Lokmat Sakhi >Gardening > कडीपत्त्याच्या रोपाला पानचं येत नाहीत ? ५ घरगुती ट्रिक्स - हिरव्यागार सुगंधी पानांनी भरगच्च बहरेल रोप...

कडीपत्त्याच्या रोपाला पानचं येत नाहीत ? ५ घरगुती ट्रिक्स - हिरव्यागार सुगंधी पानांनी भरगच्च बहरेल रोप...

Gardening Expert Shared 3 Secret To Increase Curry Leaves Plant Growth Faster & Make Bushy In Pot At Home : curry leaves plant care tips : how to grow curry leaves faster at home : secret to increase curry leaves growth in pot : best fertilizer for curry leaves plant : how to make curry leaves plant bushy : या ५ ट्रिक्समुळे कडीपत्त्याच्या रोपाला येतील दाट आणि हिरवीगार पानं की, कडीपत्ता विकत घेण्याची गरजच नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 13:00 IST2025-09-12T12:55:58+5:302025-09-12T13:00:00+5:30

Gardening Expert Shared 3 Secret To Increase Curry Leaves Plant Growth Faster & Make Bushy In Pot At Home : curry leaves plant care tips : how to grow curry leaves faster at home : secret to increase curry leaves growth in pot : best fertilizer for curry leaves plant : how to make curry leaves plant bushy : या ५ ट्रिक्समुळे कडीपत्त्याच्या रोपाला येतील दाट आणि हिरवीगार पानं की, कडीपत्ता विकत घेण्याची गरजच नाही.

curry leaves plant care tips how to grow curry leaves faster at home secret to increase curry leaves growth in pot best fertilizer for curry leaves plant how to make curry leaves plant bushy | कडीपत्त्याच्या रोपाला पानचं येत नाहीत ? ५ घरगुती ट्रिक्स - हिरव्यागार सुगंधी पानांनी भरगच्च बहरेल रोप...

कडीपत्त्याच्या रोपाला पानचं येत नाहीत ? ५ घरगुती ट्रिक्स - हिरव्यागार सुगंधी पानांनी भरगच्च बहरेल रोप...

रोजचा स्वयंपाक करण्यासाठी आपण कडीपत्त्याच्या पानांचा वापर करतो. डाळ, भाजी किंवा आमटीला फोडणी देण्यापासून कडीपत्त्याच्या पानांची चटणी करण्यापर्यंत वेगवेगळ्या पदार्थांमध्ये (how to grow curry leaves faster at home) या पानांचा हमखास वापर केला जातोच. कोणत्याही पदार्थात कडीपत्त्याची पाने घालताच त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते. अशी ही कडीपत्त्याची पाने अगदी रोजच्याच वापरातील असल्याने, काहीजणांच्या घरात याचे एखादे छोटेसे रोप असतेच. छोट्याशा कुंडीत कडीपत्त्याचे रोप लावणे तर सोपे आहे परंतु त्याची वेळीच (how to make curry leaves plant bushy) योग्य ती काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते(Curry Leaves Plant Growth Faster & Make Bushy In Pot At Home).

आपल्यापैकी अनेक गृहिणी कडीपत्त्याचे रोप लावले तरी त्याची वाढ होत नाही, भरघोस पाने येत नाहीत अशा वेगवेगळ्या तक्रारी करतात. एवढंच नव्हे तर कुंडीत लावलेले रोप वाढत नाही, पाने येत नाहीत म्हणून बाहेरून कडीपत्ता विकत आणावा लागतो. कुंडीतल्या कडीपत्त्याच्या रोपाची वाढ नीट होत नाही, इतकी पाने येत नाहीत की गरजेनुसार वापरता येतील. याचबरोबर जर  कडीपत्त्याचे रोप सुकत असेल, तर काळजी करण्याऐवजी गार्डनिंग एक्सपर्टच्या काही टिप्स पाहूयात. गार्डनिंगच्या टिप्स देणारे अभिषेक राजा यांनी कडीपत्त्याच्या रोपाला एखाद्या जंगली झाडासारखं भरगच्च करण्यासाठी काही सिक्रेट्स शेअर केले आहेत. या ३ सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या कडीपत्त्याच्या रोपाला इतकं दाट आणि हिरवंगार करू शकता की तुम्हाला बाजारातून कढीपत्ता विकत घेण्याची गरजच पडणार नाही. 

कुंडीतील कडीपत्त्याच्या रोपाला येतील भरगच्च पाने... 

१. गार्डनिंग एक्सपर्ट अभिषेक राजा म्हणतात की, सुरुवातीला कडीपत्त्याच्या रोपाची वाढ हळूहळू होते. रोप लावल्यानंतर आपण  लिक्विड खत म्हणून शेणाच्या गोवऱ्यांचे पाणी टाकू शकता. यासाठी एक गोवरी एका बादलीभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून रोपाच्या मुळांमध्ये टाका. हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे, जे रोपाची वाढ जलद होण्यास आणि ते हिरवेगार राहण्यास मदत करते.

२. कडीपत्त्याच्या रोपासाठी आपण घरच्याघरीच देखील सेंद्रिय खत तयार करु शकता. यासाठी, भाज्या आणि फळांच्या साली पाण्यात भिजवून हे पाणी आपण रोपाला घालू शकता. हे खत रोपाला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक पुरवते आणि ते फुकटात तयार होते. हे खत तुम्ही महिन्यातून एकदा रोपाला घालू  शकता.

निर्माल्यातील झेंडूची फुलं फेकू नका, त्यातूनच उगवतील नवी झेंडूची रोपं-‘असं’ करा झटपट बागकाम...

३. कोणत्याही रोपाला दाट बनवण्यासाठी त्याची योग्य प्रकारे छाटणी करणे देखील खूप महत्त्वाचे असते. जेव्हा रोप ८ ते १० इंच वाढेल आणि त्याची चांगली वाढ होत असेल, तेव्हा त्याचा वरचा भाग कापून टाका. यामुळे रोप लांब वाढण्याऐवजी बाजूला नवीन फांद्या काढण्यास सुरुवात करते. छाटणी केल्याने रोप खालून वरपर्यंत दाट होते आणि सुंदरही दिसते.

डेंग्यू-मलेरिया पसरवणारे डास घरभर उडतात? लावा ‘हा’ जादूई दिवा, डास परत घरात दिसणार नाहीत...

४. सीवीड एक्सट्रॅक्ट कडीपत्त्याच्या रोपासाठी वरदान ठरते. यात अनेक प्रकारचे सूक्ष्म-पोषक घटक आणि हार्मोन्स असतात, जे रोपाची वाढ वेगाने होण्यास आणि नवीन फांद्या फुटण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला सीवीड एक्सट्रॅक्ट पाण्यामध्ये मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे. हे मिश्रण महिन्यातून फक्त एकदा रोपाच्या पानांवर चांगले शिंपडा. काही दिवसातच आपल्याला रोपात फरक दिसून येईल. 

५. कडीपत्त्याच्या रोपाला दिवसातून कमीतकमी ५ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. सूर्यप्रकाशात ठेवल्यानेच रोपाची वाढ वेगाने होते आणि त्याची पाने हिरवी राहतात. याव्यतिरिक्त, कुंडीत पाणी तेव्हाच टाकावे जेव्हा वरची माती कोरडी वाटेल. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजू शकतात, ज्यामुळे रोप खराब होते. त्यामुळे रोपाला गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नका.

Web Title: curry leaves plant care tips how to grow curry leaves faster at home secret to increase curry leaves growth in pot best fertilizer for curry leaves plant how to make curry leaves plant bushy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.