आपण मोठ्या हौसेने घरातील फळा - फुलांची बाग सजवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या फळा - फुलांची सुंदर रोपं आपण घराच्या गार्डनमध्ये किंवा छोट्या कुंडीत लावतो. रोपं फक्त लावतच नाही तर त्यांची तितकीच काळजी देखील घेतो. घरातील या रोपांना पाहून आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटते की, रोप हिरवीगार राहावीत, भरपूर फुलं यावीत आणि फळा - फुलांनी रोपं बहरुन जावं... यासाठी आपण महागडी खतं किंवा रासायनिक फर्टिलायझर वापरतो, पण अनेकदा घरात सहज उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक उपायांकडे दुर्लक्ष करतो(buttermilk for home plants).
आपल्या बागेतील रोपांना पाणी तर आपण रोजच घालतो, पण तुम्हाला माहीत आहे का, की आपल्या स्वयंपाकघरातीलच एक साधा पदार्थ पाण्याइतकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकते? तो पदार्थ म्हणजे 'ताक'. उन्हाळ्यात रोज प्यायलं जाणारं ताक हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर रोपांच्या वाढीसाठीही (benefits of buttermilk for plants) अत्यंत फायदेशीर मानलं जातं. पाण्यासारखंच ताक रोपांना पोषण देतं, मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय करतं आणि रोपांची वाढ वेगाने होण्यास मदत करतं. योग्य पद्धतीने ताकाचा वापर केल्यास फुलांचा आणि फळांचा आकार वाढतोच, शिवाय फळं - फुल येण्याचं प्रमाणही वाढतं...नेमकं ताक झाडांसाठी (how to use buttermilk for plants at home) कसं फायदेशीर ठरतं आणि ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूयात...
रोपांसाठी ताक कसे फायदेशीर...
पानांचा आकार वाढतो :- ताकामध्ये असलेले 'गुड बॅक्टेरिया' आणि सूक्ष्म पोषक तत्वे मातीचा कस आणि सुपीकता वाढवण्यास मदत करतात. ताकामध्ये मुबलक प्रमाणात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस केवळ पानांचाच आकार मोठा करत नाहीत, तर त्यांना गडद हिरवा रंग आणि नैसर्गिक चमकही देतात.
रोपांसाठी ताक नेमकं कसं वापरावं ?
रोपांना कधीही ताक थेट घालण्याची चूक करू नका, कारण ते चवीला खूप आम्लीय (Acidic) असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ताकामध्ये साधारणपणे ५ पट पाणी मिसळून ते पातळ करावे. जर तुम्ही एक ग्लास ताक घेणार असाल, तर त्यात ५ ग्लास साधे पाणी मिसळावे. हे तयार झालेले हलके द्रावण झाडांच्या मुळांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक ठरते.
फुलझाडांसाठी नैसर्गिक 'बूस्टर' :- गुलाब, जास्वंद आणि अपराजिता यांसारख्या फुलांच्या झाडांसाठी ताक हे एक उत्तम 'बूस्टर' म्हणून काम करते. ताकामुळे मातीची pH पातळी संतुलित राहण्यास मदत होते. मातीचा पोत सुधारल्यामुळे झाडाला जास्त कळ्या येतात आणि फुलांचा आकारही मोठा होतो. जर तुमच्या गुलाबाच्या झाडाला फुले येत नसतील, तर दर १५ दिवसांतून एकदा ताकाच्या द्रावणाचा वापर नक्की करून पहा.
कडीपत्ता आणि भाज्यांच्या रोपांसाठी 'अमृत' आहे ताक :- टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या भाज्यांच्या रोपांमध्ये ताक टाकल्याने त्यांची वाढ वेगाने होते. कढीपत्त्याच्या रोपासाठी ताक हे 'अमृता'प्रमाणे मानले जाते. ताकाच्या वापरामुळे कढीपत्त्याचा सुगंध वाढतो आणि रोपाचे कीटकांपासून संरक्षण होते. यामुळे रोपाला नवीन फांद्या लवकर फुटतात आणि वेली किंवा झुडपे वेगाने पसरतात.
नैसर्गिक बुरशीनाशक म्हणून ताकाचा वापर :- जर तुमच्या झाडांच्या पानांवर पांढरे डाग किंवा बुरशी दिसत असेल, तर ताकाच्या पातळ द्रावणाचा वापर स्प्रे म्हणून करा. ताकाचा हा स्प्रे पानांना कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून वाचवतो आणि त्यांना निरोगी ठेवतो. हे द्रावण स्प्रे बाटलीमध्ये भरून पानांवर थेट फवारल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. कोणत्याही प्रकारच्या रोपाला रोगांपासून वाचवण्यासाठी फार पूर्वीपासूनच 'आंबट ताकाचा' वापर असरदार उपाय ठरतो.
बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण..
वापराची योग्य वेळ :- ताकाच्या द्रावणाचा वापर नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर करावा. दुपारच्या कडक उन्हात हे द्रावण झाडांना घालणे टाळावे. वापरल्या जाणाऱ्या ताकामध्ये मीठ किंवा साखर अजिबात नसावी, याची खात्री करून घ्यावी. महिन्यातून फक्त दोनदा या द्रावणाचा वापर करणे तुमच्या बागेला हिरवीगार आणि फुलांनी भरलेली ठेवण्यासाठी पुरेसे आहे.
