Join us

पपईचं झाड नुसतंच वाढलं- फळाचा पत्ताच नाही? ३ खतं घाला- भरपूर येतील पपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:42 IST

Best Fertilizer for papaya tree: पपईचं झाडाला भरपूर फळं येण्यासाठी त्याला नियमितपणे ही काही खतं घालायला हवी..(how to get maximum fruits from papaya plant?)

ठळक मुद्देज्या झाडाला पपई येत नाहीत त्यांना जर पुढे सांगितलेली काही खतं घातली तर नक्कीच त्यांनाही भरभरून फळं येतील.

ज्यांच्या घराच्या आजुबाजुला थोडीफार मोकळी जागा असते ते त्या जागेमध्ये काही रोपं आवर्जून लावतात. पेरू, चिकू, पपई, आंबा अशी फळझाडंही लावतात. आता पपईचं रोप खूप लवकर वाढतं. त्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये पपईचं झाड दिसतंच. पण त्या सगळ्याच झाडांना भरपूर पपई येतील असं मात्र नसतं. काही झाडं अक्षरश: पपईंनी लगडलेली असतात तर काही झाडांवर वर्षानुवर्षे एकही फळ येत नाही (Best Fertilizer for papaya tree). ज्या झाडाला पपई येत नाहीत त्यांना जर पुढे सांगितलेली काही खतं घातली तर नक्कीच त्यांनाही भरभरून फळं येतील. ती खतं नेमकी कोणती ते पाहा..(how to get maximum fruits from papaya plant?)

पपईच्या झाडाला भरपूर पपई येण्यासाठी काय करावे?

 

१. शेणखत

पपईच्या रोपाला किंवा कोणत्याही फळ झाडाला भरपूर प्रमाणात फळं येण्यासाठी शेणखत खूप उपयुक्त ठरतं.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते? 'हे' पाणी वापरा- केस गळणं थांबेल

शेणखत तुम्ही तुमच्या शहरातल्या नर्सरीतूनही विकत आणू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवून घेऊ शकता. महिन्यातून एकदा पपईच्या रोपाला शेणखत दिल्यास त्याची मुळं पक्की होण्यास मदत हाेते, तसेच त्याची वाढ चांगली होऊन त्याला भरपूर फळंही येतात. 

 

२. मोहरीची पेंड 

फळझाडांसाठी मोहरीची पेंड किंवा मस्टर्ड केक हे एक खूप चांगले खत असते. शेतामध्ये पिकांच्या चांगल्या वाढीसाठीही त्याचा  वापर केला जातो.

कम्प्युटरसारखं फास्ट पळेल मुलांचं डोकं, ४ सोपे उपाय- एकाग्रता वाढून अभ्यासात होतील हुशार

मोहरीच्या पेंडीमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असल्याने फळं, फुलं जास्त प्रमाणात येण्यासाठी ते उपयुक्त ठरते. मोहरीची पेंड ३ ते ४ दिवस पाण्यात भिजत ठेवावी आणि नंतर ते पाणी पपईच्या झाडाला द्यावे. 

 

३. गांडूळ खत

पपईच्या रोपाला भरपूर फळं लागण्यासाठी त्याला दोन महिन्यातून एकदा एक ते दिड किलो या प्रमाणात गांडूळ खत नियमितपणे घालावे.

नाश्त्यामध्ये करा थोडासा बदल- वजन भराभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

झाडाचा आकार, वाढ पाहून गांडूळ खत घालण्याचे प्रमाण कमी- जास्त होऊ शकते. गांडूळ खतातून झाडाला पोटॅशियम, फॉस्फरस आणि नायट्रोजन भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे झाड भरपूर फळं देऊ लागते. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सफळेखतेइनडोअर प्लाण्ट्स