नाजुक, गोलाकार आणि थोडीशी जाडसर पानं असणारं जेड प्लांट दिसायला खूपच आकर्षक असतं. त्याचं वैशिष्ट हे की ते आपण अगदी लहान आकाराच्या कुंडीमध्ये लावू शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे झाडं लावण्यासाठी पुरेशी जागा नसते, त्यांच्यासाठी ते प्लांट अगदी उत्तम आहे. शिवाय २- ३ गोष्टींची काळजी घेतली तर हे रोप अगदी छान वाढतं. त्याच्यासाठी विशेष वेळ काढण्याची गरजही नसते. पण नेमकं आपण तिथेच चुकलो तर मग मात्र त्याची वाढ चांगली होत नाही (Gardening Tips for Jade Plant). ते अगदीच सुकून गेल्यासारखं दिसतं आणि पानंही गळून जातात (best home made fertilizer for jade plant). असंच तुमच्याही जेड प्लांटच्या बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेले काही घरगुती उपाय करून पाहा.(how to take care of jade plant?)
जेड प्लांटसाठी उत्तम घरगुती खत
१. कॅल्शियम
जेड प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी त्याला कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा त्याला कॅल्शियमचा डोस द्यायला हवा. चुना तसेच खडू यासारख्या पदार्थांमधून आपण जेड प्लांटला कॅल्शयम देऊ शकतो. यासाठी अर्धा चमचा चुना एक लीटर पाण्यामध्ये विरघळून घ्या.
सारखं मोबाईल बघितल्यामुळे २५ वर्षाच्या तरुणाची मान कायमची वाकली, जडला नवाच आजार
यानंतर हे पाणी जेड प्लांटला द्या. चुन्याच्या ऐवजी तुम्ही खडूचाही वापर करू शकता. खडूचा एक तुकडा जेड प्लांटच्या कुंडीतल्या मातीमध्ये खोचून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या रोपाला पाणी द्याल, तेव्हा तेव्हा खडू विरघळून त्यातलं कॅल्शियम आपोआप रोपाला मिळत जाईल.
२. एप्सम सॉल्ट
जेड प्लांटच्या वाढीसाठी एप्सम सॉल्टही खूप उपयुक्त ठरतं. हे सॉल्ट एक ते दोन चमचे भरून घ्या आणि ते १ लीटर पाण्यात घाला. सॉल्ट जेव्हा पाण्यात पुर्णपणे विरघळेल तेव्हा हे पाणी रोपावर शिंपडा आणि काही पाणी कुंडीमधल्या मातीत घाला.
Google Gemini AI Saree Trend: शंतनू नायडू म्हणतो- आळशी झालात तुम्ही, कपाटात ढिगभर साड्या असूनही....
महिन्यातून एकदा हा उपाय करा. रोपाची वाढ चांगली होईल. शिवाय जेड प्लांट जिथे ४ ते ५ तास चांगलं ऊन येईल, अशा ठिकाणी ठेवायला हवं आणि त्याला रोज पाणी घालायला हवं. तरच त्याची चांगली वाढ होईल.