Join us

उन्हाळ्यात जास्वंदाला फुलं येणं कमी होतं? सोपे घरगुती उपाय, पानांपेक्षाही फुलंच जास्त दिसतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 15:16 IST

Home Remedies For Getting Maximum Flowers From Jaswand Or Hibiscus Plant: उन्हाळ्यात जास्वंदाला फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं. असं तुमच्या रोपाच्या बाबतीत होऊ नये म्हणून हा उपाय लगेच करून बघा...(home hacks for blooming jaswand or hibiscus plant)

ठळक मुद्देउन्हाळ्यातही जास्वंदाला भरभरून फुलं यावी, यासाठी सोपे घरगुती उपाय लगेच करून बघा..

उन्हाळा आता सुरूच झालेला आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडणं आता नकोसं वाटतंय. शिवाय पंख्याचा स्पीडही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपल्याला जसा उन्हाचा त्रास होत असतो तसाच तो आपल्या बागेतल्या रोपांनाही होतोच.. त्यामुळेच उन्हाळ्यात बऱ्याचदा रोपं सुकल्यासारखी होतात. गुलाब, जास्वंद यासारख्या रोपांना फुलं येण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. अगदी क्वचित एखादं फुल दिसतं (Home Remedies For Getting Maximum Flowers From Jaswand Or Hibiscus Plant). असं तुमच्या रोपांच्या बाबतीत होऊ नये आणि उन्हाळ्यातही जास्वंदाला भरभरून फुलं यावी, यासाठी सोपे घरगुती उपाय लगेच करून बघा..(home hacks for blooming jaswand or hibiscus plant)

 

उन्हाळ्यातही जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

१. तुमच्या जास्वंदाच्या रोपाचं बारकाईने निरिक्षण करा. ज्या फांदीची पानं खूप कमी झाली असतील त्या फांद्यांची कटींग करा. कारण कटींग केल्यानंतर पुन्हा नविन फांद्या फुटतात आणि रोप आणखी भरगच्च होऊन त्याला जास्त फुलं येतात.

दोन फरशांमधला गॅप खूप काळपट दिसतो? २ उपाय- घाण स्वच्छ होऊन फरशा होतील चकाचक

२. ताक हे जास्वंदासाठी खूप चांगलं खत ठरू शकतं. कारण फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम रोपांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच फुलांचा आकार मोठा, टपोरा होण्यासाठी मदत करतं.

खमंग पिठल्याचे झणझणीत प्रकार- शेवग्याच्या शेंगांचं पिठलं, दाण्याच्या कुटाचं पिठलं आणि बरंच काही...

३. कांद्याची टरफले रात्रभर पाण्यात भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि ते रोपांना द्या. हे पाणी कोणत्याही फुलझाडाच्या वाढीसाठी अतिशय उत्तम ठरते.

 

४. केळीच्या सालींमधून मिळणारे पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फरससुद्धा जास्वंदाच्या वाढीसाठी उत्तम ठरते. त्यासाठी केळीची साले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून त्यात आणखी थोडं पाणी घाला. हे पाणी रोपांना द्या..   

सगळी मुलं सारखीच! जेहने 'ही' चूक करताच रागावली आई करिना, म्हणाली- 'मी तुला सांगितलं ना...' 

५. बटाट्याची सालं सुद्धा फुलझाडांसाठी खूप उपयुक्त ठरतात. महिन्यातून एकदा बटाट्याची सालं मातीमध्ये खोचा. त्यातून रोपांना बरंच पोषण मिळतं. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीहोम रेमेडी