Join us

घरात लहानशा कुंडीत लावलेला गवतीचहाही ठेवतो घर प्रसन्न, ५ टिप्स-गवतीचहा वाढेल भरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 15:13 IST

Easy and useful 5 gardening tips, grow beautiful lemongrass in your yard or home : गवती चहा कुंडीत वाढवण्यासाठी टिप्स.

गवती चहा म्हणजेच लेमनग्रास हा सुगंधी तर असतोच शिवाय औषधी गुणांनी भरलेला असतो. जो घरच्या घरी कुंडीत लावता येतो आणि त्याची निगा राखणेही सोपे असते. गवती चहा आहारात असावा. त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. (Easy and useful 5 gardening tips, grow beautiful lemongrass in your yard or home  )घरीच लहान कुंडीत गवती चहा लावणे अगदी सोपे आहे. फक्त काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा आणि टिप्स करुन पाहा. मस्त हिरवागार गवती चहा घरीच लावता येतो.

१. गवती चहाला सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळे कुंडीला अशी जागा ठेवा जिथे रोज किमान चार-पाच तास थेट सूर्यकिरणे  रोपावर पडतील. छान सुर्यप्रकाश मिळाल्यावर गवतीचहा एकदम मस्त वाढतो. तसेच त्याला कीड वगैरेही लागत नाही.  

२. कुंडी निवडताना थोडी खोल आणि रुंद अशीच घ्या. जेणेकरुन मुळांना भरपूर जागा मिळेल आणि झाड भरघोस वाढेल. माती चांगलीच वापरा काळी माती चालते. मात्र माती चांगलीच असावी. माती योग्य दर्जाची असली तर वेगळे जास्तीचे खत घालायची वेळ नाही येत.

३. कुंडीत अगदी थोडे सेंद्रिय खत मिसळल्यास झाड जोमाने वाढते. रोप लावताना दोन-तीन मुळे असलेली जुडी निवडल्यास ते लवकर वाढते. लावतानाच थोडा जास्त लावायचा. पाणी देताना मातीत ओलसरपणा टिकवावा पण पाणी साठू नये हे महत्त्वाचे.

४. गवती चहा वाढताना त्याच्या आजूबाजूला नवीन पात्याही तयार होतात.  त्या वेळोवेळी हलक्या हाताने वेगळ्या करून दुसऱ्या कुंडीत लावता येतात. गवती चहाचे पानं किंवा देठ तोडताना झाडाचे नुकसान होऊ नये म्हणून खालून हलक्या हाताने पाती काढावी. नियमित छाटणी व पाणी दिल्याने गवती चहा दाट होतो आणि सुगंधी होतो.

५. चहा गाळल्यावर उरणारी पूड खत म्हणून वापरु शकता. गवती चहा आणखी छान वाढेल. तसेच लिंबाची सालं आणि इतरही काही पदार्थ खतासाठी उपयुक्त ठरतात.  

गवती चहाचा सुगंध घरातील हवा ताजीतवानी ठेवतो व डासांनाही दूर ठेवतो. त्यामुळे तो एक नैसर्गिक रिपेलंट ठरतो. यापासून तयार केलेला चहा पचनशक्ती सुधारतो, अपचन व गॅसेस कमी करतो. घशातील खवखव कमी करतो तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. त्यातील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक द्रव्ये कमी करण्यास मदत करतात. त्वचा तजेलदार ठेवतात. गरम पाण्यात गवती चहाची पाने टाकून वाफ घेतल्यास सर्दी-खोकल्याचा त्रासही कमी होतो. घरी अशा प्रकारे गवती चहा लावल्याने स्वच्छ व सुगंधी वातावरण तयार होते.

टॅग्स :बागकाम टिप्सअन्नहेल्थ टिप्सहोम रेमेडीइनडोअर प्लाण्ट्स