Lokmat Sakhi >Gardening > मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

Coconut Coir For Money Plant Growth : How to Use Coco Coir for Money Plant Planting : How to use coconut coir hair for money plant : मनी प्लांट हिरवीगार होऊन, चांगली वाढावी यासाठी नारळाच्या शेंड्या ठरतील फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 19:13 IST2025-05-01T19:07:04+5:302025-05-01T19:13:24+5:30

Coconut Coir For Money Plant Growth : How to Use Coco Coir for Money Plant Planting : How to use coconut coir hair for money plant : मनी प्लांट हिरवीगार होऊन, चांगली वाढावी यासाठी नारळाच्या शेंड्या ठरतील फायदेशीर...

Coconut Coir For Money Plant Growth How to Use Coco Coir for Money Plant Planting How to use coconut coir hair for money plant | मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

आपल्या सगळ्यांच्याच बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये काही रोपं अशी असतात जी फारच कॉमन असतात, मनी प्लांट ही त्यापैकीच एक. बहुतेकजणांच्या घरात, बाल्कनीत किंवा (Coconut Coir For Money Plant Growth) गार्डनमध्ये किमान एक तरी मनी प्लांटचा वेल असतोच. सुंदर वाढणारा हिरवागार मनी प्लांटचा (How to Use Coco Coir for Money Plant Planting) वेल दिसायला इतका सुंदर दिसतो की पाहूनच मन प्रसन्न होते. घरात किंवा बाल्कनीत मनी प्लांटचा वेल लावला तर वातावरण प्रसन्न वाटते, इतकंच नव्हे तर घराला देखील शोभा येते(How to use coconut coir hair for money plant)

आपल्यापैकी काहीजण मोठ्या हौसेने आणि आवडीने मनी प्लांटचा वेल लावतात, परंतु अनेकदा बऱ्याचजणांची तक्रार असते की मनी प्लांटची व्यवस्थित वाढच होत नाही. वेगवेगळ्या प्रकारची खतं, वेळेवर पाणी आणि सूर्यप्रकाश दाखवला तसेच इतर गोष्टींची काळजी घेतली तरी देखील मनी प्लांटची पाहिजे तशी वाढ होत नाही. अशावेळी आपण मनी प्लांटचा वेल हिरवागार होऊन त्याची वाढ चांगली होण्यासाठी, चक्क कचरा म्हणून फेकून देणाऱ्या नारळाच्या किशीचा वापर करु शकतो. मनी प्लांट हिरवीगार होण्यासाठी तसेच तिची वाढ चांगली होण्यासाठी नारळाची किशी कशी काय उपयोगी पडेल ते पाहूयात. 

मनी प्लांटच्या वाढीसाठी नारळाची किशी कशी मदत करेल ? 

कुणी मनी प्लांट पाण्यांत लावतात तर कुणी मातीत. परंतु या दोन्ही पद्धतीने वेल लावून पाहिला तरी देखील वेलीच्या वाढीत काहीच फरक दिसत नाही. अशावेळी आपण एक घरगुती फुकट उपाय नक्की करुन पाहू शकतो. यासाठी, आपल्याला फक्त नारळ सोलल्यानंतर जो केसाळ भाग राहतो, ज्याला आपण 'नारळाची किशी' किंवा 'शेंडी' म्हणतो, इतकेच साहित्य लागणार आहे. 

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

मोगरा फुलला! पाटीवर लिहिण्याचा खडू करेल कमाल, पांढऱ्याशुभ्र कळ्यांचा बहर - सुगंध दरवळेल दारी...

नेमकं करायचं काय ? 

नारळाच्या झाडाला 'कल्पतरू' असे म्हटले जाते. नारळाच्या झावळीपासून, फळं, पाणी, नारळाच्या किशीपर्यंत प्रत्येक गोष्ट ही बहुपयोगी आहे. असाच एका साधासोपा उपाय सध्या सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात चक्क नारळाच्या किशीच्या मदतीने मनी प्लांटची वेल पाण्यांत लावली आहे. यासाठी सर्वात आधी नारळाच्या किशीचे मध्यम आकारचे तुकडे कापून घ्यावेत. त्यानंतर मनी प्लांटचा वेल घेऊन त्याचा मुळाकडील भागाभोवती नारळाच्या किशी लावून तो भाग संपूर्णपणे कव्हर करायचा. त्यानंतर, तो भाग सुतळीने बांधून घ्यावा. अशाप्रकारे नारळाच्या किशीने बांधून घेतलेली मनी प्लांट एका ग्लासात ठेवून त्यात पाणी ओतायचे आहे. हा उपाय केल्यास, मनी प्लांट अगदी भरभर वाढेल तसेच पानांचा रंग देखील हिरवागार होण्यास मदत होईल. फक्त ग्लासातील पाणी नियमितपणे बदलावं, नाहीतर नारळाच्या शेंड्या कुजून दुर्गंधी येऊ लागते.  

बागेतील नागवेलींच्या वेलीला घाला 'हे' पांढरे पाणी, विड्याची पानं होतील मोठी आणि वेल वाढेल जोमाने...


घरभर धूळ, कितीही पुसा धूळ कमीच हाेत नाही? लावा ७ रोपं, घरात वाटेल फ्रेश - प्रदूषण गायब...

मनी प्लांट नारळाच्या किशीने बांधून घेतल्याने काय होते ? 

१. मनी प्लांट नारळाच्या किशीने बांधून घेतल्याने वेलीसाठी आवश्यक तितके पाणी दिवसभर मिळत राहते. नारळाची किशी पाणी शोषून घेते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी मिळण्याने वेल भरभर वाढतो. 

२. नारळाच्या शेंड्यांमधे अनेक औषधी आणि महत्वाचे घटक असतात. जे रोपांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात. 

३. झाडं लावताना नारळाच्या शेंड्याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. यामुळे रोपांच्या मुळांना मजबुती मिळून त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.

Web Title: Coconut Coir For Money Plant Growth How to Use Coco Coir for Money Plant Planting How to use coconut coir hair for money plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.