Shared 2 Cheap Fertilizer To Get More Flowers And Increase Growth Faster From Mogra Plant)
वेळोवेळी प्रुनिंग करा
जास्त फुल येण्याासाठी छाटणी वेळेवर करणं गरजेचं असतं. फुलं सुकली किंवा पडली तर त्यावरच डेड हेड लगेच काढून टाका. नवीन फुलं येण्यास तयार होतील. याव्यतिरिक्त लांब फांद्या वाढत असतील फुलं नसतील तर लगेच कापून टाका. यामुळे रोपांमध्ये उर्जा येईल आणि फुलं तयार होण्यास मदत होईल.
3 पोषक तत्व गरजेची
पावसाळ्यात रोपाला व्यवस्थित खत देणं गरजेचं आहे. यासाठी योग्य खताची निवड करा. ज्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असायला हवे. मोगऱ्याच्या फुलाला व्यवस्थित फुलं येण्यासाठी स्पेशल खताचा वापर करा. पण योग्य प्रमाण आणि वेळेची काळजी घ्यायला हवी.
कामवाल्या मुलीचं लग्न ठरलं, मालकिणीनं शेवटच्या दिवशी असं काही केलं, डोळे पाणावणारा Video
मोहोरीची पावडर
पावसाळ्यात मोहोरीची फांदी सरळ घातल्यामुळे फंगस लागू शकते. यासाठी याची पावडर बनवून वापर करा. माती व्यवस्थित खोदून घ्या. नंतर पाऊस थांबल्यानंतर माती सुकल्यानंतर खत घाला. कुंडीत एक चमचा मोहोरीची पावडर घाला. खताचा वापर करू नका.
लिक्विड फर्टिलायजर
तुम्ही मोहोरीच्या पावडरचं लिक्विड फर्टिलायजर तयार करू शकता. एक लिटर पाण्यात 1 चमचा मोहोरीची पावडर घालून 24 तासांसाठी भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी रोपांमध्ये घाला. हे खत महिन्यातून एकदाच घाला. तापमान जास्त असल्यास हे खत घालू नका.