घराच्या बाल्कनीत लिंबाचं रोप लावलं तर रोपाला लिंबू लवकर येत नाहीत फक्त पानं येतात अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. काही सोपे उपाय करून लिंबाच्या रोपाच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुम्हाला काही घरगुती वस्तूंचा वापर करावा लागेल. यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न मिळते.
काही सोपे उपाय करून तुम्ही लिंबाच्या रोपाला भरपूर लिंबू आणू शकता. (Gardening Expert Shares A Cheap And Organic Fertilizer To Increase Lemon Plant Growth Faster)
कांद्याच्या पाण्याचा जादूई उपाय
लिंबाच्या रोपाला लिंबू येण्यासाठी कांद्याचे फर्टिलायजर खूप असरदार ठरते. एक कांदा चिरून एक लिटर पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवा. नंतर अर्ध्या तासानं कांद्याचं पाणी गाळून घ्या मग हे पाणी मातीत घाला. चांगल्या परिणामांसाठी दर १५ दिवसांनी हा उपाय करा. ज्यामुळे रोपासाठी आवश्यक असणारे मायक्रो न्युट्रिएंट्स मिळतील.
मातीसाठी ऑर्गेनिक खत गरजेचं
रोपाला मुळापासून मजबूत बनवण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी सगळ्यात आधी शेण खत घाला. याशिवाय कडुलिंबाच्या काडीचा उपयोग करा. ज्यामुळे मातीला कीटक, फंगसपासून वाचवता येईल. हे मिश्रण मातीच्या उपजाऊ शक्तीला वाढवते आणि रोपाच्या वाढीसाठी मदत करते.
रसाळ आणि मोठ्या फळांसाठी कॅल्शियम
लिंबाचा आकार वाढवण्यासाठी तसंच लिंबांना रसाळ बनवण्यासाठी सीवीडचा वार करा. याव्यतिरिक्त लिंबाच्या रोपाला कॅल्शियमची आवश्यकता असते. अंड्याच्या सालीची पावडर घालू शकता. जर तुम्हाला अंड्यांचा वापर करायचा नसेल तर पांढरा चुना वापरू शकता. ज्यामुळे फळं चांगली राहतील.
लिंबाच्या रोपाला आयर्न मिळण्यासाठी गेरूचा वापर करू शकता. गेरू एक मातीचा प्रकार असतो जो तुम्हाला बाजारात सहज मिळेल. यात मोठ्या प्रमाणात आयर्न असते ज्यामुळे पानं बहरलेली राहण्यास मदत होते, फळांचा विकास होण्यास मदत होते. हे सर्व पदार्थ घातल्यानंतर खताला मातीच्या थरानं पुन्हा एकदा झाकून ठेवा. जेणेकरून पोषक तत्व मुळांपर्यंत पोहोचतील.
पॉलिनेशन आणि पाण्याचे संतुलन
फुलं आल्यानंतर सगळ्यात मोठी चूक म्हणजे जास्त पाणी देणं, जास्त पाणी दिल्यामुळे फुलं गळू लागतात. पाणी तेव्हा द्यायला हवं जेव्हा माती पूर्णपणे सुकते. याव्यतिरिक्त पॉलिनेशन आणि माश्या आकर्षिक करण्यासाठी तुम्ही रोपावर मध शिंपडू शकता. मातीत मधाचं पाणी घाला. यामुळे लिंबू जास्तीत जास्त येतील.
ह्यूमिक एसिड आणि उन्हाची गरज
लिंबाच्या रोपाला कमीत कमी ६ ते ७ तास चांगलं उन दाखवायला हवं. उन्हाशिवाय लिंबाचं रोप व्यवस्थित फुलत नाही. मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही पाण्यात ह्युमिक एसिड मिसळून रोपाच्या चारही बाजूंना देऊ शकता. फक्त लक्षात ठेवा की पाणी नेहमी गरजेनुसार द्यायला हवं.
