Lokmat Sakhi >Gardening > भर पावसाळ्यातही मोगऱ्याचे रोप कोमेजले? ३ टिप्स- ८ दिवसांत रोप होईल टवटवीत, हिरवेगार

भर पावसाळ्यातही मोगऱ्याचे रोप कोमेजले? ३ टिप्स- ८ दिवसांत रोप होईल टवटवीत, हिरवेगार

Gardening Tips For Mogra Plant: मोगऱ्याच्या रोपाची चांगली वाढ होत नसेल किंवा त्याला फुलंच येत नसतील तर हे उपाय नक्कीच उपयोगी येऊ शकतात..(3 tips for the fast growth of mogra plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 15:22 IST2025-06-16T15:22:04+5:302025-06-16T15:22:56+5:30

Gardening Tips For Mogra Plant: मोगऱ्याच्या रोपाची चांगली वाढ होत नसेल किंवा त्याला फुलंच येत नसतील तर हे उपाय नक्कीच उपयोगी येऊ शकतात..(3 tips for the fast growth of mogra plant)

best fertilizer for jasmine plant, 3 tips for the fast growth of mogra plant, how to get maximum flowers from mogra plant | भर पावसाळ्यातही मोगऱ्याचे रोप कोमेजले? ३ टिप्स- ८ दिवसांत रोप होईल टवटवीत, हिरवेगार

भर पावसाळ्यातही मोगऱ्याचे रोप कोमेजले? ३ टिप्स- ८ दिवसांत रोप होईल टवटवीत, हिरवेगार

Highlightsमोगऱ्याच्या रोपाची भरपूर वाढ व्हावी आणि त्याला छान पांढऱ्या शुभ्र सुवासिक कळ्या याव्या, यासाठी काय उपाय करता येईल?

मंद सुगंध पसरवून आसपासचे वातावरण मुग्ध करणारं रोप म्हणजे मोगरा. मोगऱ्याचा सुगंध हवाहवासा वाटतो. तो आपल्या आसपास दरवळत राहिला की सगळं वातावरणच कसं फ्रेश होऊन जातं. म्हणून आपण मोठ्या हौशीने मोगऱ्याचे रोप लावतो. पण नर्सरीमध्ये छान हिरवंगार, टवटवीत दिसणारं, भरपूर कळ्यांनी बहरलेलं रोप घरी आणतात कोमेजून जातं (3 tips for the fast growth of mogra plant). त्याला फुलंच येत नाहीत. असं होत असेल तर हे काही उपाय करून पाहा (how to get maximum flowers from mogra plant?). तुमच्याकडचं मोगऱ्याचं रोप पुन्हा एकदा बहरून जाईल.(best fertilizer for jasmine plant)

 

मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय 

मोगऱ्याच्या रोपाची भरपूर वाढ व्हावी आणि त्याला छान पांढऱ्या शुभ्र सुवासिक कळ्या याव्या, यासाठी काय उपाय करता येईल याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ amazinggardenideas या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ३ गोष्टी प्रामुख्याने सांगण्यात आलेल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहा..

बटाटे उकडताना ९० टक्के घरात 'ही' चूक करतात; म्हणूनच बटाट्यातलं पोषण नष्ट होऊन वजन वाढतं...

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोगऱ्याच्या रोपाची नियमितपणे कटिंग करणं गरजेचं आहे. मोगऱ्याच्या ज्या फांद्या थोड्याशा उंच पसरलेल्या आहेत त्या फांद्यांची वरची दोन ते तीन पाने कापून टाका. ज्या वेळेस अशी कटिंग कराल त्याच्यानंतर काही दिवसांतच तिथे पुन्हा नवीन पानं फुटलेली दिसतील. अशा पद्धतीने नियमितपणे कटिंग केल्यास मोगऱ्याचे रोप मस्त फुलून येईल.

 

२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोगऱ्याच्या रोपाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. जर मोगऱ्याच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही तर त्याची वाढ खुंटते आणि ते कोमेजून जाते. त्यामुळे मोगऱ्याची कुंडी नेहमी भरपूर आणि थेट ऊन, सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा.

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

३. तिसरा उपाय म्हणजे मोगऱ्याच्या रोपाला ऍसिडिक माती हवी असते. यासाठी १ ग्लास पाण्यात १ चमचा व्हिनेगर घाला आणि हे पाणी दर ५ ते ६ दिवसांतून एकदा मोगऱ्याच्या कुंडीत घाला. यामुळेही मोगऱ्याची चांगली वाढ होते.


 

Web Title: best fertilizer for jasmine plant, 3 tips for the fast growth of mogra plant, how to get maximum flowers from mogra plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.