Join us

उन्हाळ्यात गुलाबाला फुलंच येत नाहीत? १ सोपा घरगुती उपाय- टपोऱ्या फुलांनी बहरेल गुलाबाचं रोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 18:58 IST

Best Home Hacks For Getting Maximum Flowers From Rose Plant: गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा. (gardening tips for the fast growth of rose plant)

ठळक मुद्देहा उपाय केल्यानंतर अगदी भर उन्हाळ्यातही तुमचा गुलाब टपोऱ्या, टवटवीत फुलांनी बहरलेला असेल.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. आपल्याला जसा उन्हाचा कडाका सोसवत नाही तसंच काहीसं रोपांचंही होतं. या दिवसात रोपांची वाढ हळुवार होऊन जाते. रोपांची पानंही पिवळट पडतात किंवा काही रोपांची पानं जळायला लागतात. बऱ्याच फुलझाडांना फुलं येण्याचं प्रमाणही कमी होऊन जातं. गुलाबाच्या रोपाच्या बाबतीत तर अनेक जणांना हा अनुभव येतो. उन्हाळा सुरू झाला की गुलाबाला फुलं येईनासे होतात. किंवा क्वचितच कधीतरी एखादं फूल दिसतं (homemade fertilizer for rose plant).  म्हणून हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच  करून पाहा (best home hacks for getting maximum flowers from rose plant). हा उपाय केल्यानंतर अगदी भर उन्हाळ्यातही तुमचा गुलाब टपोऱ्या, टवटवीत फुलांनी बहरलेला असेल.(gardening tips for the fast growth of rose plant)

 

गुलाबाच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी घरगुती उपाय 

गुलाबाचं रोप छोटसं जरी असलं तरी हा उपाय केल्याने निश्चितच गुलाबाला भरपूर फुलं येतील. त्यासाठी नेमकं काय करायचं याविषयीचा व्हिडिओ worlds.plant या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

जेवढे तुम्ही बारीक तेवढा जास्त डिस्काऊंट! रेस्टॉरण्टची ऑफर व्हायरल, मात्र लठ्ठ लोक चिडले

हा उपाय करण्यासाठी आलं घ्या आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे साधारण एक चमचा एवढे असावेत.

 

आल्याचे तुकडे एका भांड्यात घाला. त्यामध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा व्हिनेगर घाला. आता या पदार्थांमध्ये अर्धा लीटर पाणी टाका आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. 

मिठाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत? स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत.. कित्येक कामं होतील सोपी- झटपट

हे मिश्रण ७ ते ८ तासांसाठी तसेच झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून गुलाबाच्या रोपाला द्या तसेच थोडेसे पाणी गुलाबाच्या पानांवरही शिंपडा. हा उपाय आठवड्यातून २ दिवस नियमितपणे करा. काही दिवसातच तुमच्या गुलाबाच्या रोपाला भरपूर कळ्या आणि फुलं आलेली दिसतील..

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग